कर कायद्यानुसारआयात आणि निर्यात होणाऱ्या मालावर अनेक कर आकारले जातात.
सध्या, कस्टम ड्युटी, एक्ससाइज, सेवा कर आणि VAT असे विविध करआयात आणि निर्यात होणाऱ्या मालावर आकारले जातात.
वस्तू आणि सेवा कर(GST) लागू झाल्यानंतर, एक्ससाइज, सेवा कर, आणि VAT; एक कर म्हणजेच GST म्हणून मानला जाईल आणि कस्टम ड्युटी वेगळी अधिक आकारण्यात येईल.

सद्यस्थिती

माल आयात करणे

सद्यस्थितीत, जो माल आयात करेल त्याला कस्टम ड्युटी, कॉउंटरवाईलिंग ड्युटी(CVD) आणि स्पेशिअल ऍडिशनल ड्युटी(SAD) भरावी लागते. CVD आणि एक्ससाइजचा दर सारखा लावला जातो जर मालाचे उत्पादन भारतात झालेले असेल.
उत्पादनाची किंमत मार्केट प्राइजच्या तुलनेत सारखी असावी म्ह्णून CVD आणि SAD आकारण्यात येते.

आयात ड्युटी आयात केलेल्या मालावर कशी आकारण्यात येते हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहुयात.

उदाहरण: बंगलोर मधील मनोज अप्पारेल, सिडनी ऑस्ट्रेलिया मधील Oz Designs कडून अप्पारेल विकत घेतात.

टॅक्स कॅल्क्युलेशन

तपशीलनंबरकिंमत प्रति नंबर(₹)रक्कम (₹)
वूमेन्स टी-शर्ट2002,500 (51.68 AUD) *5,00,000
मेन्स टी-शर्ट1005,000 (103.37 AUD) *5,00,000
एकूण30010,00,000
कस्टम ड्युटी @ १०%    1,00,000
कस्टम ड्युटी वर ३% एजुकेशन सेस (१,००,०००*३%)          3,000
सब टोटल  11, 03,000
CVD @ १२.५%    1,37,875
सब टोटल  12,40,875
SAD @ ४%       49,635
आयातची एकूण टोटल  12,90,510

* एक्सचेंज रेट ०.०२१ AUD = १ रूपया

इम्पोर्ट ऑफ सर्विसेस

जो सेवा आयात करतो त्याला भारतात लागू होणाऱ्या सर्विस टॅक्सच्या दराने आयात केलेल्या सेवेसाठी कर भरावा लागतो. आयात करणारा आयात केलेल्या मालासाठी किंवा सेवेसाठी टॅक्स क्रेडिटची मागणी करू शकतो.

उदाहरण: हैदराबाद, तेलंगणा मधील राजेश अप्पारेल्स, श्रीलंका कोलंबो मधील कौशी designs कडून Rs. ५,००,००० च्या फॅशन सर्विसेस घेतात.

टॅक्स कॅल्क्युलेशन

तपशीलरक्कम (₹)
फॅशन डिजाईनिंग सर्विसेसs  50,00,000
सेवा कर @१४%    7,00,000
कृषी कल्याण सेस @०.५%       25,000
स्वच्छ भारत सेस @०.५%       25,000
आयात ची एकूण टोटल 57,50,000
निर्यात

सध्यस्थितीत, निर्यात केलेल्या मालावर ०% कर आहे, म्हणजेच कर आकारण्यात येत नाही. उत्पादन, खरेदी, आणि पुरवठा या सारख्या सेवांसाठी निर्यातदार टॅक्स रिफंडची मागणी करू शकतो.

GST लागू झाल्यानंतर

माल आयात करणे

जो माल आयात करेल त्याला कस्टम ड्युटी आणि IGST भरावा लागेल. इथे फरक एवढाच कि CVD आणि SAD च्या ऐवजी IGST भरावा लागतो, जो GST चा भाग आहे. भारतीय कायद्यानुसार IGST चा जो दर असेल, त्या दराने आयात केलेल्या मालावर IGST आकारण्यात येईल. IGST भरलेल्या मालासाठी आयातदार फुलटॅक्स क्रेडिटसाठी मागणी करू शकतो. म्हणजेच, ज्यांना SAD आणि CVD साठी क्रेडिट ची मागणी करणं शक्य होत नव्हते, त्यांना आता IGST भरलेल्या मालासाठी टॅक्स क्रेडिटची मागणी करणे सहज शक्य होणार आहे. मात्र, कस्टम ड्युटीसाठी कोणतेही टॅक्स क्रेडिट दिले जाणार नाहीत आणि कस्टम ड्युटी GST चाच एक भाग राहील.
GST लागू झाल्यानंतर, आयात केलेल्या मालावर आयात ड्युटी कशी आकारण्यात येते हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहुयात.

उदाहरण: बंगलोर मधील मनोज अप्पारेल, सिडनी ऑस्ट्रेलिया मधील Oz Designs कडून अप्पारेल विकत घेतात.

टॅक्स कॅल्क्युलेशन

तपशीलनंबर.किंमत प्रति नंबर(₹)रक्कम (₹)
वूमेन्स टी-शर्ट2002,500    (51.68 AUD) *  5,00,000
मेन्स टी-शर्ट1005,000    (103.37 AUD) *  5,00,000
एकूण30010,00,000
कस्टम ड्युटी @ १०%     1,00,000
कस्टम ड्युटी वर ३% एजुकेशन सेस (१०,०००*३%)           3,000
सब टोटल  11,03,000
IGST @१८% **    1,98,540
आयातची एकूण टोटल  13,01,540

*एक्सचेंज रेट ०.०२१ AUD = १ रूपया
**GST १८% गृहीत धरली आहे.

इम्पोर्ट ऑफ सर्विसेस

GST लागू झाल्यानंतर, पुरवठा इम्पोर्ट ऑफ सर्विस म्हणून मानला जाईल जर:-

  1. पुरवठादार भारताबाहेर असेल
  2. सेवेचा प्राप्तकर्ता भारतात असेल
  3. सप्लाय ऑफ सर्विसचे ठिकाण भारतात असेल

उदाहरण: हैदराबाद, तेलंगणा मधील राजेश अप्पारेल्स श्रीलंका कोलंबो मधील कौशी designs कडून Rs. ५,००,००० च्या फॅशन सर्विसेस घेतात.

पुरवठादाराचे ठिकाण: कोलंबो, श्रीलंका

प्राप्तकर्ता चे ठिकाण : हैदराबाद, तेलंगणा

पुरवठ्याचे ठिकाण : पुरवठ्याचे ठिकाण प्राप्तकर्तेचे ठिकाण असेल, म्हणजेच हैदराबाद, तेलंगणा.

या कारणांमुळे हा पुरवठा आयात म्हणून मानला जाईल.

टॅक्स कॅल्क्युलेशन

तपशीलरक्कम (₹)
फॅशन डिजाईनिंग सर्विसेसs  50,00,000
IGST @ १८%*    9,00,000
आयात ची एकूण टोटल 59,00,000

* GST १८% गृहीत धरली आहे

एक्सपोर्टस

सद्यस्थितीप्रमाणेच, निर्यात केलेल्या मालावर ०% कर असेल , म्हणजेच कर आकारण्यात येणार नाही. उत्पादन, खरेदी, आणि पुरवठा या सारख्या सर्विसेस साठी एक्सपोर्टर टॅक्स रिफंडची मागणी करू शकतो.

एक्स्पोर्ट ऑफ सर्विसेस

खालील कारणांमुळे पुरवठा निर्यात म्हणून मानला जाऊ शकतो.

  1. सेवा पुरवठ्यादाराचे ठिकाण भारत असेल.
  2. सेवेचा प्राप्तकर्ता भारता बाहेर असेल
  3. सप्लाय ऑफ सर्विसचे ठिकाण भारता बाहेर असेल
  4. पुरवठादाराला पेमेंट कन्व्हर्टिबल फॉरेन एक्सचेंजच्या स्वरूपात मिळते
  5. पुरवठादार आणि प्राप्तकर्ता एकच माणूस नसेल.

उदाहरण: मुंबई महाराष्ट्र मधील रोहन कंसल्टंट्स, सिंगापुर मधील Abey ‘s Engineering ला बिझिनेस सर्विसेस देतात आणि पेमेंट सिंगापोरीयन डॉलर्समध्ये होते.

पुरवठादाराचे ठिकाण : मुंबई महाराष्ट्र

प्राप्तकर्ता चे ठिकाण: सिंगापुर

पुरवठ्याचे ठिकाण : प्राप्तकर्ताचे ठिकाण, म्हणजेच सिंगापोर

पेमेंट : कन्व्हर्टिबल फॉरेन एक्सचेंज, सिंगापोरीयन डॉलर्स.

प्राप्तकर्ता आणि पुरवठादाराचे नाते : दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत

वरील दिलेल्या कारणांमुळे हा पुरवठा निर्यात म्हणून मानला जाईल आणि ०% कर आकारण्यात येईल.

1

IGST भरलेल्या मालासाठी आयातदाराला पूर्ण इनपुट क्रेडिट दिले जाईल, तसेच निर्यातदाराला उत्पादन, खरेदी, आणि पुरवठा या सारख्या सेवांसाठी आकारण्यात आलेला कर परत करण्यात येईल.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

149,914 total views, 158 views today