टॅलिचे जीएसटी-रेडी उत्पादन रिलीझ प्लॅन

Last updated on July 21st, 2017 at 02:26 pm

जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये फक्त काही आठवडे बाकी असल्याने, एक टॅलि वापरकर्ता म्हणून तुम्हाला पडलेल्या अनेक ज्वलंत प्रश्नांपैकी एक प्रश्न हाही असेन कि “माझा व्यवसाय जीएसटीसाठी सज्ज होण्यासाठी टॅलि कशी मदत करेल?”

या ब्लॉग पोस्टसह, तुम्हाला टॅलिची जीएसटी उत्पादन धोरण आणि टॅलि इआरपी 9 सह सहज जीएसटी रूपांतर समजून घेता येईल.

जीएसटीएनची तयारी

तुम्हाला माहितच आहे, जीएसटी कौन्सिलने कायद्याला मंजुरी दिली आहे आणि नियम आता निश्चित केले जात आहेत. जीएसटीएन एपीआयचे अंतिम रूप देणे आणि जीएसटीएनची तयारी जीएसटी नियमांची अंतिम अंमलबजावणी करण्याशी जवळून बद्ध आहे. जीएसटीएन फाउंडेशन आवश्यक स्थिरतेसह उपलब्ध होईपर्यंत, आपल्यासाठी एक मजबूत आणि वापरण्यास योग्य जीएसटीएन कनेक्टेड पद्धती तयार करणे अशक्य आहे.

या निर्भरतेवर मात करण्यासाठी आणि आपल्याला मदत करण्यासाठी, आमच्या वापरकर्त्यांनी जीएसटीसाठी तयार रहावे, यासाठी आम्ही स्पष्ट जीएसटी उत्पादन अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे.

जीएसटी उत्पादन अंमलबजावणी आराखडा

टॅलि इआरपी 9 रिलीज 6.0 – जीएसटी सह प्रारंभीत

आमचे पहिले मोठे जीएसटी रिलिझ या जूनमध्ये होईल. या रिलीजसह आपण GST साठी पहिल्या दिवसापासून तयार आहात याची खात्री आमच्याकडून केली जाईल. या रीलिझचा वापर करून, आपण आपले सर्व व्यवसाय जीएसटीचे सर्व नियमांचे पालन करून करू शकता.

जीएसटीसाठी तयार होण्याचे पहिले पाऊल कोणते?

जीएसटी तयारीसाठी महत्त्वाचे पहिले पाऊल म्हणजे:

 • जीएसटी – नियमांनुसार व्यवहार व्यवस्थापित करणे
 • जीएसटी चलन छापून घेणे
 • खात्यांची पुस्तके राखणे
 • आपला डेटा जीएसटीएनवर ऑनलाइन उपलब्ध करणे – हा आपल्यासाठी एक नवीन उपक्रम आहे, आणि त्यातील काही पैलू आपल्याला आश्चर्यचकित करू शकतात. म्हणून आपल्याला जीएसटी रिटर्न्स भरण्याच्या नव्या युगात अधिक आत्मविश्वास देण्यासाठी, आम्ही सल्ला देतो की आपण दोन-चरणाचा अवलंब कराल:
  • त्रुटी सुधारण्याची प्रणाली असलेल्या टॅलि इआरपी 9 चा वापर करा (ट्रायङ्गुलेशन). ह्याच्या साहाय्याने आपण चुकीचे व्यवहार अपलोड करत नाहीये ना आणि नेहमी डेटा अचूकतेची खात्री होते.
  • त्रुटींविरहित आणि पुनःपडताळीत व्यवहार जीएसटीएन वर अपलोड करा

टॅलि इआरपी 9 रिलीज 6 च्या सहाय्याने, आपण खालील कार्यपद्धती वापरून जीएसटी च्या सर्व नियमांचे पालन करून आपले संपूर्ण व्यवसाय ऑपरेशन्स सुरळीत चालवणे सुरु करू शकता:

आपल्या दैनंदिन व्यवसाय ऑपरेशन्स चालवने

 1. सर्व आवश्यक कर दर सेट करा आणि आपल्या सर्व पुरवठादार आणि ग्राहकांचे जीएसटीआयएन तपशील राखून ठेवा.
 2. हे सर्व नवीन व्यवहार जीएसटी-अनुरूप आहेत याची खात्री करा आणि जीएसटी-चलन प्रिंट करा.

आपले अनुबन्धित परतावे दाखल करणे

 1. डेटा अपलोड करण्यापूर्वी जीएसटी नियमांनुसार व्यवहारांची शुद्धता तपासून घेण्यासाठी टॅलि इआरपी 9 रिलीज 6.0 वापरा.
 2. टॅलि इआरपी 9 रिलीज 6.0 वापरून योग्यरित्या फॉर्मेट केलेल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल शीट मध्ये डेटा निर्यात करा.
 3. ही एक्सेल फाईल जीएसटीएन द्वारा प्रदान केलेल्या ऑफलाइन युटिलिटीमध्ये आयात करा आणि एक आउटपुट फाइल तयार करा (जेएसओएन स्वरूपात).
 4. ही प्राप्त केलेली फाईल जीएसटीएन पोर्टलवर अपलोड करा.

हा लेख प्रकाशित करताना, जीएसटीआर 2 फॉर्मचे स्वरूप जीएसटीएन ऑफलाइन युटिलिटीवर अद्याप उपलब्ध नाही. फॉर्मेट उपलब्ध झाल्यानंतर, आम्ही आपल्याला टॅलि.इआरपी 9 च्या पुढील प्रकाशनांसह अद्ययावत क्षमता देऊ. यासह, आपण आपल्या पुरवठादाराचे जीएसटीएन डेटा टॅलि.इआरपी 9 मध्ये जीएसटीएन उपयुक्तता वापरून आयात करू शकता आणि खरेदीशी संबंधित त्रुटी निश्चित करू शकता. हे आपल्याला टॅक्स रिटर्न आणि पुस्तकांची स्थिती सहजपणे व्यवस्थापित करण्यास मदत करेल आणि आपल्या जीएसटीएन डेटासह सिंक केलेला राहतील.

प्रारंभिक टप्प्यामध्ये, आम्ही कायदे, नियम आणि ए पी आई मध्ये स्थिरीकरण आणि परिष्करणाची अपेक्षा करत आहोत. या बदलांचे समर्थन करण्यासाठी, आम्ही टॅलि.इआरपी 9 रिलीज 6 वर पुढील किरकोळ / सुधारित रेलीसेस चा योग्य पर्याय प्रदान करण्याच्या आणि पुढील प्रमुख रिलीज टॅलि.इआरपी 9 रिलीज 7 दिशेने कार्यरत राहू

टॅलि.इआरपी 9 रिलीज 7

टॅलि.इआरपी 9 रिलीज 7 सह, आम्ही आपल्याला जीएसटीएन प्रणालीसह “जोडल्यागेल्याचा अनुभव” देऊ इच्छितो आणि पूर्वी शेअर केलेल्या (जीएसटी आणि जीएसटी रेडी प्रोडक्ट्सकडून काय अपेक्षित आहे). अवघड मुद्द्यांना सोडवू इच्छितो. जेव्हा आपण स्थिर जीएसटीएन ए पी आई चा वापर करू शकणार यावर आमची रिलीझची तारीख आणि वैशिष्ट्ये अवलंबून आहेत. कारण आम्ही आपल्याला एक मजबूत प्रणाली प्रदान करू इच्छितो. यासाठी, आम्ही जीएसटीएन सह लक्षपूर्वक कार्य करणे सुरू ठेवू.

आमची प्रत्येक रिलीज आम्ही देणार्या व्यवसायातील विविधतेसाठी चांगल्या अनुपालनाच्या सुविधेवर लक्ष केंद्रित करणारी असेन !

अद्यतनः टॅलि.इआरपी 9 रिलीज 6 (जीएसटी- रेडी) आता उपलब्ध आहे. कृपया ते डाउनलोड करा आणि या पोस्टला प्रत्युत्तर देऊन आपला अभिप्राय शेअर करा.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

About the author

Rakesh Agarwal

Head of Product Management

313 Comments

Comment Moderation Guidelines Share your thoughts
Comment Moderation Guidelines

Share your thoughts

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

© Tally Solutions Pvt. Ltd. All rights reserved - 2017