इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा ई-कॉमर्स यामुळे भारतात व्यवसाय करण्याचे मार्ग बदलले आहेत. सध्या, भारतात ई-कॉमर्स उद्योगावर अनेक प्रकारची कर आकारणी करण्यात येते. प्रत्येक राज्याने ईकॉमर्स उद्योगावर स्वत:चे असे नियम आणि कर लागू केलेले आहेत. ई-कॉमर्स व्यवहारात लागू होणार्या विविध प्रकारच्या करांबद्दल आसलेला स्पष्टतेचा अभाव, आणि ई-वॉलेट आणि कॅशबॅक यांसारखे नवीन पैलू, यामुळे या उद्योगामध्ये कराबद्दल गोंधळाचे वातावरणात निर्माण झाले आहे.

ई-कॉमर्स कंपन्या करांमधील स्पष्टता, आणि राज्यनिहाय विशिष्ट नियम आणि कर काढले जावे म्हणुन जीएसटी अंमलबजावणी होण्याकडे आशावादीपणे पाहत आहेत. ‘जीएसटी’ मसुदा कायद्यामध्ये ई-कॉमर्स उद्योगसाठी विशिष्ट नियम लागू करण्याची गरज असल्याचे दर्शविले गेले आहे. या ब्लॉग मध्ये, आपण जीएसटी मध्ये ई-कॉमर्स संबंधित असलेल्या विशिष्ट तरतुदी पाहूया.

 • ई-कॉमर्स ऑपरेटर आणि
 • ई-कॉमर्स पुरवठादार

ई-कॉमर्स ऑपरेटर आणि ई-कॉमर्स पुरवठादार यांच्या जीएसटी अंतर्गत असलेल्या आवश्यकता आपण तपशीलवारपणे समजुन घेऊया.

ई-कॉमर्स ऑपरेटर

ई-कॉमर्स ऑपरेटर म्हणजे एक अशी व्यक्ती जी इलेक्ट्रॉनिक कॉमर्ससाठी डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक सुविधा किंवा माध्यम याची मालकी, संचालन आणि व्यवस्थापन यांसाठी जबाबदार असते. ई-कॉमर्स ऑपरेटर कडुन जीएसटी अंतर्गत असलेल्या आवश्यकता –

1. नोंदणी करणे बंधनकारक राहील
सर्व ई-कॉमर्स ऑपरेटर यांना जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक राहील. याचा अर्थ असा की, होणारी उलाढाल विचारात न घेता, त्यांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक राहील.

2. सूचित सेवांसाठी ई-कॉमर्स ऑपरेटर द्वारे कर भरणा केला जावा
काही सेवा विभाग सूचित केले जाऊ शकतात, ज्यांचा पुरवठा करताना, पुरवठादाराकडुन नव्हे, तर ई-कॉमर्स ऑपरेटर कडुन कर भरणा व्हायला हवा. जर,

   • ई-कॉमर्स ऑपरेटर एखाद्या राज्यामध्ये स्थापित नसेल तर, ई-कॉमर्स ऑपरेटरचे प्रतिनिधित्व करणार्या कोणत्याही व्यक्तीने कर भरणे बंधनकारक राहील
   • ई-कॉमर्स ऑपरेटर एखाद्या राज्यामध्ये स्थापित नसेल, आणि त्या राज्यामध्ये त्यांचा प्रतिनिधी देखील नसेल तर, ई-कॉमर्स ऑपरेटर कडुन कर भरणा करण्याच्या हेतूने राज्यात एखादी व्यक्ती नियुक्त केली जावी, आणि या व्यक्तीने टॅक्स भरणे बंधनकारक राहील.

3. ई-कॉमर्स ऑपरेटरने माध्यमांकडून कर गोळा करावयाचे आहे
प्रत्येक ई-कॉमर्स ऑपरेटरने त्याच्या माध्यमाद्वारे होणार्या करपात्र पुरवठ्याच्या निव्वळ मूल्यावर 2% कर वसूल करावा, जेथे पुरवठा संबंधीत ऑपरेटर द्वारे कर गोळा केला जाणे आवश्यक असते.

करपात्र पुरवठ्याचे निव्वळ मूल्य = ऑपरेटरच्या माध्यमातून सर्व नोंदणीकृत करपात्र व्यक्तींना केला गेलेले करपात्र पुरवठा मूल्य, सूचित सेवां व्यातिरीक्त इतर पुरवठ्यावर ऑपरेटर कडुन झालेला कर भरणा (-)पुरवठादारास परत करण्यात आलेले करपात्र पुरवठा मूल्य

उदाहरण: ई-कॉमर्स ऑपरेटरद्वारे होणारे जलद सौदे. राकेश प्रायव्हेट लिमिटेड आणि रोहन प्रायव्हेट लिमिटेड हे जलद सौद्याअंतर्गत होणारा पुरवठा पुरविणारे पुरवठादार आहेत. जलद सौद्याअंतर्गत 17 ऑक्टोबर रोजी खालील पुरवठा केला गेला.

जलद सौदे बाह्य पुरवठा नोंदणीपुस्तक
पुरवठादार
करपात्र पुरवठा (रु.)परत करण्यात आलेला करपात्र पुरवठा (रु.)निव्वळ करपात्र पुरवठा (करपात्र पुरवठा वजा परत करण्यात आलेला पुरवठा (रु.))गोळा झालेला टीसीएस @ 2% (रु.)
राकेश प्रायव्हेट लिमिटेड1,00,00,00010,00,00090,00,0001,80,000
रोहन प्रायव्हेट लिमिटेड2,00,00,00020,00,0001,80,00,0003,60,000
एकूण3,00,00,00030,00,0002,70,00,0005,40,000

येथे, जलद सौद्यासाठीचा निव्वळ करपात्र पुरवठा 2,70,00,000 रुपये आहे आणि गोळा करण्यात आलेली जीएसटी कर 5,40,000 रुपये आहे.

4. परतावा आणि कर भरण्याची प्रक्रिया

   •  महिन्याच्या 10 तारखेला, ई-कॉमर्स ऑपरेटरकडुन ज्यामध्ये, मागील महिन्यात त्यांच्या माध्यामातुन झालेला बाह्य पुरवठा तपशील, परत करण्यात आलेला पुरवठा यांचा समावेश करत, फॉर्म GSTR-1 मध्ये नमुद केले जायला हवे. फॉर्म GSTR-1 मध्ये, नोंदणीकृत करपात्र व्यक्तींना करण्यात आलेल्या पुरवठ्याचा चलन निहाय तपशील आणि नोंदणी न झालेल्या व्यक्तींना करण्यात आलेल्या पुरवठ्याचे एकूण मूल्य नमुद करणे आवश्यक आहे. ई-कॉमर्स ऑपरेटरला देखील पुरवठादारकडुन वसूल केलेला कर भरणा करावा लागेल.
    GST-Ecommerce-Operator
   • महिन्याच्या 21 तारखेला, ई-कॉमर्स ऑपरेटर आणि पुरवठादार यांजवळुन प्राप्त झालेल्या पुरवठा अहवालामध्ये तफावत आढळुन आल्यास ती तफावत जीएसटी आयटीसी-1 फॉर्म मध्ये उपलब्ध केली जाईल. अशी तफावत ज्या महिन्यामध्ये कळविली जाईल त्या महिन्यासाठीचा परतावा भरताना दुरुस्त करणे आवश्यक आहे. वरील उदाहरणात, फॉर्म GSTR-8 मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जलद सौद्यामधील पुरवठा तपशील, 10 नोव्हेंबर 17 रोजी दाखविला गेला आहे. जर यामधील तफावत जीएसटी आयटीसी-1 फॉर्म द्वारे 21 नोव्हेंबर 17 रोजी उपलब्ध केली गेली तर, नोव्हेंबर 17 साठीचा परतावा भरताना, जे 10 डिसेंबर 17 रोजी दाखल केले जाईल, ही तफावत दुरुस्त करणे आवश्यक आहे.

ई-कॉमर्स पुरवठादार

ई-कॉमर्स पुरवठादार म्हणजे अशी व्यक्ती जी ई-कॉमर्स माध्यमांद्वारे वस्तू किंवा सेवा पुरवठा करते. ई-कॉमर्स माध्यमांवर पुरवठादारांकडून असलेल्या आवश्यकता –

1. नोंदणी करणे बंधनकारक राहील
सर्व ई-कॉमर्स पुरवठादारांना जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक राहील. त्यामुळे ई-कॉमर्स पुरवठादार ज्यांची एकूण उलाढाल नोंदणीसाठी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होत नाही त्यांना देखील नोंदणी करणे बंधनकारक राहील.

2. कम्पोजिशन योजनेसाठी अपात्रता
एखादी व्यक्ती ई-कॉमर्स ऑपरेटरच्या माध्यमातून वस्तू किंवा सेवा यांचा पुरवठा करीत असेल तर ती व्यक्ती कम्पोजिशनयोजनेअंतर्गत नोंदणीसाठी पात्र राहणार नाही. म्हणून, एखाद्या व्यक्तीची सरासरी उलाढाल अगदी रु 50 लाख पेक्षा जास्त होत नसली तरीही, त्याला / तीला कम्पोजिशन करदाता होण्यासाठीचा पर्याय उपलब्ध राहणार नाही

3. परतावा प्रक्रिया
ई-कॉमर्स माध्यमांवरील पुरवठादारांना नियमित विक्रेत्यांसाठी लागू असलेल्या जीएसटी परतावा प्रक्रियेचे पालन करावे लागेल. शिवाय, ई-कॉमर्स माध्यमांवर केल्या जाणार्या पुरवठा संदर्भात खालील तपशील प्रदान करावा लागेल –

   • On 10th of a month, a supplier has to furnish Form GSTR-1 containing details of outward supplies made through e-commerce platforms. In Form GSTR-1, invoice-wise details of supplies to registered taxable persons and aggregate value of supplies to unregistered persons made through the e-commerce platform must be provided.
   • On 11th of a month, Form GSTR-2A will be made available to the supplier. The aggregate amount of tax collected by e-commerce operators in the previous month will be auto populated, based on Form GSTR-8 filed by the e-commerce operators.GST-Ecommerce-Suppliers
   • महिन्याच्या 10 तारखेला, ई-कॉमर्स पुरवठादारांनाकडुन फॉर्म GSTR-1 ज्यामध्ये, मागील महिन्यात त्यांच्या माध्यामातुन झालेला बाह्य पुरवठा तपशील, परत करण्यात आलेला पुरवठा यांचा समावेश करत, नमुद केले जायला हवे. फॉर्म GSTR-8 मध्ये, नोंदणीकृत करपात्र व्यक्तींना करण्यात आलेल्या पुरवठ्याचा चलन निहाय तपशील आणि नोंदणी न झालेले व्यक्तींना करण्यात आलेल्या पुरवठ्याचे एकूण मूल्य नमुद करणे आवश्यक आहे.
   • महिन्याच्या 11 तारखेला, फॉर्म GSTR-2अ पुरवठादारांसाठी उपलब्ध केले जाईल. ई-कॉमर्स ऑपरेटरने दाखल केलेल्या फॉर्म GSTR-1 वर आधारित, मागील महिन्यात ई-कॉमर्स ऑपरेटरकडुन गोळा करण्यात आलेल्या कराची एकूण रक्कम आपोआपच प्रसिध्द केली जाईल.वरील उदाहरणात, राकेश प्रायव्हेट लिमिटेड द्वारे ऑक्टोबर महिन्यामध्ये केला गेलेला पुरवठा फॉर्म GSTR-1 द्वारे 10 नोव्हेंबर 17 रोजी दाखल केले गेले. 21 नोव्हेंबर 17 रोजी फॉर्म जीएसटी आयटीसी-1 मध्ये तफावत दर्शविण्यात आली तर, नोव्हेंबर 17 साठीचा परतावा भरताना, जे 10 डिसेंबर 17 रोजी दाखल केले जाईल, ही तफावत दुरुस्त करणे आवश्यक आहे.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

108,170 total views, 314 views today