Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

याआधीच्या पोस्टमध्ये आपण नवीन जीएसटी नोंदणीसाठी अर्ज कसा करावा  आणि संक्रमणातून जीएसटी नोंदणीकृत विक्रेते कसं बनावं, हे पाहिलं

आता आपण पाहू या:

 • तुमच्या नोंदणीच्या माहितीत सुधारणा कशी करावी
 • नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज कसा करावा
 • नोंदणी रद्द झाल्यास ती मागे कशी घ्यावी

तुमच्या नोंदणीच्या माहितीतील सुधारणा

 • नोंदणीच्या वेळी दिलेल्या माहितीत कोणत्याही प्रकारचे बदल केल्यास, हे बदल केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत फॉर्म GST REG-11मध्ये ते बदल नोंदवायला हवेत.
 • फॉर्म GST REG-11 मध्ये व्यवसायाचे नाव, भागीदाराची माहिती, व्यवस्थापकी मंडळ आणि या प्रकारचे काही ठराविक बदल असल्यास त्यासाठी अधिकार्‍यांची मंजुरी आवश्यक आहे. अधिकार्‍यांनी शहानिशा केल्यानंतर त्यांच्याकडून फॉर्म GST REG-12मधून ही माहिती बदलण्यासाठी मंजुरी आदेश दिला जातो.
 • नोंदणीकृत करदात्याच्या पॅन नंबरमध्ये बदल होईल अशा कोणत्याही प्रकारच्या माहितीतील बदलासाठी फॉर्म GST REG-01मधून नव्याने नोंदणी करावी लागेल.

Amending-GST-Registration-Details_Marathi

नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज

 • नोंदणीकृत करपात्र व्यक्तीला नोंदणी रद्द करायची असल्यास क्लोझिंग स्टॉक आणि इतर संबंधित कागदपत्रांसह फॉर्म GST REG-14दाखल करावा लागेल.
 • 7 दिवसांच्या आता फॉर्म GST REG-15 च्या स्वरुपात त्या करपात्र व्यक्तीला नोंदणी रद्द करण्यासाठीची कारणे दाखवा नोटीस पाठवली जाते.
 • अधिकार्‍याने शहानिशा करून मंजुरी दिल्यानंतर, फॉर्म GST REG-15 मिळाल्याच्या तारखेपासून किंवा कारणे दाखवा नोटिशीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या कालावधीत फॉर्म GST REG-16 च्या स्वरुपात नोंदणी रद्द करण्याचे आदेश पाठवले जातात.

Applying-for-Cancellation-of-Registration_Marathi

स्वेच्छेने नोंदणी केलेल्या करपात्र व्यक्तीला नोंदणीला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच नोंदणीसाठी अर्ज करता येतो. संबंधित करपात्र व्यक्तीचा कर किंवा कोणत्याही प्रकारचा दंड भरायचा असल्यास तो भरण्याच्या सूचना देऊन अधिकारी नोंदणी रद्द करण्यासाठीची संभाव्य तारीख ठरवतात.

रद्द केलेली नोंदणी मागे घेणे

 • समजा, अधिकार्‍याने नोंदणी रद्द केली असेल तरीही रद्द करण्याच्या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या कालावधीत फॉर्म GST REG-17 भरून करपात्र व्यक्ती ही रद्द करण्याची प्रक्रिया मागे घेऊ शकते.
 • अधिकार्‍याला अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवं असल्यास कामकाजाच्या तीन दिवसांच्या आत फॉर्म GST REG-3 पाठवला जातो.
 • त्यानंतर संबंधित करपात्र व्यक्तीने (कामकाजाच्या ७ दिवसांच्या आत) फॉर्म मध्ये आवश्यक माहिती देऊन उत्तर देणं आवश्यक आहे.
 • यातून अधिकार्‍याचे समाधान झाल्यास संबंधित अर्जाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आता फॉर्म GST REG-18 पाठवून नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया मागे घेतली जाते.
 • मात्र, अधिकार्‍याच्या शंकाचे समाधान झाले नाही तर, हा GST REG-5फॉर्म मधून हा अर्ज नाकारला जातो. अर्ज नाकारण्यापूर्वी संबंधित करपात्र व्यक्तीला फॉर्म GST REG-19 च्या माध्यमातून कारणे दाखवा नोटीस आणि सुनावणीचे आदेश दिले जातात.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

95,123 total views, 24 views today