जीएसटी कडे बघितले असता ते एका वरदानासारखे भासते, उपभोक्त्यांकरिता कमी किंमतीत वस्तू मिळणे तसेच व्यवसायिकांकरिता खूपच सोपी अशी कर प्रणाली, ज्यात त्यांना भांभावून जायची गरज भासणार नाही, त्याच अनुषंगाने शासनाकरिता – कधी मिळाला नाही इतका कर मिळण्याची शाश्वती देणारी एकमेव कर प्रणाली. पण ह्या सर्वां सोबत आणखी एक भागधारक आणखी आहे जो जीएसटी ची आतुरतेने वाट बघतो आहे, जी एस ती आल्या नंतर ज्याच्या मिळकतीचे दरवाजे नुसते उघडणार नाहीत तर चकचकायला लागतील, तो व्यक्ती म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट.

इथे मी काही जीएसटी आल्यानंतरचे काही महत्त्वाचे फायदे सांगू इच्छितो जे भविष्यात एका सी ए च्या जीवनाला खूपच सोपे तसेच एकदम साधे बनवेल,

ग्राहक वर्गात वाढ होणार

जीएसटी हे सध्याच्या कर प्रणालीच्या तुलनेत एक नाविन्यपूर्ण कर प्रणाली आहे है, सध्या सर्वच व्यावसायिक अप्रत्यक्ष करामुळे त्रासलेले असुन काहीतरी नवीन होईल ह्याची वाट बघत होते, आणि त्यांना अप्रत्यक्ष कराच्या बोज्यापासून वाचवण्याकरिता जीएसटी पदार्पण करीत आहे, आणि त्यामुळे सर्वच व्यावसायिक जीएसटी म्हणजे काय, ह्या मध्ये नोंदणी कशी करायची, त्यांच्या व्यवसायाला जीएसटी कश्या प्रकारे प्रभावित करेल ह्या विचाराने ग्रासले आहेत.

ह्या परिस्थिती मध्ये सी ए खूप मोठी भूमिका पार पाडतील, ही भूमिका फक्त त्यांच्या ग्राहकांना सल्ला देणे नाही तर त्यांना जीएसटी बद्दल शिकवणे सुद्धा आहे. कारण की जीएसटी च्या पायाभूत कायद्यांची माहिती असणे तसेच व्यवसायात त्याला कसे राबवायचे हे माहीत असणे आवश्यक असते, लोकांमध्ये आणि जीएसटी मध्ये असलेली ही दरी सी ए भरून काढू शकतो। सध्या शब्दात सांगायचे तर एकामागून एक लोकं सी ए कम्युनिटी कडे जीएस्टीच्या माहिती करीता तसेच ह्यामध्ये नोंदणी, रिटर्न फाईल करणे आणि अकाउंटिंग ह्या सर्व गोष्टी त्यांच्या व्यवसायात राबवण्याकरिता येत आहेत. ज्यामुळे त्यांवर ग्राहक वाढत आहेत आणि साहजिकच त्यामुले त्यांचा व्यवसाय सुद्धा खूप प्रगती करतील

नवीन चार्टर्ड अकाउंटंट साठी जीएसटी एक वरदान

जीएसटी हे नवीन सी ए करीता जीवनरक्षक ठरणार आहे, आता पर्यंत व्यावसायिक त्यांच्या गरजांकरिता अनुभव असलेल्या सी ए कडे जायचे, पण अगदी नव्याने उभा येऊन राहिलेल्या जीएसटी मुळे नवीन तसेच जुने सीए एकाच नौकेवर प्रवास करणारे यात्री बनले आहेत, हा कॉन्सेप्ट नवीन तसेच जुन्या सर्वच सी ए करीता नवीन आहे, त्यामुळे नवीन आलेले सी ए नां ह्याचा फायदा घेण्याची एकही वेळ आपल्या हातून जाऊ देने योग्य नव्हे, हीच वेळ त्यांच्या करियर ला बुस्ट करण्याची आणि नव्या दमाने समोर यायची आहे.

GST is a life-saving pill for new as well as aspiring chartered accountants Click To Tweet

जेव्हा जीएसटी येईल तेव्हा ह्या क्षेत्रात खूप जास्त संध्या असतील, सल्ला देण्याचे तसेच सहकाऱ्य करण्याचे काम सुद्धा.सी ए ना करावयाचे आहे, त्याच सोबत जुन्या करप्रणाली मधून नवीन करप्रणाली मध्ये सहजतेने मार्गक्रमण करण्या करिता सी ए ची गरज मोठ्या प्रमाणात आता भासणार आहे, जी एस टी ला वस्तूची किंमत कमी करून तसेच मार्जिन वाढवणारा मानण्यात येत आहे, त्यामुळे ज्या नवीन सी ए नां ह्या संधीचे सोने करायचे असेल त्यांच्याकडे ह्याचा चांगला अभ्यास करून आणि लोकांसमोर त्याचे चांगले विश्लेषण करून त्यांना आपला ग्राहक बनवायची वेळ आली आहे, ते सुद्धा सारख्याच डिमांड मध्ये असतील कारण की ग्राहकांची संख्या खुप जास्त होणार आहे, आणि नवीन सी ए कडे ऑनलाईन फोरम किंवा ब्लॉग सारख्या जागेतून ग्राहक शोधणे कठीण जाणार नाही.

साध्या भाषेत सांगायचे तर सध्याच्या परिस्थिती मध्ये जीएसटी बद्दल असलेली बरोबर आणि कामाची माहिती नवीन चार्टर्ड अकाउंटंट ना नवजीवन प्रदान करू शकते.

जीएसटी मुळे मिळकतीत वाढ होणार

जी एस टी फक्त ग्राहकांची संख्याच वाढवणार नाही तर त्यांच्या मिळकतीमध्ये पण भरघोस वाढ करून देईल हे आपण आधी बघितलं आहे. इतकेच नव्हे तर ह्यामध्ये अनेक मोठे फायदे आहेत जे सी ए ला मिळू शकतात,

ह्याला मी थोडं साध्या शब्दात समजवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एक ग्राहक जीएसटी बाबद सल्ला घ्यायला येतो तेव्हा त्याच्याकडे आणखिही व्यावसायिक काम असतेच, तेव्हा सी ए जीएसटी सोबतच इतर सेवा सुद्धा त्याला पुरवू शकतो, उदा.- अकाउंटिंग सेवा, जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन करून देणे, वेळेवर रिटर्न फाईल करून देणे, टॅक्स पेमेंट करणे इत्यादी.
ह्या उपायांचा वापर केल्याने तुमची मिळकत वाढण्याचे चान्स नक्की वाढतील. कारण की एका ग्राहकाकडून वारंवार काम काढून घेणे मोठी गोष्ट नाही, प्रत्येक वेळी नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा ही पद्धत जास्त चांगली आहे असे मला वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राहक जीएसटी बद्दल शिकल्यानंतर त्याला ते सेटअप करण्यास मदत लागेल, ज्याची चांगली फिस सी ए घेऊ शकतात. नव्या सी ए च्या जगात आलेला हा नवा अनुभव त्यांना यशाच्या एका वेगळ्या टोकावर घेऊन जाईल यात शंका नाही.

जीएसटी म्हणजे शांतीचे काम

सध्याच्या कर प्रणाली मधे आपल्याकडे बरेच अप्रत्यक्ष कर दिसून येतात, एक्ससिस टॅक्स, सेवा कर, VAT, CST तसेच असे कितीतरी नियम आणि कायदे आहेत जे पुरेसे पडत नाही, सध्या प्रत्येक राज्याचे वेगळे VAT चे कायदे तसेच कर आहेत, त्याच बरोबर इ कॉमर्स वेबसाईट च्या सुद्धा वेगळ्या मागण्या आहेत. इथे असलेल्या समस्यांमुळे सी ए जवळ त्यांना सोडवून मिळकत कमावण्याची चांगली संधी मिळालेली आहे, जर सी ए नि मदत केली नाही तर सामान्य लोक कायद्याची माहिती नसतांना एखादा कायदा मोडून अडचणीत येऊ शकतात.

ह्या पैकी बरेचसे कन्फ्युजन जी एस टी मुळे दूर होतील असा अंदाज आहे. सध्या प्रत्येक राज्याच्या कर प्रणालीचा वेगळा विचार करावा लागतो आहे पण जी एस टी मध्ये, केंद्र आणि राज्य शासनाचे नियम एकच असल्याने त्याचे अनुपालन करणे तसेच समजावणे कठिक जाणार नाही, लोकांमध्ये समस्या कमी आणि शासनाकडे कर जास्त असे स्वरूप जी एस टी चे आहे. जी एस टी मध्ये आल्याने सी ए सुद्धा त्यांच्या ग्राहकांची नावे जतन करून ठेवून त्यांच्या कडून नेहमी काम घेउ शकतील.

निष्कर्ष

सध्या पूर्ण देश जी एस टी चे स्वागत करण्यास तयार बसलेले आहे, ही गोष्ट मला आनंद देत असली तरी मला खरा आनंद तेव्हा मिळेल जेव्हा जी एस टी भारतात पूर्णपणे लागू होईल, 1 जुलै पासून येत असलेला जी एस टी भारतात विकास करण्यास मदत करेल यात शंका नाही,
आणि सी ए ह्या गोष्टी मध्ये एक खूप मोठी भूमिका पार पडणार ह्यात तीळ मात्रही शंका नाही, पूर्ण जग हे ऑनलाईन सल्ल्याचा मागे धावत असतांना, चार्टर्ड अकाउंटंट मात्र कोणत्याही व्यवसायाचा कणा म्हणून सोबत असतील आणि त्यांचे काम फक्त सल्ला देणे इतकेच नसेल तर जगात पहिल्यांदा सी ए ची सोबत कोणत्या व्यवसायात इतकी महत्वाची असेल. निष्कर्षात मी फक्त इतकेच सांगेन की, जी एस टी मुळेे चार्टर्ड अकाउंटंट चे जीवन कधी नव्हते तितके चकाकणार आहे.

GST promises to make the life of chartered accountants more glorious than ever.Click To Tweet

लेखकाविषयी

रिशीत शहा हे सी ए चे फायनॅलिस्ट तसेच टैली चे मोठे प्रशंसक आहेत, ते टैली अगदी सोप्या भाषेत त्यांच्या ह्या वेबसाईट वर शिकवतात – www.tallyschool.com

ह्या लेखामध्ये मांडण्यात आले विचार लेखकाचे व्यक्तिगत विचार आहेत आणि टैली सोल्युशन प्रा ली च्या कोणत्याही पॉलिसी सोबत कोणत्याही प्रकारे निगडित नाहीत.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

49,031 total views, 18 views today