आपल्या आधीच्या ब्लॉग पोस्टमध्ये वस्तूंच्या पुरवठ्याची वेळ पुढील शुल्कासाठी काय आहे? यांत आपण वस्तूंच्या पुरवठाच्या वेळ पुढील शुल्कासाठी या विषयाची चर्चा केली. या ब्लॉगमध्ये, आपण वस्तूंच्या पुरवठाच्या वेळ मागील शुल्कासाठी या विषयावर चर्चा करणार आहोत.

विविध असंघटित क्षेत्रांतून वस्तू किंवा सेवांच्या विक्रीवर कर वसूल केला जाईल याची खात्री करण्यासाठी सरकारने रिव्हर्स चार्ज यंत्रणा सुरू केली. वस्तू किंवा सेवा प्राप्तकर्ता किंवा खरेदीदार करदात्यास सरकारच्या खात्यात कर भरावा लागणार आहे, पुढील शुल्क सारखे नाही की जिथे विक्रेताला कर भरावा लागतो. महत्वाचा बदल म्हणजे कर भरण्याची जबाबदारी पुरवठादाराकडुन खरेदीदाराकडे देण्यात आली आहे.

सद्ध्याच्या शासना अंतर्गत

नोंदणी न केलेल्या वितरकांकडून केल्या जाणार्या खरेदीवर व्हॅट अंतर्गत, प्राप्तकर्त्याला कर हा (नोंदणीकृत व्यापारी) माल खरेदी कर नावाच्या करानुसार भरणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, कर्नाटकमधील नोंदणीकृत डीलर राम ट्रेडर्स, नोंदणीकृत व्यापारी नसलेल्या श्री शिवकुमार यांच्याकडून वस्तू खरेदी करतात. या खरेदीवर, राम ट्रेडर्स खरेदी कर भरण्यास पात्र असतील.

जीएसटी अंतर्गत

जीएसटी अंतर्गत, रिव्हर्स शुल्क प्रक्रियेची तीच संकल्पना टिकून आहे. हे वस्तू आणि सेवांच्या विशिष्ट पुरवठ्यावर लागू होते, जी अद्याप सरकारने अधिसूचित केले गेले नाही.

रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत वस्तूंसाठी पुरवठ्याचा कालावधी समजून घेऊ.

जीएसटीची जबाबदारी (सीजीएसटी आणि एसजीएसटी किंवा आयजीएसटी लागू) खालीलप्रमाणे दर्शवेल.

खालीलपैकी सर्वात आधीचे
माल प्राप्त झाल्याची तारीखप्राप्तकर्त्याने माल प्राप्त केल्याची तारीख.
देय तारीखज्या तारखेचे भुगतान केले जाते. देयक प्राप्तकर्त्याच्या खात्यांच्या पुस्तकात ज्या तारखेचे पैसे दिले जातात किंवा ज्या तारखेला त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात त्या तारखेपासून सर्वात जुने
चलन तारखेपासून ३० दिवसपुरवठादाराकडून चलन जारी केल्याच्या तारखेपासून लगेचच ३० दिवसांची तारीख.

जर,कोणत्याही कारणाने वरील तारखा निश्चित करता येत नसतील, तर पुरवठ्याची वेळ हि प्राप्तकर्त्याच्या पुस्तकात पुरवठा नोंदवण्याची तारीख असेल.

आपण उदाहरणाने समजून घेऊ.

माल प्राप्त झाल्याची तारीख चलनाची तारीख देय तारीख माल पुरवठा करण्याची वेळ स्पष्टीकरण
२९ जुलै, २०१७५ ऑगस्ट, २०१७ १० नोव्हेंबर, २०१६२९ जुलै, २०१७या प्रकरणात, माल प्राप्त होण्याची तारीख हि, देय तारखेच्या आधी आणि चलन तारखेपासून 30 दिवस आहे. म्हणून, पुरवठा करण्याचा काळ २९ जुलै, २०१७ असेल.
१५ ऑगस्ट २०१७२५ ऑगस्ट, २०१७३० जुलै, २०१७३० जुलै, २०१७देयाची तारीख हि माल मिळाल्याची तारीख आणि चलन तारखेपासून 30 दिवसांपूर्वीची आहे. म्हणूनच, पुरवठ्याचा कालावधी ३० जुलै, २०१७ असेल.
१० ऑगस्ट, २०१७१ जुलै २०१७ १५ ऑगस्ट, २०१७३१ जुलै, २०१७या प्रकरणात, चलन तारखेपासून 30 दिवस वस्तू मिळाल्याची तारीख आणि देयाच्या तारीखापूर्वीची होती. म्हणूनच, पुरवठ्याचा कालावधी ३१ जुलै, २०१७ असेल.
पुढे येत आहे

सेवेच्या पुर्ततेची मागील शुल्क यंत्रणेद्वारे

आम्हाला तुमची मदत हविए
कृपया आपला या सत्राचा अभिप्राय खाली कॉमेंट वापरुन कळवावा. शिवाय तुम्हाला कोणत्या जीएसटी(वस्तू एवं सेवा कर) शी संबंधित अशा विषयांवर शिकायला जास्त आवडेल हे कळवावे, आम्हास ते आमचा मजकूर योजनेमध्ये समाविष्ट करण्यास आनंदच होईल.

हे मदतीचे वाटले? खालील बटनाचा वापर करून इतरंबरोबर शेअर करा.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

35,264 total views, 16 views today