(English) Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati
एका अर्थव्यवस्थेत सर्व वस्तू आणि प्रदान केलेल्या सेवांचे मूल्य काही निकषांवर आधारित असते. भारतात सध्याच्या चालू कर पद्धतीत, ह्या मूल्याची विविध प्रकारे गणना केली जाते. याचाच एक नमुना खालील टेबल मध्ये दाखविला आहे:

कर वस्तू / सेवा मूल्य
अबकारी करव्यवहार मूल्य किंवा वस्तूंची संख्या किंवा एमआरपी यावर आधारित
व्हॅटविक्री मूल्यावर आधारित
सेवा करप्रस्तुत सेवेच्या करपात्र मूल्यावर आधारित

वस्तू आणि सेवांचे मूल्यांकन

चालू कर आकारणीची पद्धत

चालू व्यवस्थापनानुसार वस्तू आणि विविध सेवा यांची किंमत कशी ठरवली जाते हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊ:
सुपर कार्स ली. (कार निर्माते), रवींद्र ऑटोमोबाइल्सला (विक्रेते) वाहनांचे सुटे भाग 6000 रुपयात विकतात. ह्या सुटे भागांची विक्री किंमत 10000 आहे. रवींद्र ऑटोमोबाइल्स ला मिळालेले चलन (इन्व्हॉईस) खालील प्रमाणे आहे:

जीएसटी व्यवस्थापनात

आपण जीएसटी पद्धतीत वस्तू आणि सेवा यांच्या मूल्यांकनाची पद्धत स्पष्ट करण्यासाठी समान उदाहरण वापरले आहे:


* वाहनांच्या सुटे भागांवर 18% चा GST गृहीत धरून

जीएसटी पद्धतीत नुसार , उदा. देय किंमत, जी 6,000 रुपये आहे.

‘जीएसटी’ पद्धती मधील – अतिरिक्त शुल्क आणि खर्च

जीएसटी पद्धतीमध्ये अतिरिक्त शुल्क आणि इतर खर्च ( सवलती, पॅकिंग चार्जेस) हे कशा प्रकारे हाताळले जातात? ते व्यवहार मूल्य मध्ये समाविष्ट करायला हवे कि वगळायला हवे हे आपण पाहूया.
आपण पुढील उदाहरणाचा विचार करून हे समजून घेऊ.
सुपर कार लिमिटेड 4,00,000 रुपयांची कार रवींद्र ऑटोमोबाईल्सला विकते.

 • ते 5000 रुपये इतकी पॅकिंग शुल्क कारच्या खर्चामध्ये जोडतात.
 • ते दिवाळी योजनेचा एक भाग म्हणून किंमतीत 1% सूट प्रदान करतात,
 • सुपर कार लिमिटेड रवींद्र ऑटोमोबाईल्सला नेट बँकिंग द्वारे महिन्याच्या 31 तारखेच्या आधी पैसे पाठवल्यास 0.5% ची अतिरिक्त सवलत प्रदान करण्यास सहमती दर्शवतात. रवींद्र ऑटोमोबाईल्स नेट बँकिंग वापरून महिन्याच्या 31 तारखेपर्यंत पैसे जमा करते.

‘जीएसटी’ अंतर्गत, रवींद्र ऑटोमोबाईल्स साठी जारी केलेले चलन, असे दिसेल:


* कारवर 18% ची GST गृहीत धरून

चलनामध्ये,

 • 5,000 रुपयाचे पॅकिंग शुल्क व्यवहार मूल्यात समाविष्ट आहे.
  पॅकिंग शुल्क किंवा कुठलाही आनुषंगिक खर्च वस्तूच्या किंवा सेवेच्या वितरणा आधी किंवा वितरणाच्यावेळी व्यवहार मूल्यात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
 • 1% ची सवलत व्यवहार मूल्यातुन वजा केली जाते.
  पुरवठ्याच्या वेळी किंवा आधी दिलेली सवलत, आणि जिचा चलनातं रेकॉर्ड आहे, ती व्यवहार मूल्यातून वजा केली जाऊ शकते.
 • 0.5% ची सवलत चलनातून वजा केलेली नाही. 0.5% ची सूट पुरवठा नंतर दिला गेली आहे, त्यामुळे ती चलनात दर्शविले जाणार नाही. तथापि, सवलत पुरवठ्यावेळी माहित होती म्हणून, सवलतीला विशिष्ट चलना मध्ये जोडले जाईल आणि सवलती दिलेली रक्कम व्यवहार मूल्यातून कमी केली जाऊ शकते. या साठी, सुपर कार लिमिटेड रवींद्र ऑटोमोबाईल्सला एक 2,360 रुपयाची क्रेडिट टीप देऊ करेल (4,00,000 रुपयाचे 0.5 टक्के = 2,000 रुपये+ 2,000 वर 18 % जीएसटी = रुपये 360), आणि संबंधित कर चलना सोबत ही क्रेडिट नोट जोडणे आवश्यक आहे .
  सवलत पुरवठा केल्यानंतर दिला गेला पण त्याबाबतीत व्यवहारा आधी, नंतर किंवा पुरवठा करतेवेळी करार झाला असेल आणि तर ते विशेष संबंधित पावत्यांशी जोडले जाऊ शकते, आणि व्यवहार मूल्य वजा केले जाऊ शकते.

ह्या नियमाला काय काय अपवाद आहेत?

उत्तर: वितरणानंतर दिली गेलेली सवलत, ज्याची पूर्वी कल्पना नव्हती.
आपण एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊ.
सुपर कार लिमिटेड 4,00,000 रुपयांची कार रवींद्र ऑटोमोबाईल्सला विकते. स्थायी करारानुसार 30 दिवसांच्या आतील क्रेडिट कालावधीत पैसे भरण्याची वैधता दिली आहे. तथापि, एक गंभीर समस्येमुळे दोन दिवसात सुपर कार्स लिमिटेड, रवींद्र ऑटोमोबाइल्स ला पैसे जमा करण्यास सांगते, आणि, 2 दिवसांच्या आत यशस्वीरित्या भरणा केल्यास अतिरिक्त 2% सवलत देण्यात येईल. रवींद्र ऑटोमोबाईल्स 2 दिवसांच्या आत पैसे भरते.
अशा परिस्थितीत, सवलतीच्या बाबतीत पुरवठा वेळी माहिती नव्हती, त्यामुळे जीएसटी चा हिशेब करताना व्यवहार मूल्यात कपात करण्याचा दावा होऊ शकत नाही.
व्यवहार मूल्यात सवलतीमुळे पडणाऱ्या प्रभावाचा सारांश खाली दिला आहे-

सवलतीचा प्रकार व्यवहार मूल्यात दिसून येणारा परिणाम
सवलत वितरणा आधीच किंवा वितरण करते वेळी दिली असल्यास, जिचा उल्लेख आधीच बिलाच्या पावती मध्ये असतो.व्यवहार मूल्यात कपात करण्याचा दावा केला जाऊ शकतो
सवलत पुरवठ्यानंतर दिली गेली असेल पण सवलत वितरण करण्याच्या वेळी अथवा वितरणा आधी देण्यात आली असल्यास, जिचा बिलाच्या पावती मध्ये उल्लेख असू शकतो.व्यवहार मूल्यात कपात करण्याचा दावा केला जाऊ शकतो
वितरणानंतर दिली गेलेली सवलत, ज्याची पूर्वी कल्पना नव्हतीव्यवहार मूल्यात कपात करण्याचा दावा होऊ शकत नाही.

 

विविध व्यवहार मूल्य/ शुल्क यांच्या पुरवठ्यादरम्यान होणाऱ्या खर्चाचा तपशील खाली दर्शविला आहे-

पुरवठ्यासाठी येणारा खर्च व्यवहार मूल्यावर होणारे परिणाम
आनुषंगिक खर्च (कमिशन आणि पॅकिंग)व्यवहार मूल्यात समाविष्ट
व्याज / उशीरा भरलेली शुल्क / पैसे उशिरा दिल्यामुळे पुरवठादाराकडून होणारी दंड आकारणीव्यवहार मूल्यात समाविष्ट
केंद्र व राज्य सरकार द्वारे प्रदान केलेले अनुदान वगळता इतर अनुदानव्यवहार मूल्यात समाविष्ट
‘जीएसटी’ शिवाय इतर कुठलाही करव्यवहार मूल्यात समाविष्ट
प्राप्तकर्ताद्वारे भरण्यात आलेली पुरवठादाराची देय रक्कमव्यवहार मूल्यात समाविष्ट

जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) देशातील कर व्यवस्थापनेत महत्वाचा बदल घडून आणेल अशी अपेक्षा आहे. कर प्रणाली सध्या सोपी केली आहे म्हणून उत्पादन किंमत, वस्तू आणि सेवा यांचे मूल्यांकन, आणि इतर विविध पैलू यांत लक्षणीय बदल अनुभवास येऊ शकतो.

 

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

279,803 total views, 499 views today