(English) Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

नोंदणीकृत विक्रेत आहात? जुन्या प्रणालीतून जीएसटी प्रणालीतील स्थित्यंतर कसे असेल, हे जाणून घ्या , या पोस्टमध्ये आपण आधीपासून नोंदणी असलेल्या विक्रेत्यांसाठी जीएसटी नोंदणीतील आवश्यक बाबी आणि आवशयक अर्जांची माहिती घेतली. या पोस्टमध्ये आपण नवीन व्यवसायाच्या नोंदणीची प्रक्रिया व अर्जांची माहिती घेऊ.

जीएसटीमधील नोंदणीसाठी आवश्यक बाबी :

प्रदेशएकूण उलाढाल
ईशान्य भारत + सिक्कीम,जम्मू आणि काश्मिर,
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड
१० लाख
उर्वरित भारत २० लाख२० लाख

 

तुम्ही नियमित विक्रेत; किंवा संयुक्त करदाते असाल तर जीएसटी नोंदणीसाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील:

 1. फॉर्म GST REG-01 मधील Part-A भरा. तुमचा पॅन क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी देऊन फॉर्म जमा करा.
 2. जीएसटी पोर्टलवर पॅनची सत्यता पडताळून पाहिली जाईल. मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी वन-टाईम पासवर्ड (ओटीपी)च्या साह्याने तपासला जाईल.
 3. तुमच्या मोबाइलवर आणि ईमेलवर तुमचा ऍप्लिकेशन रेफरन्स क्रमांक येईल.
 4. फॉर्म GST REG-01मधील Part- Bभरा आणि त्यात तुम्हाला मिळालेला ऍप्लिकेशन रेफरन्स क्रमांक भरा. इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जमा करा.खालील कागदपत्रे जोडावयाची आहेत –
  • फोटो: मालक, भागीदार, व्यवस्थापकीय ट्रस्टी, समिती आणि अधिकृत सहीधारकांचे फोटो.
  • करदात्याची घडण: भागीदारी करार, नोंदणी प्रमाणपत्र किंवा घटनेचे इतर पुरावे
  • नियमांचे पुरावे/व्यवसायाच्या इतर जागा:
   • स्वत:च्या जागेसाठी – शेवटची कर पावती किंवा पालिका खाते प्रत किंवा लाइट बिलाची प्रत यासारखी जागेवरील मालकी सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे.
   • भाडेतत्वावरील किंवा करारावरील जागा – भाडे/कराराची पत्र, मालकाच्या मालमत्ता कराची पावती किंवा पालिका खाते पावती किंवा लाइट बिलाची प्रत
  • बँक खात्यासंदर्भातील पुरावे : बँक पास बुकचे पहिले पान किंवा बँक स्टेटमेंट स्कॅनप्रत
  • ऑथरायझेशन फॉर्म्स: प्रत्येक अधिकृत सहीधारकासाठी ऑथरायझेशन कॉपी किंवा व्यवस्थापकीय समिती किंवा संचालक मंडळाच्या ठरावाची प्रत दिलेल्या स्वरुपात अपलोड करा.
 5. अतिरिक्त माहिती हवी असल्यास तुम्हाला फॉर्म GST REG-03पाठवला जाईल. फॉर्म GST REG-03मिळाल्यानंतर कामकाजाच्या सात दिवसांच्या आत तुम्ही आवश्यक माहितीसह फॉर्म GST REG-04भरून प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
 6. तुम्ही फॉर्म GST REG-01किंवा फॉर्म GST REG-04च्या माध्यमातून सगळी आवश्यक माहिती दिली असेल तर फॉर्म GST REG-01किंवा फॉर्म GST REG-04 मिळाल्याच्या तारखेपासून ३ दिवसांच्या आत फॉर्म GST REG-06 मधून तुम्हाला नोंदणीचे प्रमाणपत्र पाठवले जाईल.
 7. तुम्ही पुरवलेली माहिती समाधानकारक नसल्यास फॉर्म GST REG-05चा वापर करून नोंदणी अर्ज रद्द केला जाईल.

GST---Registration-Process_Marathi

GST Registration Forms for Other Stakeholders

फॉर्म क्र.फॉर्मचा प्रकार
फॉर्म GST REG-07 टॅक्स डिडक्टर किंवा टॅक्स कलेक्टरच्या नोंदणीसाठीचा अर्ज
फॉर्म GST REG-08संबंधित टॅक्स डिडक्टर किंवा टॅक्स कलेक्टरचा नोंदणी अर्ज रद्द करण्याचा आदेश
फॉर्म GST REG-09यूएन बॉडीज/एम्बीसी यांना युनिक आयडी देण्यासाठीचा अर्ज
फॉर्म GST REG-10अनिवासी करपात्र व्यक्तीच्या नोंदणीसाठीचा अर्ज

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

684,714 total views, 115 views today

Yarab A

Author: Yarab A

Yarab is associated with Tally since 2012. In his 7+ years of experience, he has built his expertise in the field of Accounting, Inventory, Compliance and software product for the diverse industry segment. Being a member of ‘Centre of Excellence’ team, he has conducted several knowledge sharing sessions on GST and has written 200+ blogs and articles on GST, UAE VAT, Saudi VAT, Bahrain VAT, iTax in Kenya and Business efficiency.