व्यवसायामध्ये, परत केलेल्या वस्तूंची विक्री सामान्य आहे. सद्ध्याचा शासनकाळात, विक्रीच्या एकूण उलाढालीतून परत केलेल्या वस्तू कमी करण्याची परवानगी दिली जाते, जर का त्या वस्तू विशिष्ट वेळेच्या मर्यादेत परत केलेल्या असतील. कर सवलतीसाठी ची पात्रता राज्या राज्यानुसार बदलते, परंतु साधारणपणे ती विक्रीच्या तारखेपासून ६ महिन्यांची असते.

जीएसटी, अप्रत्यक्ष कर मधील प्रमुख सुधारणा १ जुलै २०१७ पासून अमलात येण्याची शक्यता आहे. पुरवठा हि करपात्र घटना असल्यामुळे, जीएसटीपूर्वी विक्री केलेल्या वस्तूंवरील परिणाम समजून घेणे हे व्यावसाईकांना अत्यंत गरजेचे आहे, परंतु परत केल्या वर अथवा जीएसटी चा अमलबजावणी नंतर.

हे सुद्धा वाचा

जीएसटी वर् जाणे; नोंदणीकृत व्यवसायासाठी

जीएसटी वर् जाणे; मला क्लोसिंग स्टॉक वर इनपुट मिळू शकेल का?

वस्तू आणि सेवांचा पुरवठा; याचा अर्थ काय?

काही प्रश्न जे तुम्हाला असु शकतात

 • नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने करपात्र माल परत केल्यास काय होईल?
 • अनोंदणीकृत व्यक्तीने करपात्र माल परत केल्यास काय होईल?
 • वर्तमान शासना अंतर्गत करमुक्त असलेल्या परंतु जीएसटी अंतर्गत करपात्र असलेला माल परत केल्यास काय होईल?

सहजपणे समजून घेण्यासाठी आपण याचे वर्गीकरण करूया:

 • करपात्र वस्तू परत करणे
 • सूट दिलेल्या वस्तू परत करणे

करपात्र वस्तू परत करणे

आपण अशी परिस्थिती समजून घेऊ ज्यात करपात्र माल जीएसटी अगोदर विकला गेला आहे, परंतु जीएसटी च्या अंमलबजावणी वर अथवा नंतर परत केला जातो. माल हा नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत व्यक्तीकडून परत केला जाऊ शकतो.

परिस्थितीस्पष्टीकरणउदाहरणकरपात्रता
नोंदणीकृत करपात्र व्यक्तीद्वारे परत करणेनोंदणीकृत व्यक्तीद्वारे परतिचा करपात्र माल हा पुरवठा समजला जाईल आणि जीएसटी आकारला जाईल. याचे कारण असे की, माल खरेदी केल्याच्या तारखेस, प्राप्तकर्त्याद्वारे देण्यात आलेला कर इंपॅक्ट टॅक्स क्रेडिट म्हणून अनुमत केला गेला आणि त्यानंतर त्याचा उपयोग त्याच्या कडून करण्यात आला, किंवा त्याला जीएसटी मधे पुढे इंपुट टॅक्स क्रेडिट म्हणून समावेश करण्याची अनुमती दिली.

जीएसटी अंतर्गत अशा वस्तूंची परतफेड केल्यावर, वस्तू परत करणार्या व्यक्तीने जीएसटी वर शुल्क आकारले पाहिजे आणि जीएसटी जो विक्रीस दिलेल्या परताव्या वर आकारला आहे तो मूळ विक्रेत्यास इंपुट टॅक्स क्रेडिट असल्याची परवानगी दिली जाईल..

 

रवींद्र ऑटोमोबाइल्स हा कर्नाटकमध्ये स्पेअर पार्ट्सच्या मालाचा एक नोंदणीकृत विक्रेता आहे. १५ जून, २०१७ रोजी, रवींद्र ऑटोमोबाइल्सने कर्नाटकमधील नोंदणीकृत डीलर राजेश ऑटो पार्ट्सला १४.५% व्हॅट ने १,००,००० किमतीचे ३० स्पेयर पार्ट्स विकले. ५ जुलै, २०१७ रोजी, राजेश ऑटो पार्ट्सने १५ स्पेयर पार्ट्स रवींद्र ऑटोमोबाइलमध्ये परत केले.

राजेश ऑटो पार्ट्सकडून वस्तूंच्या परतफेडीला पुरवठा समजण्यात येईल, आणि जीएसटी लादला जाईल. म्हणून, खरेदी परत घेताना, राजेश ऑटो पार्ट्स १८% ने जीएसटी चा शुल्क आकारेल.
अनोंदणीकृत व्यक्तीकडून करपात्र मालाचा परतावासध्याच्या काळात अनोंदणीकृत व्यक्तीकडून करपात्र मालाचा परतावा झाल्यास विक्रेता करपात्र मालाचा भरलेला कर परत घेण्यासाठी पात्र असतो.
विक्रेत्याद्वारे दावा केलेला परताव्यावर खालील सूचीबद्ध केलेल्या अटी लागू असतील:

 1. परतीच्या मालाच्या विक्रीची तारीख जीएसटीच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून ६ महिन्यांपेक्षा जास्त नसावी.
 2. परत केलेला माल जीएसटीच्या अंमलबजावणी पासून ६ महिन्यांपर्यंतचा च असावा.
रवींद्र ऑटोमोबाइल्स हा कर्नाटकमध्ये स्पेअर पार्ट्सच्या मालाचा एक नोंदणीकृत विक्रेता आहे. २५ जून, २०१७ रोजी, रवींद्र ऑटोमोबाइल्स ने किंमत १०,००० रुपये असलेले स्पेअर पार्ट्स १४.५% वॅट ने श्री. कुमार या ग्राहकाला विकले. २ जुलै,२०१७ रोजी श्री. कुमार यांनी ते स्पेअर पार्ट्स रवींद्र ऑटोमोबाइल्सला परत केले.रवींद्र ऑटोमोबाइल्स १,४५० रुपये परत घेण्यासाठी पात्र आहे. याचे कारण असे की, विक्रीचा दिनांक जीएसटीच्या अंमलबजावणी पासून ६ महिन्या पर्यंतचा आहे, आणि स्पेअर पार्ट्स चा परतीचा कालावधी जीएसटीच्या अंमलबजावणी पासून ६ महिन्या पर्यंतचा आहे.

सूट दिलेल्या मालाचा परतावा

अशा परिस्थितीचा विचार करा जिथे जीएसटी च्या आधी सूट दिलेले माल विकले जातात, परंतु हा माल करपात्र आहे आणि जीएसटीच्या अंमलबजावणी नंतर परत केला जातो.

परिस्थितीस्पष्टीकरणउदाहरणकरपात्रता
नोंदणीकृत करपात्र व्यक्तीद्वारे परतावासूट दिलेल्या मालावर, जे सध्याच्या कायद्यानुसार विकले जातात आणि जीएसटीचा अंमलबजावणी नंतर परत केले जातात, त्यावर कोणताही कर आकारला जात नाही. हे पुढील अटींनुसार लागू होते:

 1. त्या मालाची विक्रीची तारीख जीएसटीच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून ६ महिन्यांपेक्षा जास्त नसावी.

2.मालाची परतफेड हि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत करणे गरजेच आहे.

 1. १५ जून, २०१७ रोजी रवींद्र ऑटोमोबाइल्सने १,००,००० रुपये किमतीच्या मालाची विक्री केली, जी वॅट मधून माफ आहे. २० जून,२०१७ रोजी, माल रवींद्र ऑटोमोबाइल्सला परत आला.
 2. १५ जून, २०१७ रोजी रवींद्र ऑटोमोबाइल्सने १,००,००० रुपये किमतीच्या मालाची विक्री केली, जी वॅट मधून माफ आहे. २० जानेवारी २०१८ रोजी, उर्वरित माल रवींद्र ऑटोमोबाइलमध्ये परत करण्यात आला.

 

 1. वस्तू परत केल्यावर, कोणतेही कर देय नाही. याचे कारण असे की, विक्रीचा कालावधी जीएसटीच्या अंमलबजावणीपूर्वी ६ महिन्यांच्या आत आहे, आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत माल परत मिळाला आहे.2. परतिच्या मालावर कर लागू आहे. याचे कारण की, जीएसटीच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आतमध्ये माल परत आला नाही.
करपात्र मालाचा अनोंदणीकृत व्यक्तीद्वारे परतावासध्याच्या कायद्यानुसार जो माल सूट देऊन विकला जातो, आणि अनोंदणीकृत व्यक्तीद्वारे जीएसटीच्या काळात परत केला जातो, अशा परताव्यावर कोणताही कर लागू होत नाही.२५ जून, २०१७ रोजी, रवींद्र ऑटोमोबाइल्स ने १०,००० रुपये किंमतीचा माल श्री. कुमार या ग्राहकाला विकला. हा वॅट मुक्त

होता. २ जुलै, २०१७ रोजी, श्री. कुमार यांनी तो माल रवींद्र ऑटोमोबाइल्सला परत केला.

अशा परताव्यावर कोणताही कर लागू नाही.

आम्हाला तुमची मदत हविए

कृपया आपला या सत्राचा अभिप्राय खाली कॉमेंट वापरुन कळवावा. शिवाय तुम्हाला कोणत्या जीएसटी(वस्तू एवं सेवा कर) शी संबंधित अशा विषयांवर शिकायला जास्त आवडेल हे कळवावे, आम्हास ते आमचा मजकूर योजनेमध्ये समाविष्ट करण्यास आनंदच होईल.

हे मदतीचे वाटले? खालील बटनाचा वापर करून इतरंबरोबर शेअर करा.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

68,183 total views, 23 views today