Language

  • English
  • Hindi
  • Marathi
  • Kannada
  • Telugu
  • Tamil
  • Gujarati

ही पोस्ट नवीन बदल अंतर्भूत करून 21 ऑक्टोबर 2016 रोजी सुधारित केली आहे.

‘जीएसटी’चे मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे देशभरात एका शृंखले सारखा अखंड इनपुट क्रेडिटचा (कर्जाचा) प्रवाह (माल उत्पादनावरील किमती पासून त्याचा उपभोगत्या द्वारा उपयोग होईपर्यंत) होय. या विभागात, वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्यावर जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी कायद्याने घालून दिलेल्या विविध अटींबद्दल चर्चा करू या.

खालील सर्व अटी/तरतुदी जीएसटी इनपुट क्रेडिट लाभ घेण्यासाठी पूर्ण करणे आवश्यक आहे:

• जीएसटी कायद्याच्या अंतर्गत नोंदणीकृत पुरवठादाराकडून प्रसिद्ध केलेले कर चलन / डेबिट किंवा क्रेडिट नोट / पुरवणी चलन, विक्रेत्याकडे असणे आवश्यक आहे.
• दिलेल्या वस्तू / सेवा प्राप्त केल्या आहेत.
• रिटर्न्स (जीएसटीआर-3) दाखल करण्यात आला आहे.
• आकारलेला कर पुरवठादाराने सरकारकडे भरला आहे.

या अटी काय दर्शवतात?

एकदा पुरवठादाराने फॉर्म जीएसटीआर-1 (जावक तपशील पुरवठा) भरल्यानंतर, प्राप्तकर्त्यास स्वयं-प्रसिध्द फॉर्म जीएसटीआर-2 अ (आवक तपशील पुरवठा) च्या माध्यमातून खरेदीची दृश्यमानता पाहता येते. आवश्यक बदल केल्यानंतर, नवीन माहिती (जर असेल तर) आणि फॉर्म जीएसटीआर -2 ची स्वीकृती दिसल्यावर, इनपुट क्रेडिट प्राप्तकर्त्याजवळ इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरच्या माध्यमातून एक प्रायोगीक तत्वावर जमा केली जाते.

याव्यतिरिक्त जीएसटीआर-2 मध्ये फॉर्म मध्ये प्राप्तकर्त्याने केलेले बदल फॉर्म जीएसटीआर- 1अ fद्वारा पुरवठादाराला मान्य करण्यासाठी उपलब्ध करून दिली जातात.

मासिक उत्पन्न (फॉर्म जीएसटीआर-3) देयक करासोबत पुरवठादाराने दाखल केलेले असतील तेव्हाच केवळ इनपुट क्रेडिट उपलब्ध होते. इनपुट टॅक्स क्रेडिटची अंतिम स्वीकृती फॉर्म ‘जीएसटी’ एमआयएस-1 मध्ये कळवली जाते.

आपण एका उदाहरणाने हे समजून घेऊ.

सुपर कार लिमिटेडने, एक कार निर्माता, रत्ना स्टील्स कडून 30 टन स्टील खरेदी केले. रत्ना स्टील्सने ते स्टील पुरवले आणि 5 एप्रिल रोजी जीएसटीसदृश 2,40,000 रुपयांचे कर चलन जारी केले.

या उदाहरणाने, आपण इनपुट क्रेडिट चा प्रवाह समजून घेण्यासाठी एका प्रक्रियेनुसार याचे परीक्षण करू.

टिपा

जीएसटीआर-1: पुढील महिन्याच्या 10 किंवा त्याच्या आधीच्या तारखेस सर्व बाह्य पुरवठ्या संबंधी माहिती प्रकाशित करते.

जीएसटीआर-2 अ: महिन्याच्या 11 व्या दिवशी सिस्टम द्वारे सर्व आवक तपशील पुरवठा स्वयं-प्रसिध्द केला जातो.

जीएसटीआर 3: महिन्याच्या 20 व्या दिवशी प्रणाली द्वारे मासिक रिटर्न्स स्वयं-प्रसिध्द केले जातात.

याबाबतीत अधिक माहिती देणारे लेख लवकरच येत आहेत:

• रिटर्न्स अपलोड
• परावर्तन आणि इनपुट टॅक्स क्रेडिटचा पुन्हा केलेले दावे

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

76,927 total views, 10 views today