सर्व रजिस्टर्ड व्यावसायिक जे सध्या अप्रत्यक्ष कर प्रणाली मधे कर देत आहेत ते जी एस टी मधे आपोआप वळवण्यात येतील आणि त्यांना एक तात्पुरता रजिस्ट्रेशन आई डि देण्यात येईल, जी एस टी मधे येताना भरलेल्या माहितीचे प्रमाणीकरण झाल्यानंतर पक्का रजिस्ट्रेशन नंबर पुरवण्यात येईल. त्याच प्रमाणे जे व्यावसायिक सध्या कम्पोजिशन कर प्रणाली मधे आहेत ते सुद्धा जी एस टी कर प्रणाली मधे परिवर्तीत केले जातील.

जी एस टी प्रणाली मधे कर भरणारा व्यक्ती ज्याची वार्षिक उलाढाल ५० लाखांच्या वर नाही, कम्पोजिशन कर . आकारणी करिता पात्र ठरतात, पण इथे सुद्धा काही नियम आणि अटी आहेत, जी एस टी नुसार एक कम्पोजिशन डिलर सामान्य डिलर बनू शकतो.

कम्पोजिशन डिलर वरुन सामान्य डिलर बनतांना, सामान्य डिलर करिता ज्या नियम आणि अटी आहेत त्यांचे पालन करण्याची हमी भरावी लागते तेव्हाच व्यावसायीक घेत असलेल्या सेवांवर इनपुट क्रेडिट घेऊ शकतो तर देत असलेल्या सेवांवर जी एस टी कर लावू शकतो.

“हे सर्व वाचतांना तुमच्या मनात विचार आला असेल की कम्पोजिशन डिलर सामान्य डिलर बनताना जर त्याने आधीच कच्च्या मालावर कर दिलेला असेल तर त्याचे काय होईल?”’.

आता ह्या विषयाची माहिती आपण सविस्तर बघुया.

एक कम्पोजिशन डिलर चे सामान्य डिलर कडे वळण्याचे कारण खालील प्रमाणे राहू शकतात:

  • स्वतःच्या इच्छेने जी एस टी कडे वळणे
  • कायद्याने जी एस टी कडे वळावे लागणे, वार्षिक उलढाल ५० लाखांच्या पार गेल्यास.

सामान्य डिलर बनल्या नंतर तुमच्या कडे क्लोसिंग स्टॉक वर असलेले कराचे क्रेडिट इनपुट , आर्धे झालेले काम तसेच पूर्ण झालेले काम ह्या सर्वांचे क्रेडिट इनपुट घेता येणे शक्य होते.

क्लोजिंग क्रेडिट इनपुट घेण्याकरिता आवश्यक असलेली पात्रता

खाली नमूद परिस्थितींमधे तुम्ही क्लोजिंगक्रेडिट इनपुट घेऊ शकता:

  • क्लोजिंग क्रेडिट इनपुट हे कच्च्या मालाच्या, आर्ध्या पूर्ण झालेल्या मालाच्या रूपात किंवा पूर्ण झालेल्या मालाच्या रूपात असु शकतात, फक्त त्यावर कर भरण्यात येईल ह्याची खात्री असावी.Conditions for availing GST ITC on closing stock
  • क्लोजिंग क्रेडिट इनपुट मधे भरण्यात आलेले व्ही ए टी हे आधीच्या नियामांवरच आधारित असले पाहिजे, आणि त्याचा उपयोग फक्त वि ए टी च्या कर प्रणाली मधे करण्यात आला पाहिजे.
  • जर तुमच्याकडे बिल किंवा एखादा दुसरा दस्तएवज असेल ज्यात तुम्ही कर भरले असल्याची माहिती असेल.Tax documents needed for claiming GST Input tax credit
  • जर तुमच्या बिळाच्या रक्कमीची शेवटची तारीख जी एस टी मधे आल्यानंतर पासून १२ महिन्यांची असेल.Carry forward Input tax credit to GST

    वरील सर्व परिस्थिती जुळल्यावर क्रेडिट इनपुट देण्यात येतो.

आम्हाला तुमची मदत पाहिजे
कृपया तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्स मधे नोंदवा आणि तुम्हाला जी एस टी च्या कोणत्या मुद्द्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला सांगा, जेणेकरून पुढल्या वेळी तुमच्याकरिता ते घेऊन येता येईल.

आवडले? आपल्या मित्रांसोबत पण शेयर करा.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

81,055 total views, 17 views today