(English) Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

चालू कर प्रणाली मध्ये, इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी विविध अटींची पूर्तता करावी लागते. त्याचा एक संक्षिप्त आढावा खाली दिला आहे:

इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकारइनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी अटी (ITC)
VATएक VAT विक्रेता म्हणून, व्यवसाय संर्दभात पुनर्विक्री करण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तू किंवा नियमांनुसार, वस्तू उत्पादनाकरीता भरावा लागणारा VAT यांवर, तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. फक्त राज्यामधील नोंदणीकृत विक्रेते ITC साठी पात्र राहतील.
CENVAT / सेवा करएक निर्माता म्हणून, वस्तू उत्पादनाकरीता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या वापरात येणार्या सर्व साधनांवर तुम्ही CENVAT क्रेडिट घेऊ शकता. कोणत्याही आयात सेवांवर भरणा केलेल्या सेवाकरावर तुम्ही ITC घेऊ शकता. तुम्ही करपात्र सेवा प्रदान करणारे सेवा प्रदाता असाल तर, करपात्र सेवा प्रदान करण्यासाठी वापरण्यात आलेल्या आयात सेवांवर भरणा केलेल्या सेवाकरावर तुम्ही ITC घेऊ शकता.

‘जीएसटी’ प्रणाली अंतर्गत, व्यवसाय वाढविण्यासाठी वापरात येणार्या किंवा वापर करण्याच्या हेतूने आयात करण्यात येणार्या सर्व साधनांवर, प्रत्येक नोंदणीकृत करपात्र व्यक्तीला इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेता येईल.

अर्थातच, या गोष्टी, विशिष्ट अटींवर अवलंबुन आहेत. जीएसटी’ अंतर्गत इनपुट क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे:

 1. तुमच्याजवळ नोंदणीकृत व्यक्तीकडुन जारी करण्यात आलेले कर चलन / डेबिट किंवा क्रेडिट नोट असणे आवश्यक आहे.
 2. वस्तू / सेवा प्राप्त झालेल्या असाव्यात.
 3. तुम्ही संबंधित महिन्याकरीता GSTR-3 दाखल केलेला असावा
 4. पुरवठादाराने आकारण्यात आलेला कर रोख किंवा आयटीसीचा वापर करुन, सरकार दरबारी जमा केलेला असावा.

Entitlement of ITC - Marathi

आता जीएसटी अंतर्गत ITC लाभ घेण्यासाठी पात्र परिस्थिती समजून घेऊया.

खालील परिस्थितीमध्ये जीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिटाचा लाभ घेतला जाऊ शकतो.

जीएसटी अंतर्गत नोंदणीसाठी तुम्ही अर्ज करता तेव्हा

तुम्ही 2 परिस्थितीं मध्ये जीएसटी अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज करू शकता:

 1. तुम्ही नोंदणी करण्यासाठी बांधील असाल
  किंवा
 2. तुम्ही स्वेच्छेने नोंदणीसाठी अर्ज करत असाल
 • तुम्ही नोंदणी करण्यासाठी बांधील होत, ‘जीएसटी’ अंतर्गत नोंदणी अर्ज करता तेव्हा

तुम्ही नोंदणी करण्यासाठी बांधील होत जीएसटी अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज करता तेव्हा, पूर्णपणे किंवा अंशत: तयार असणार्या, साधनांमध्ये समाविष्ट वस्तूंवर, टॅक्स भरणे बंधनकारक होण्यापुर्वी एक दिवस आधी तुम्ही ITC घेऊ शकता, जर:

   • नोंदणी करण्यास बांधील झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत नोंदणी केली गेली असेल आणि
   • नोंदणी मंजूर केली गेली असेल

उदाहरण: तुम्ही एक कपडे निर्माता आहात आणि तुम्ही 1 ऑक्टोबर 2017 पर्यंत करावयाची नोंदणी मर्यादा ओलांडली आहे. तुमच्या जवळ या तारखेस 5,00,000 रुपये किंमतीच्या कच्च्या मालाचा साठा आहे आणि त्यावर तुम्ही @18% (रु 90,000) जीएसटी भरणा केलेला आहे. तुम्ही 1 ऑक्टोबर 2017 पासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी अर्ज कराल याची खात्री करणे आवश्यक आहे. नाही तर, तुम्ही 90,000 रुपये किंमतीच्या पात्र कच्च्या मालावरील ITC गमावून बसाल.

 • तुम्ही स्वेच्छेने नोंदणीसाठी अर्ज करता तेव्हा

जरीही तुम्ही नोंदणी मर्यादा ओलांडली नसेल तरीसुद्धा, कायद्यामधील तरतुदी नुसार तुम्ही स्वेच्छेने नोंदणीसाठी अर्ज करु शकता. तुम्ही स्वेच्छेने नोंदणीसाठी अर्ज करता तेव्हा, पूर्णपणे किंवा अंशत: तयार असणार्या, साधनांमध्ये समाविष्ट वस्तूंवर, नोंदणी मंजूर होण्यापुर्वी एक दिवस आधी तुम्ही ITC घेऊ शकता.

उदाहरण:तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे विक्रेता आहात आणि आपल्या व्यवसायसाठी, तुम्ही स्वेच्छेने, अर्ज मर्यादा पुर्ण होण्याआधीच नोंदणीसाठी अर्ज केला आहे. 10 सप्टेंबर 2017 ला तुमची नोंदणी मंजूर केली गेली आणि तुमच्या जवळ अनुक्रमे 2,00,000 रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा साठा आहे ज्यावर जीएसटी @18% (रु 36,000) भरणा केला गेला आहे. तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या साठ्यावर 36,000 रुपये किंमतीच्या ITC चा लाभ घेऊ शकता.

तुम्ही कॉंपोज़िशन योजना सोडता आणि नियमित विक्रेते होता तेव्हा

तुम्ही रचनाकार योजने अंतर्गत नोंदणी केली असेल आणि तुमची एकूण उलाढाल 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर, तुम्हाला रचनाकार योजने अंतर्गत केलेली नोंदणी रद्द करावी लागेल आणि एक नियमित विक्रेता व्हावे लागेल. जेव्हा तुम्ही रचनाकार योजने अंतर्गत केलेली नोंदणी रद्द करता आणि एक नियमित विक्रेते बनता, तेव्हा कर भरणे बंधनकारक होण्यापुर्वी एक दिवस आधी तुम्ही पूर्णपणे किंवा अंशत: तयार असणार्या, साधनांमध्ये समाविष्ट वस्तूंवरील साठा, आणि भांडवली वस्तू यांवर ITC चा लाभ घेऊ शकता. भांडवली वस्तूंवरील क्रेडिट काही टक्क्यांनी कमी होईल, जे तुम्हाला सूचित केले जाईल.

उदाहरण: तुम्ही रचनाकार योजने अंतर्गत नोंदणी केली आहे आणि तुमची एकूण उलाढाल 50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणून, तुम्ही रचनाकार योजने अंतर्गत केलेली नोंदणी रद्द केली आणि नियमित विक्रेते झालात. 10 ऑक्टोबर 2017 रोजी तुमची उलाढाल 50 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आणि 9 ऑक्टोबर 2017 रोजी तुमच्या जवळ खालील प्रमाणे साठा शिल्लक असेल –

इनपुट प्रकारमूल्य (रु.)भरणा केलेली ‘जीएसटी’ @ 18% (रु.)
कच्चा माल1,00,00018,000
अंशत: तयार असलेला माल50,0009,000
पूर्णपणे तयार असलेला माल1,50,00027,000
भरणा केलेला एकूण कर54,000

तुम्ही 54,000 रुपयांच्या पूर्ण ITC आणि भांडवली वस्तूंवरील ITC यांचा लाभ घेऊ शकता (सूचित केलेल्या टक्क्यांनुसार कमी).

मुक्त पात्र वस्तू किंवा सेवा करपात्र होतात तेव्हा

‘जीएसटी’ मुक्त म्हणून घोषित वस्तू किंवा सेवा करपात्र केल्या जातात तेव्हा, पुरवठा करपात्र होण्यापूर्वी एक दिवस आधी खालील गोष्टीवर ITC चा लाभ घेऊ शकता:

 • साठा असलेली साधने आणि पूर्णपणे किंवा अंशत: तयार असणार्या साधनाचा साठा, जे मुक्त सेवां संदर्भात येतात.
 • केवळ भांडवली वस्तू म्हणुन वापरात येणारा मुक्त पुरवठा. भांडवली वस्तूंवरील क्रेडिट काही टक्क्यांनी कमी होईल, जे तुम्हाला सूचित केले जाईल.

उदाहरण:तुम्हा जीएसटी मुक्त वस्तुंची निर्मिती करता. 5 डिसेंबर 2017 रोजी या मुक्त वस्तुं करपात्र करण्यात आल्या. 4 डिसेंबर 2017 रोजी तुमच्या जवळ (उत्पादनासाठी वापरण्यात आलेला मुक्त माल) खालील प्रमाणे साठा शिल्लक असेल –

क्लोजिंग स्टॉक – 4.12.2017
इनपुटमूल्य (रु.)भरणा केलेली ‘जीएसटी’ @ 18% (रु.)
कच्चा माल A3,00,00054,000
कच्चा माल B30,000  5,400
एकूण3,30,00059,400

उत्पादनासाठी वापरण्यात आलेला मुक्त माल करपात्र केल्या नंतर तुम्ही संपुर्ण ITC रुपये 59,400 चा लाभ घेऊ शकता. मुक्त पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या भांडवली वस्तूंवर सुद्धा तुम्ही ITC चा लाभ घेऊ शकता, जे काही टक्क्यांनी कमी असेल, जे तुम्हाला सूचित केले जाईल.

विक्री / विलिनीकरण / विभक्तीकरण / एकत्रीकरण / भाडेपट्टी / व्यवसाय हस्तांतरण घडुन येते तेव्हा

अशा कोणत्याही परिस्थितींमध्ये, जर उत्तरदायित्व हस्तांतरणासाठी विशिष्ट तरतूद असेल तर, विक्री / विलिनीकरण / विभक्तीकरण / एकत्रीकरण / भाडेपट्टी / व्यवसाय हस्तांतरण यांसाठी उपयोग न आणलेली ITC हस्तांतरित केली जाऊ शकते.

उदाहरण: मोहन इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राम इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आपला व्यवसाय विकला. विक्रीच्या वेळी, मोहन इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी 2,50,000 रुपयांच्या ITC चा लाभ घेतला नव्हता. विक्री करारात, मोहन इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेडची सर्व दायित्वे आणि मालमत्ता राम इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कडे हस्तांतरित केले जाईल असे मान्य केले गेले होते. या प्रकरणात, मोहन इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेडने उपयोगात न आणलेली 2,50,000 रुपये किंमतीची ITC राम इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कडे हस्तांतरित केली जाऊ शकते.

वस्तू आणि / किंवा सेवा अंशतः व्यवसाय व अंशतः काही इतर कारणांसाठी वापरल्या जातात तेव्हा

वस्तू आणि / किंवा सेवा अंशतः व्यवसाय व अंशतः व्यवसाय व्यतिरीक्त इतर कारणांसाठी वापरल्या जातात तेव्हा, फक्त व्यवसाईक कारणांसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू आणि / किंवा सेवांवर ITC चा लाभ घेता येतो.

उदाहरण:

तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते आहात आणि तुम्ही 3,00,000 रुपये किंमतीचे संगणक निर्मात्या कडुन खरेदी केलेत, ज्यावर 54,000 रुपये (@ 18%) जीएसटी भरणा केला गेला आहे. तुम्ही खरेदी केलेल्या संगणकांपैकी 1,00,000 रुपये किंमतीचे संगणक वैयक्तिक वापरासाठी घेतले आहेत. आणि उर्वरित संगणक ग्राहकांना विकले गेले. या प्रकरणात, केवळ व्यवसायासाठी वापरण्यात आलेल्या म्हणजेच 2,00,000 रु वर तुम्हाला ITC चा लाभ घेता येईल. त्यामुळे, येथे पात्र आयटीसी रुपये 36,000 (अनुक्रमे 2,00,000 * 18%) आहे.

वस्तू आणि / किंवा सेवा अंशतः करपात्र पुरवठा व अंशतः मुक्त पुरवठा यांसाठी वापरल्या जातात तेव्हा

वस्तू आणि / किंवा सेवा अंशतः करपात्र पुरवठा व अंशतः मुक्त पुरवठा यांसाठी वापरल्या जातात तेव्हा, फक्त करपात्र पुरवठा आणि शून्य मुल्य पुरवठा यांवर ITC चा लाभ घेता येईल. मुक्त असलेला पुरवठा आणि स्वीकारकर्त्याकडुन उलट शुल्क कर या आधारावर आकारला जाणारा पुरवठा यांवर ITC चा लाभ घेता येणार नाही.

उदाहरण: तुम्ही एक निर्माता आहेत. तुम्ही 1,00,000 रु किंमतीचा कच्चा माल खरेदी केला ज्यावर 18,000 रु जीएसटी (@ 18%) केला गेला आहे. हा कच्चा माल अंशतः करपात्र वस्तु A आणि अंशतः मुक्त वस्तु B यांसाठी वापरण्यात आला. तपशील खाली-दर्शविला गेला आहे –

इनपुटमूल्य (रु.)वस्तु A निर्मिती करण्यासाठी वापरण्यात आलेला भाग (करपात्र) (रु.)वस्तु B निर्मिती करण्यासाठी वापरण्यात आलेला भाग (मुक्त) (रु.)इनपुट वर भरण्यात आलेली जीएसटी (रु.)वस्तु A निर्मिती करण्यासाठी वापरण्यात आलेल्या भागावरील जीएसटी (करपात्र) (रु.)वस्तु B निर्मिती करण्यासाठी वापरण्यात आलेल्या भागावरील जीएसटी (मुक्त) (रु.)
कच्चा माल1,00,00060,00040,00018,00010,8007,200

तुम्ही वस्तु A निर्मिती करण्यासाठी वापरण्यात आलेला भागावरील 10,800 रुपये किंमतीच्या ITC चा लाभ घेऊ शकता, जे करपात्र आहे. वस्तु B निर्मिती करण्यासाठी वापरण्यात आलेला भागावरील 7,200 रुपये किंमतीच्या ITC चा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही, जे मुक्त आहे.

अपवादात्मक परिस्थिती

खाली नमद केलेल्या अपवादात्मक परिस्थितींमध्ये नियमांच्या आधारावर ITC चा लाभ घेतला जाऊ शकतो.

वस्तू लॉट्स किंवा हप्त्यांमध्ये प्राप्त होतात तेव्हा

वस्तू लॉट्स किंवा हप्त्यांमध्ये प्राप्त होतात तेव्हा, केवळ अंतिम लाॅट किंवा हप्ता प्राप्त झाल्यानंतर तुम्ही ITC चा लाभ घेऊ शकता.

उदाहरण: तुम्ही मोबाइल फोन विक्रेते आहोत. 1 ऑगस्ट 2017 रोजी, तुम्ही निर्मात्या कडुन 50 मोबाईल खरेदी केले, ज्यांचे प्रत्येकी मूल्य 5,000 रु आहे. मोबाइल फोन निर्माता पुढील दोन महिन्यांमध्ये, 25 मोबाइल दर महिना अशा रीतीने फोन पाठविल असे मान्य करण्यात आले. तुम्ही आयात केलेल्या पुरवठ्याची नोंदणी खाली- दर्शविली आहे –

आवक पुरवठा नोंदणी

दिनांकवस्तूंची माहितीप्रमाणदरएकूणCGSTSGST

IGST

दररक्कमदररक्कमदररक्कम
1st Sept ‘17Mobile phones505,0002,50,0009%22,5009%22,500 – –
 1st Oct ‘17Mobile phones 50 5,000 2,50,000 9%22,5009%22,500 – –
एकूण1005,00,00045,00045,000 –

येथे, जरी मोबाइल फोनचा लाॅट 1 सप्टेंबर 2017 रोजी मिळाला असेल तरीही केवळ शेवटचा लाॅट मिळाल्यानंतर म्हणजेच 1 ऑक्टोबर 2017 रोजी तुम्ही 90,000 रुपये किंमतीच्या ITC चा लाभ घेऊ शकता.

पाइपलाइन आणि टेलिकम्युनिकेशन टॉवर्स यांवर ITC

पाइपलाइन आणि टेलिकम्युनिकेशन टॉवर्स यांवर ITC चा लाभ खालील प्रमाणे घेता येऊ शकतो.

वर्षकमाल ITC लाभ
पाईपलाईन आणि / किंवा टेलिकम्युनिकेशन टॉवर प्राप्त झाले ते आर्थिक वर्षएकूण इनपुट कराच्या 1/3 कर भरणा
पुढील वर्षीमागील वर्षी घेतलेल्या क्रेडिट सह, एकूण इनपुट कराच्या 2/3 कर भरणा
त्यानंतरच्या कोणत्याही आर्थिक वर्षातशिल्लक इनपुट क्रेडिट

Example: ABC टेलिकम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडने एप्रिल 2017 मध्ये एका दूरसंचार टॉवरची खरेदी केली, ज्यावर 30 लाख रुपये जीएसटी भरणा करण्यात आला होता. ते खालील प्रकारे टॉवरवर ITC घेऊ शकतात:

वर्षकमाल ITC लाभ
201710 लाख
201810 लाख
201910 लाख

या लेखामध्ये, कोणत्या परिस्थितींमध्ये आपण ITC चा लाभ घेऊ शकतो व प्रत्येक परिस्थितींमध्ये कोणकोणत्या अटी लागू होतात हे शिकलो. आमच्या पुढील ब्लॉग मध्ये, कोणत्या परिस्थितींमध्ये आपण ITC चा लाभ घेऊ शकत नाही ते पाहूया.

लवकरच येत आहे:

ITC द्वारे न मिळणारे लाभ

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

209,275 total views, 77 views today