टॅली.इआरपी ९ मध्ये जीएसटी रेट्स आणिएचएसएन/एसएसीकसे नेमावे

Last updated on August 24th, 2017 at 03:15 pm

जीएसटी नंतर, जर आपल्या व्यवसायाला एचएसएन / एसएसी कोड आणि कर दरांची आवश्यकता असेल, तर आपण आमच्या जीएसटी-रेडी सॉफ्टवेअर, टॅली.इआरपी ९ रिलीज ६ च्या मदतीने सहजपणे सेट करू शकता. यासह आपण जीएसटी रेट्स आणि एचएसएन/एसएसी कोड स्वतः आपला व्यवसाय आणि गरजेनुसार बदलू शकता.

जीएसटी ऍक्ट नुसार आपल्याला आपला व्यवसाय आणि वार्षिक उलाढाली वर अवलंबून असणारे एचएसएन/एसएसी कोड,खालील दिलेल्या टेबल नुसार इन्व्हॉइसेसवरप्रिंट करून सादर करावे लागणार आहे:

व्यवसायचा प्रकार एचएसएन कोडचे अंक
१.५ क. पेक्षा कमी (वार्षिक) गरज नाही
१.५ क. ते ५ क. (वार्षिक) पहिले २ अंक
१.५ क. पेक्षा जास्त (वार्षिक) पहिले ४ अंक
आयात आणि निर्यात साठी ८ अंक
सेवांसाठी ५ अंक

टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये हे कसे कॉन्फीगर करता येते हे पाहूया

  1. जर आपल्या सर्व मला साठी आणि सेवां साठी एकच एचएसएन/एसएसीदर असेल तर आपल्याला फक्त एकदाच या किमती कंपनी लेवल वर सेट कराव्या लागतील .
  2. जर आपल्या काही ठराविक वस्तूंसाठी सेट केलेल्या दरापेक्षा वेगळे दर लागत असतील तर आपल्याला एचएसएन/एसएसी दर स्टॉक ग्रुप लेवल वर सेट करावा लागेल. या ग्रुप मधल्या सगळ्या वस्तूंसाठीचा हा दर असणार.
  3. जर आपल्या स्टॉक ग्रुप मधल्या ठराविक वस्तूंसाठी सेट केलेल्या दरा पेक्षा वेगळे दर लागत असतील तर आपल्याला एचएसएन/एसएसी दर स्टॉक आयटम लेवल वर सेट करावा लागेल.
  4. जर आपल्याला वेगवेगळ्या व्यवहारांसाठी एकच एचएसएन/एसएसी दर ठेवायचा असेल तर आपण तसे खरेदी/विक्री आणि इनकम ग्रुप्स मध्ये तसे निर्देश करू शकता.
  5. काही विशेष परिस्थितींमध्ये जसे वेगळ्या राज्यांतर्गत शाखांमध्ये मालाचे वाहतूक करणे, आपण कर-सूट मिळण्यासाठी व्यवहार “एक्सएम्प्ट टाइप” म्हणून सादर करू शकता. मग आपण नंतर लेजर लेवलवर तपशील कॉन्फीगर करू शकता किंवा विक्री आणि खरेदीचे आयटम्स वेगळे करू शकता.

आम्ही शिफारस करू इच्छितो कि एचएसएन/एसएसी आणि कर दराचा तपशील दोन्ही समान पातळीवर निर्दिष्ट केले गेले पाहिजे.

काहीवेळा मास्टर सेटीन्ग्स ओव्हरराइड करण्याची गरज पडू शकते, जे आपण टॅली.इआरपी ९ रिलीज ६ च्या मदतीने सहज करू शकता.

काहीवेळा मास्टर सेटीन्ग्स ओव्हरराइड करण्याची गरज पडू शकते, जे आपण टॅली.इआरपी ९ रिलीज ६ च्या मदतीने सहज करू शकता.


आपल्या व्यवहाराच्या विशेष गरजांसाठी या सॉफ्टवेअरचा कसा उपयोग होईल हे समजून घेण्यासाठी खाली असलेला व्हिडिओ पहा.
कृपया आपले विचार आणि अभिप्राय शेअर करा.

टॅलीचे जीएसटी-रेडी सॉफ्टवेअर खरेदी किंवा अपग्रेडे करण्यासाठी इथेभेट द्या.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

About the author

Shailesh Bhatt

114 Comments

© Tally Solutions Pvt. Ltd. All rights reserved - 2017