आपला देश जीएसटी लागू होण्याच्या अग़दी काठावर उभा आहे, जी एक संयुक्त अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे. जीएसटी अप्रत्यक्ष कर आकारणी प्रक्रियेत होणारी सर्वात मोठी करप्रतिय सुधारणा आहे आणि यात अप्रत्यक्ष कर समाविष्ट करण्यात आले आहेत. जीएसटीमध्ये पुरवठा साखळीमधील आणि राज्य सीमेबाहेरील इनपुट टॅक्स क्रेडिटचा एकसंध प्रवाह अंतर्भुत केला गेला आहे (उत्पादकांपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत). तसेच, जीएसटी अंतर्गत कोणत्याही प्रकारचा पुरवठा करणे करपात्र होणार आहे, उत्पादन, व्यापार आणि सेवांची तरतूद या संकल्पना अप्रासंगिक मानल्या गेल्या आहेत.

पुरवठा या संज्ञेमध्ये हस्तांतरण समाविष्ट आहे. विचारात न घेता करण्यात येणार्या कोणत्याही विशिष्ट पुरवठा संबंधीत जीएसटी अंतर्गत करपात्रतेचा अर्थ असा होतो की असे साठा हस्तांतरण करपात्र राहतील. व्यवसायांना त्याचा प्रभाव समजणे अत्याआवश्यक आहे. येथे, आम्ही व्यवसायांसाठी करण्यात येणार्या साठा हस्तांतरणावर जीएसटीमुळे पडणारा प्रभाव, तुम्हाल समजावुन देणार आहोत.

साठा हस्तांतरण संबंधीत करपात्रता

केंद्रीय उत्पादनात, उत्पादित वस्तूंचा साठा हस्तांतरीत करणार्या नोंदणीकृत कंपनीला उत्पादनाच्या 100% +10% किमतीवर अबकारी शुल्क द्यावे लागेल आणि व्हॅट अंतर्गत, फॉर्म फ सादर केल्यास, साठा हस्तांतरण करपात्र राहणार नाही. तथापि वस्तूंच्या खरेदीवरील इनपुट व्हॅट विशिष्ट टक्केवारीनुसार परत करायला हवा जे राज्यनिहाय भिन्न आहे.

Branch Stock Transfer under VAT and Excise

जीएसटी अंतर्गत, a href=”http://blogs.tallysolutions.com/gst-supply-goods-services/” target=”_blank”>हस्तांतरण करण्यात येणार्या साठ्यावर कर आकारला जाईल आणि भिन्न व्यक्तीच्या व्याख्येनुसार, शाखांना भिन्न संस्था मानले जाईल. त्यानुसार, खालील दोन प्रकरणांमध्ये केल्या जाणार्या कोणत्याही साठ्याचे हस्तांतरण करपात्र राहील:

  • इन्ट्रास्ट्रेट स्टॉक ट्रान्स्फर: जेव्हा एका राज्यात एकाच राज्यात एकापेक्षा अधिक नोंदणी असते
  • इंटर स्टेट स्टॉक ट्रान्सफर: विविध राज्यातील दोन संस्थांमधील हस्तांतरण करपात्र आहे

Branch stock transfers under GST

जीएसटी अंतर्गत साठा हस्तांतरणावरील करपात्रतेमुळे रोख प्रवाहांवर परिणाम होईल. कारण साठा हस्तांतरीत करतेवेळी कर भरणा करावा लागेल, आणि साठ्याचा वापर करतेवेळी प्रभावीपणे ITC चा वापर प्राप्तकर्त्या शाखेद्वारे केला जाऊ शकतो. म्हणून जीएसटी अंतर्गत, साठा हस्तांतरणवर अवलंबुन असणार्या व्यवसायांसाठी, खास करून फार्मा आणि FMCG वस्तूंच्या बाबतीत, कर प्रणालीमुळे कामकाजासाठी आवश्यत भांडवल वाढेल. SME साठी हे एक आव्हान असेल जे कमी भांडवलासह कार्य करतात.

एखादा हंगामी व्यवसाय विचारात घेऊया जेथे संपूर्ण वर्षभर उत्पादन होते परंतु विशिष्ट हंगामात विक्री केली जाते. अशा प्रकरणांमध्ये, निधी दीर्घ कालावधीसाठी अडवला जाऊ शकतो. याचे कारण असे की ज्या महिन्यात शाखेमध्ये साठा हस्तांतरीत केला जाईल त्या महिन्यात जीएसटी भरणा करणे आवश्यक आहे, परंतु ज्या महिन्यात विक्री केली जाते त्या महिन्यात क्रेडिटचा प्रभावीपणे उपयोग केला जाईल.

GST needs to be paid in the month in which branch transfers are doneClick To Tweet

इनपुट टॅक्स क्रेडिटवरील परिणाम

उत्पादनावरील इनपुट व्हॅट किंवा तयार वस्तूंच्या उत्पादनासाठी वापरात येणारा माल, जो हस्तांतरीत केला जाईल, कमी दरामध्ये उपलब्ध करुन दीला जाईल. परताव्याचा दर राज्यनिहाय भिन्न आहे. सामान्यत :, खरेदीवर कराचा भरणा केल्यास 4% पेक्षा जास्त इनपुट व्हॅट क्रेडिट उपलब्ध राहील. उदाहरणार्थ, जर खरेदीवर 12.5% व्हॅट भरला गेला असेल तर 4% पेक्षा अधिक म्हणजे 8.5% इनपुट व्हॅट क्रेडिट म्हणून उपलब्ध राहील आणि 4% परतावा केला जाईल. परत करण्यात आलेले ITC, उत्पादन खर्च म्हणून जोडण्यात येईल आणि त्याचा परिणाम झपाट्याने होईल.

व्हॅट
खरेदी किंमत (10 नग @रू. 10,000 /नग )1,00,000
व्हॅट @ 14.5%14,500
एकूण1,14,500
हस्तांतरीत साठा (10 नग)
व्हॅट (सवलत)
ITC पात्रता
अदा केलेला व्हॅट @14.5%14,500
4% पेक्षा अधिक पात्र ITC म्हणजे 10.5% (14.5% वजा 4%)10,500
परत करण्यात आलेले ITC @ 4%4,000
रू. 4,000 उत्पादनाचा खर्च म्हणून जोडला गेला

तथापि, जीएसटी अंतर्गत, साठा हस्तांतरणावरील कर पूर्णपणे इन्पुट टॅक्स क्रेडिट म्हणून उपलब्ध होईल. अशाप्रकारे, साठा झपाट्याने वाढ हाण्याच्या प्रभावापासून दूर राहतो आणि परिणामी, उत्पादन स्वस्त होते.

जीएसटी
खरेदी मूल्य (10 नग @रू. 10,000 /नग)1,00,000
CGST@ 9%9,000
SGST@ 9%9,000
एकूण1,18,000
हस्तांतरीत साठा (10 नग)
CGST@ 9% *9,000
SGST@ 9% *9,000
ITC पात्रता
CGST@ 9%9,000
SGST@ 9%9,000
18,000 ITC म्हणून पूर्णपणे उपलब्ध राहील

* जीएसटीचा दर 18% विचारात घेतला जातो. उदाहरणासाठी, खरेदी किंमत रु. 1,00,000 साठा हस्तांतरण मूल्य मानले जाईल आणि त्यानुसार जीएसटी गणना केली जाईल.

Under GST, tax paid on stock transfer will be fully available as input tax creditClick To Tweet

घोषणा पत्र नसणे = साठा हस्तांतरणाची जलद प्रक्रिया

व्हॅट अंतर्गत, साठा हस्तांतरीत करण्यात कर सवलत प्राप्त करण्यासाठी प्राप्तकर्त्या शाखेने साठा पाठविणार्या शाखेला फॉर्म फ पाठवायला हवा. साठा विक्रीसाठी नसुन, दुसर्या शाखेत पाठविला जात आहे हे सिद्ध करण्यासाठी हा फॉर्म मूल्यांकन प्राधिकरणाकडे सादर करायला हवा.

जीएसटी मध्ये सर्व घोषणा पत्रके रद्द केली जातील. परिणामी, साठा हस्तांतरणासाठी कोणतेही फॉर्म भरण्याची आवश्यकता नसेल. ज्यामुळे अशा गोष्टींमध्ये वेळ आणि प्रयत्न वाया न जाता साठा हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ होईल.

With GST, all the declaration forms will be abolished. As a result, there will be no need to furnish any forms for stock transfers.Click To Tweet

साठा हस्तांतरणावरील कर निश्चित करणे

सहसा, साठा हस्तांतरण म्हणजे मालाचे दुसर्या युनिट किंवा शाखेत स्थानांतरण करणे होते. जे कोणत्याही गोष्टी विचारात न घेता केले जाते. परंतु अशामुळे ज्या किंमतीवर कर आकारण्यात आला पाहिजे ते मूल्य निश्चित करण्यात जटिलता उद्भवते. केंद्रीय अबकारी कराअंतर्गत, अबकारी शुल्क मालच्या उत्पादनाच्या किंमतीच्या 100% + 10% आणि व्हॅट भरणे आवश्याक आहे, ज्यात साठा हस्तांतरण वगळण्यात आले आहे.

जीएसटी अंतर्गत, सामान्यपणे ज्या मूल्यावर जीएसटी भरणा करावा लागेल असे मूल्य व्यवहार मूल्य मानले जाईल. साठा हस्तांतरणाबाबत, व्यवहार मूल्य लागू करणे शक्य नाही कारण हस्तांतरण गोष्टी विचारात न घेता केले जाईल. त्यामुळे कर आकारण्यातील जटिलता जीएसटी अंतर्गत सुद्धा कायम राहील. या करामुळे एका प्रकारच्या आणि गुणवत्तेच्या वस्तूं समसमान होतील, किंवा हे उत्पादनाच्या खर्चावर जास्त लाभ घेण्यासारखेच असेल.

जीएसटी कायदे आणि नियम अंतिम रूपात आल्यानंतर याबाबत स्पष्टता येईल.

शाखांच्या गरजांची तपासणी करणे

आज, कराचा फायदा उठवण्यासाठी, अनेक व्यवसायांनी पूर्णपणे वैधानिक गरजांसाठी शाखांची स्थापना केली आहे. यामुळे व्यवसायासाठी स्थानिक व्हॅट भरणा करणे सोपे होते ज्यामुळे खरेदीदारास क्रेडिट प्राप्त होते. तसेच, साठा हस्तांतरण करपात्र नसल्याने शाखांमध्ये साठा हस्तांतरणाचे प्रमाण उच्च आहे.

जीएसटीमध्ये राज्याच्या सीमेबाहेर देखील इनपुट टॅक्स क्रेडिट प्रवाह एकसंध होईल, ज्यामुळे व्यवसायासाठी अनेक शाखा उघडण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे केवळ व्यवसाईक दृष्टीकोणातूनच शाखांचा विचार करणे आवश्यक होईल. शाखांच्या प्रभावी नियोजनाद्वारे शाखांची संख्या कमी केली जाऊ शकते आणि त्यामुळे शाखांमध्ये साठी हस्तांतरणाचे प्रमाण सुद्धा कमी केले जाऊ शकते.

क्रॉस ब्रांच हस्तांतरणाचा परिणाम समजून घेणे

मागणी आणि मुबलक उपलब्धता असल्यामुळे, एखादी शाखा क्रॉस ब्रांच हस्तांतरणात गुंतली जाऊ शकते, म्हणजे, माल विविध शाखांमधून अनेक वेळा हस्तांतरित होऊ शकतो. उदाहरणार्थ, मुख्य कार्यालयामधुन चेन्नईमधील शाखेकडे साठा हस्तांतरण केला गेला. हाच साठा पुन्हा चेन्नईमधुन बैंगलोरला हस्तांतरित केला गेला. आज, असे हस्तांतरण कर मुक्त आहे. जीएसटी अंतर्गत, असे करणे महागत पडेल. कारण, प्रत्येक हस्तांतरणावर, जीएसटी भरणा करावा लागेल आणि ज्यामुळे प्रत्येक शाखेमधील रोख प्रवाहावर परिणाम होईल. हे टाळले जाणे आवश्यक आहे आणि प्राथमिक वेअरहाऊस किंवा शाखेतून थेट साठा हस्तांतरण करणे फायदेशीर ठरेल.
तथापि, मालाची उच्च मागणी असलेल्या शाखेकडे साठा हस्तांतरित करत व्यवसायांत फायदा घेतला जाऊ शकतो. अशा प्रकारे त्वरीत मालाचा वापर केला जाईल आणि व्यवसायाच कार्यरत असलेल्या भांडवलावर कमी परिणाम होईल.

Under GST, it is better to avoid cross branch transfers as tax needs to paid on each transferClick To Tweet

निष्कर्ष

जीएसटी अंतर्गत साठा हस्तांतरण करपात्र असले, तरीही हा कर पूर्णपणे क्रेडिट म्हणून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अस्तित्वात असलेल्या विद्यमान कर प्रणालीमधील करात झपाट्याने वाढ होण्याचे्या प्रभावाचे उच्चाटन होईल, आणि परिणामी, उत्पादन खर्च कमी होईल. असे कामकाजाच्या भांडवलावर बंधने आणुन ते कमी करण्यासाठी केले जात असले तरीही, शाखांचे प्रभावी नियोजन आणि क्रॉस ब्रांच हस्तांतरणांचा प्रभावी वापर करत भांडवलावर होणारा परिणाम कमी केला जाऊ शकतो.

हा लेख तेजस गोयंका यांनी लिहिला आहे, कार्यकारी संचालक, टॅली सोल्यूशन्स, हा लेख मूलतः द इकॉनॉमिक टाइम्स मध्ये प्रकाशित करण्यात आले होते

योगदानकर्ते: पगल टी आणि येरब ए

आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे
कृपया खाली कमेंट करुन या ब्लॉग पोस्टबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तसेच जीएसटी संबंधित कोणत्या गोष्टी बद्दल तुम्हाला अधिक जाणून घेण्याची ईच्छा आहे हे देखील आम्हाला कळवा, आम्हाला आमच्या सामग्री योजनेमध्ये ते समाविष्ट करण्यात आनंद होईल.

ही पोस्ट उपयुक्त वाटली? खालील सोशल शेअर बटणे वापरून इतरांसोबत शेअर करा.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

99,701 total views, 291 views today

Yarab A

Author: Yarab A

Yarab is associated with Tally since 2012. In his 7+ years of experience, he has built his expertise in the field of Accounting, Inventory, Compliance and software product for the diverse industry segment. Being a member of ‘Centre of Excellence’ team, he has conducted several knowledge sharing sessions on GST and has written 200+ blogs and articles on GST, UAE VAT, Saudi VAT, Bahrain VAT, iTax in Kenya and Business efficiency.