(English) Language

  • English
  • Hindi
  • Marathi
  • Kannada
  • Telugu
  • Tamil
  • Gujarati

8 नोव्हेंबर 2016 रोजी, भारताच्या पंतप्रधानांनी 500 रुपये, 1000 रुपये नोटांचे आर्थिक मूल्य निष्फळ करण्यात आले असल्याची घोषणा केली. ही बातमी आपल्या सारख्या अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारी ठरली! तथापि, आपण काळजीपूर्वक निरीक्षण केले तर सरकारने सर्वप्रथम बँक खाती उघडण्याच्या, बॅंक खाती आधार क्रमांकाला जोडण्याच्या, सर्वसाधारण कर माफी कार्यक्रम, कामचुकार जनतेसाठी सावधानता देणारी घोषणा आणि इतर बर्याच मोहिम जाहीर केल्या, यातून आपल्याला असे दिसेल की सरकारने हाती घेतलेल्या ह्या उपाययोजना एका क्रमाने विशिष्ट वेळी अमलात आणण्यासाठी विचारपूर्वक पद्धतीने सुनियोजित केलेल्या होत्या.

नोटा निष्फळ करण्याच्या पूर्वसंध्येला, 20 नोव्हेंबरला, आयटी विभागाने 2.5 लाखांपेक्षा जास्त ठेवी बँक खात्यात जमा करणार्या कुठल्याही व्यक्तीला नोटीस पाठवू, अशी घोषणा केली.

आता, व्यवसायात सरकारच्या या भूमिकेला कसे बघावे? यातून शासक (सरकार) स्पष्ट संकेत देत आहेत की ते ह्या बाबतीत अत्यंत गंभीर आहेत, आणि त्याचे पालन निष्टेने करण्यासाठी धाडसी पावले उचलण्यास तयार आहे. यातून असे समजते की कर खाते (इंकोमे टॅक्स डिपार्टमेंट, वसुली विभाग) आईटी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून 2.5 लाख पेक्षा अधिक रक्कम जमा करणार्या व्यक्ती ओळखण्यासाठी विविध बँकांकडून मोठ्या प्रमाणात माहिती (डेटा) एकत्र करत आहे. सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे, ह्या कायद्याची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करण्यात आईटी विभागास सर्व बाबींसाठी पाठीचा कणा करण्याची सरकारची खटपट यातून दिसून येते.

लहान व्यवसायांवर नोटबंदीचा कसा अपरिणाम झाला आहे?

भास्कर हा मल्लेश्वरम, बंगळुरू येथला माझ्या शेजारच्या किरकोळ किराणा दुकानाचा मालक आहे. त्याचा व्यवसाय प्रामुख्याने रोख नोटांच्या देवाण-घेवाण आणि त्यांच्या संचालनाने चालतो. तो जमा-हिशेबाची नोंद राखत नाही. घरपोच सुविधा देण्यासाठी त्याला गिर्हाईक फोन अथवा व्हाट्सअॅपच्या साहाय्याने कळवतात, ज्यात सहसा पैसे माल पोहोचविल्यानंतर मिळतात. त्याचे काही नेहमीचे ग्राहक महिन्यातून एकदा देयके भरतात. दुकानदाराचा लेखापाल कर भरण्यासाठी वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर कर गणना करतो.

10 नोव्हेंबर रोजी, भास्कर नेहमीप्रमाणे बॅंक खात्यात रोख जमा करायला गेला, आणि त्याची विचारपूस होत आहे हे पाहून तो गोंधळला, आश्चर्याचा धक्काच बसला! तो सहसा जमाहिशेबाची कुठली नोंद ठेवत नसल्यामुळे त्याच्या वरती कठीण परिस्थिती उद्भवलेली होती, कारण उत्पन्न म्हणून तो आपली जितकी संपत्ती जाहीर करतो त्याहून अधिक रोकड रक्कम त्याच्याकडे तेव्हा होती.

भास्करने जमाहिशेब आणि पावत्यांची पद्धतशीर यादी करण्याची एक साधी शिस्त ठेवली असती तर काय झाले असते? त्याची हीच यादी लेखापालाने प्रलंबित कराची गणना करण्यासाठी वापरली असती. भास्करला ही खाती पुस्तके वापरून त्याच्या रोखीची स्थिती स्पष्ट करणे सोपे झाले असते.
व्यवसाय समस्या मुक्त ठेवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे रक्कम व पावती यांतील व्यवहाराची नोंद सुरू करणे आहे. अशा प्रकारे नोंदीने व्यवहार करण्याची शिस्त बाळगून व्यवसाय खरेदीदार, विक्रेते, देय, प्राप्तव्यावर, देयके, पावत्या इ. पद्धतशीर माहिती ठेऊ शकतात, आणि नंतर बँक स्टेटमेन्ट सोबत तुलना करू शकतात. जेव्हा पैसे कोणाला द्यावयाचे आहेत याबद्दल शंका असेल, हे काम खूप सोपे होणार जेव्हा आपल्याला अन्य कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, त्याचा प्राधान्य क्रम काय आहे, किती रोख आपल्या बँकेत आहे, आणि तुम्ही किती पैसे येत्या काही दिवसांत कमावणार आहे हे माहित असल्यास होईल.

व्यवसायातील अटी बदलून निर्माण होणार्या अनिश्चिततेमुळे आपल्यावर कमीतकमी परिणाम होत राहील कारण आपल्याला या प्रसंगाशी कसा समन्वय घालायचा आहे याची कल्पना राहील आणि आपण विश्वसनीयरित्या निर्णय घेऊ शकतात. नोंदी सुरू करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हिशेब सॉफ्टवेअर वापरून सर्व कामकाज सुरू करणे आहे. आपला व्यवसाय अद्याप स्वयंचलित नसेल, तर सुधारणेच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून हिशेब सॉफ्टवेअर वापरून व्यवसाय सुरू करणे हा एक अत्यंत महत्वाचा सल्ला असु शकतो. हे आपल्याला काही महिन्यात जेव्हा जीएसटी अमलात येईल तेव्हा बाजारात होणार्या बद्लास सामोरे जाण्यास तयार ठेवेल आणि विशेष मदत करेल.

सध्या सुरू असलेल्या चलनातील असुविधेमुळे अनेक व्यवसाय प्लास्टिक कार्ड, बॅंकेद्वारा ऑनलाइन हस्तांतरण आणि मोबाइल वॉलेट्स द्वारा देयक स्विकारु लागली आहेत. व्यवसायावरती या ई-पेमेंट्सचा काय परिणाम होऊ शकतो? ज्या पद्धतीने व्यवसाय अस्तित्वात येतात आणि नंतर टिकून राहतात यावरती मोठा परिणाम करणारी अशी कुठली दूरदर्शी योजना आहे काय? अधिक माहितीसाठी आमच्या संपर्कात राहा!

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

238,206 total views, 471 views today

Avatar

Author: Santosh AR