ही पोस्ट 2 डिसेंबर 2016 रोजी नवीन बदल समाविष्ट करण्यासाठी अद्यतनित केली गेली आहे.

चालू अप्रत्यक्ष राज्याच्या कर प्रणाली अंतर्गत, लहान विकरेत्यांना एक साधी योजना उपलब्ध केली गेली आहे ती रचना योजना म्हणून ओळखले जाते. या योजने अंतर्गत आपण,

 • वार्षिक उलाढालीतील काही टक्केवारीनुसार फक्त कर भरा.
 • केवळ ठराविक वेळी रिटर्न्स फाइल करा. (सहसा तिमाही कालावधीच्या आधारावर)/li>
 • तपशीलवार नोंद ठेवणे किंवा कर बिल नियमांचे पालन करणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे
 • इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) लागू करण्याची परवानगी नाही
 • विक्रीवर कर वसूल करण्याची परवानगी नाही

छोट्या व्यवसायांकरता, कर दायित्वाची गणना करणे सोपे आहे. तपशीलवार रेकॉर्ड राखल्यामुळे वेळ आणि ऊर्जा यांची बचत होते.

खालील उदाहरणाने रचना योजना कशी वेगळी आहे हे आपण समजून घेऊ:

composition levy

Composition Levy in the GST Regime

तसेच, सारखेच फायदे जीएसटी योजने अंतर्गत पुरविले जातील. लहान वितरक आणि व्यवसाय रचना योजना म्हणून रचना कर आकारणी पद्धतीची निवड करू शकतात. या योजनेअंतर्गत करदाता फक्त त्याच्या उलाढालातील काही टक्के कर भरतो.

कमाल मर्यादा

 • ईशान्य भारतात + सिक्कीम, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड – या क्षेत्रांत राहणारी व्यक्ती ज्यांची मागील आर्थिक वर्षातील सरासरी उलाढाल 10 लाखांहून जास्त आहे पण 50 लाखांहून कमी आहे.
 • शेष भारतात – ज्यांची मागील आर्थिक वर्षातील सरासरी उलाढाल 20 लाखांहून जास्त आहे पण 50 लाखांहून कमी आहे.

कराचा आकारणी दर

 • कराचा आकारणी दर अद्याप सूचित करायचा आहे
 • दर
  • निर्माता- एका वर्षातील राज्यामध्ये उलाढाल 2.5% पेक्षा कमी नसेल.
  • निर्माते वगळता इतर – एका वर्षातील राज्यामध्ये उलाढाल 1% पेक्षा कमी नसेल.

रचना करदातासाठी अटी

कमाल मर्यादे व्यतिरिक्त, खालील शर्ती रचना करदातासाठी लागू होतात:

 • सेवांच्या पुरवठ्यात स्वत:स व्यापू शकत नाही
 • विशिष्ट सूचित केलेल्या मालाच्या उत्पादनात व्याप्त होऊ शकत नाही
 • ‘जीएसटी’ अंतर्गत करपात्र नसलेल्या वस्तूंचा पुरवठा करता येणार नाही
 • ई-कॉमर्स माध्यमातून वस्तूंचा पुरवठा करता येणार नाही
 • आंतरराज्य पुरवठा करण्याची परवानगी नाही – एक रचना करदाता वस्तू आणि / किंवा सेवा यांचा आंतरराज्य पुरवठा आणि/ किंवा आयात करू शकत नाही.
 • रचना कर भरणा – रचना करदाता वस्तू आणि सेवा या दोघांचा पुरवठा करून व्यापार करत असेल तर, रचना आकारणी कर, मालाचा पुरवठा आणि सेवेचा पुरवठा दोन्हींसाठी लागू होतील.
 • कर गोळा करण्याची आवश्यकता नाही – रचना करदात्यास वस्तू आणि / किंवा सुविधा पुरविताना सर्व बाह्य पुरवठ्यांवरती कर गोळा करण्याची आवश्यकता नाही.
 • एकाच क्षेत्रात चालविण्यात येणार्‍या सर्व व्यवसायांना हे लागू होईल – रचना कर आकारणी सारख्या क्षेत्रात करण्यात येणार्‍या राज्यातील किंवा आंतरराज्यातील कार्यरत सर्व व्यवसायांना लागू होतील.
  याचा अर्थ काय होतो?

  एक व्यावसायिक जेव्हा वैविध्यपूर्ण व्यवसायांत स्वतंत्र: व्यापार करतो, जसे:

  • मोबाईल आणि अॅक्सेसरीज
  • स्टेशनरी
  • फ्रांचायझी

  वरील परिस्थितीत, रचना योजना वरील तिन्ही व्यवसायांना लागू होतील. विक्रेता प्रस्थापित तीन व्यवसायांपैकी कोणत्याही एका व्यवसायावर रचना योजने अंतर्गत निवड करून कर योजना अवलंबू शकत नाही. उदाहरणार्थ, एक नोंदणीकृत व्यवसाय जो कर्नाटक आणि केरळ अशा दोन्ही ठिकाणी व्यवहार करत आहे, तर तो व्यवसाय त्या विशिष्ट राज्यात उभ्या शाखेमध्ये मालाचा किंवा सेवेचा पुरवठा केवळ राज्यातल्या राज्यात करू शकतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

 • इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकत नाही – रचना करदाता सर्व आवक पुरवठ्या अंतर्गत वस्तू आणि / किंवा सुविधां वर इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्यास पात्र असणार नाही.
  याचा अर्थ काय होतो?

  एका विकरेत्याने रचना करदात्याची सदस्यता निवडल्यास, तो इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकत नाही, तो सामान्य करपात्र विक्रेत्यांकडून करपात्र वस्तूंची खरेदी करत असेल तरी सुद्धा तो इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळवू शकत नाही. तद्वतच, करपात्र रक्कम रचना करदात्याच्या खर्चात मिळवली जाईल..

रचना करदात्याचा रिटर्न फॉर्म

एका रचना कर आकरणी योजने अंतर्गत सदस्यत्व मिळालेल्या व्यक्तीस तिमाही रिटर्न्स आणि वार्षिक रिटर्न्स फाइल करणे आवश्यक आहे. परताव्या (रिटर्न्स) चे प्रकार आणि तपशील खाली स्पष्ट केला आहे:

परताव्या (रिटर्न्स) चा प्रकारवारंवारतादेय तारीखखालील तपशील सादर करणे गरजेचे आहे.
फॉर्म जीएसटीआर -4Aतिमाहीआवक पुरवठ्याची तपशीलवार माहिती रचना कर योजने अंतर्गत नोंदणीकृत प्राप्तकर्त्यास पुरवठ्यादाराने प्रसिद्ध केलेल्या जीएसटीआर-1 प्रपत्राचा आढावा घेऊन उपलब्ध करण्यात येईल.
फॉर्म जीएसटीआर -4तिमाहीपाठोपाठच्या महिन्यातील 18वा दिवसवस्तू आणि सुविधांचा संपूर्ण बाह्य पुरवठा, फॉर्म जीएसटीआर-4 अ आणि कर देय तपशील ची माहिती समाविष्ट करून सादर करणे आवश्यक आहे. जीएसटीआर-4 अ फॉर्म मधील कोणतेही फेरबदल, सुधारणा, किंवा काढून टाकण्यात आलेली माहितीचा तपशिल जीएसटीआर-4 मध्ये दाखवणे सुद्धा आवश्यक आहे..
फॉर्म जीएसटीआर -9Aवार्षिकपुढील आर्थिक वर्षातील 31 डिसेंबरकर भरण्याच्या माहिती सोबत तिमाही रिटर्न्स फाइल केल्याचा एकत्रित तपशील.

 

चालू रचना कर योजने अंतर्गत, सदस्यता मिळालेल्या विकरेत्याला केवळ एकत्रीतपणे विक्रीची उलाढाल जाहीर करावी लागते. त्याला चलनाचा तपशिल जाहीर करण्याची गरज नाही. ‘जीएसटी’ मध्ये, रचना करदाता रिटर्न्स फाईल करताना आवक पुरवठ्याच्या चलनाचा तपशिल वापरेल जो जीएसटीआर-1 फॉर्म नुसार आपोआप बनलेला असेल, याचे आकलन पुरवठादार्‍याकडून करण्यात आलेल्या बाह्य पुरवठ्याच्या एकूण उलाढालीतून करण्यात येईल..

जीएसटी योजनेअंतर्गत रचना कर आकारणीची अधिक उदाहरणे पाहण्यासाठी या ब्लॉग पोस्ट ला भेट द्या.

लवकरच येत आहे
रचना कराच्या आकारणी संबंधित संक्रमणाच्या तरतुदी.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

184,139 total views, 46 views today