चलन तयार करणे प्रत्येक व्यवसायामध्ये कर पालन करण्याचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. म्हणुन ‘जीएसटी’ अंतर्गत असणार्या चलन नियमांची जाणीव असणे आवश्यक आहे. आपण हे नियम तपशीलावार पणे समजून घेऊया.

सद्यकालीन कर व्यवस्थेमधिल चलन

सद्यकालीन कर व्यवस्थेमध्ये, दोन प्रकारचे चलन जारी केले जातात :

  1. कराचे बिल – हे चलन नोंदणीकृत वितरकाकडुन दिले जाते, आणि हे टॅक्स क्रेडिट दावा करण्यासाठी वापरले जाऊ शकते. सद्यकालीन कर प्रणालीमधिल दोन मुख्य प्रकारच्या चलनाचे नमुने, नियम 11 जकात चलन आणि कर चलन खाली दिसत आहेत.

   tax invoice under current tax regime

 

 1. रिटेल किंवा व्यावसायिक चलन – हे नोंदणीकृत विक्रेता किंवा किरकोळ ग्राहक यांना दिले जाते, आणि या चलनाद्वारे टॅक्स क्रेडिट साठी दावा केला जाऊ शकत नाही. सद्यकालीनकर प्रणालीमधिल रिटेल चलन नमुना खाली दर्शविला आहे.

  retail invoice

 

जीएसटी प्रणालीमधिल चलन

जीएसटी प्रणालीमध्ये दोन प्रकारचे चलन जारी केले जातील :

 1. कर चलन
 2. पुरवठा बिल

कर चलन

नोंदणीकृत करपात्र व्यक्ती करपात्र वस्तू किंवा सेवा पुरवितो, तेव्हा कर चलन जारी केले आहे. कर चलनासाठी आवश्यक तपशील संबंधित नियमांवर आधारित, कर चलन नमुना खाली दर्शविला आहे.

sample of tax invoice under GST

कर चलन जारी करण्याची वेळ मर्यादा किती आहे?

माल पुरवठा कर चलन आधी किंवा माल काढण्याची वेळी जारी करणे आवश्यक आहे, जेथे

पुरवठा मध्ये

माल चळवळचा समावेश आहे
उदा – जेव्हा सुपर कार लिमिटेड, एक कार निर्माता, त्याचा विक्रेता रवींद्र
ऑटोमोबाईल्स येथे कार पुरवितो, तेव्हा सुपर कार लिमिटेडच्या आवारात बाहेर कार
काढण्याच्या वेळी चलन जारी करणे आवश्यक आहे. कारण या पुरवठ्यामध्ये रवींद्र
ऑटोमोबाईल्स आवारात कार जाणार असते.

OR

प्राप्तकर्त्यास मालाचे वितरण, जेथे पुरवठा करण्यात येणार्या मालाची हालचाल
आवश्यक नसते

उदा – सुपर कार लिमिटेड जनरेटर सेट खरेदी करतो, जे कारखान्याच्या परिसरात
जोडले आणि स्थापित केले जाईल. येथे, जनरेजर संच हलविणे आवश्यक नाही, म्हणुन
सुपर कार लिमिटेड कंपनी जवळ जनरेजर संच उपलब्ध होईल तेव्हा चलन जारी
करणे आवश्यक आहे.

सेवा पुरवठा कर चलन, सेवेचा पुरवठा केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत जारी करणे
आवश्यक आहे.
पुरवठादार एखादी बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था असल्यास, कर चलन सेवेचा
पुरवठा केल्याच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत जारी करणे आवश्यक आहे.

टीप: जर एक उलट शुल्क कर देणारा व्यक्ती, नोंदणी न झालेले व्यक्तीकडून वस्तू किंवा सेवा प्राप्त करतो, तर स्वीकारर्त्याने वस्तू किंवा सेवा प्राप्त झाल्याच्या तारखेला चलन जारी करणे आवश्यक आहे.

कर चलनाच्या किती प्रती आवश्यक असतात?

माल पुरवठा करण्यासाठी, चलनाच्या तीन प्रती आवश्यक असतात – मूळ प्रत, दुसरी प्रत, आणि तिसरी प्रत.

मूळ चलन: मूळ चलन, स्वीकारर्त्यास दिली जाते, आणि ती ‘स्वीकारर्त्यास मूळ प्रत ‘ म्हणून चिन्हांकित केली जाते.

दुसरी प्रत: दुसरी प्रत वाहतूकदारास दिले जाते, आणि ती वाहतूकदार दुसरी प्रत’ म्हणून चिन्हांकित केली जाते. पुरवठादारास चलन संदर्भ क्रमांक मिळाला असेल तर, ह्या प्रतिची आवश्यकता नसते. पुरवठादाराने जारी केलेले कर चलन संकेतस्थळावर अपलोड केल्यानंतर चलन संदर्भ क्रमांक दिला जातो. हा क्रमांक चलन अपलोड केल्या तारखेपासून 30 दिवसांसाठी वैध असतो.

तिसरी प्रत: ही प्रत पुरवठादार यांनी राखून ठेवलेली असते, आणि ती ‘पुरवठादारास तिसरी प्रत’ म्हणून चिन्हांकित केली जाते.

copy of tax invoice for supply of goods

सेवा पुरवठा करण्यासाठी, चलनाच्या दोन प्रती आवश्यक आहेत:

 • मूळ चलन: स्वीकारर्त्यास देण्यात येणारी मूळ प्रत, आणि ती ‘स्वीकारर्त्यास मूळ प्रत’ म्हणून चिन्हांकित केली जाते.
 • दुसरी प्रत: पुरवठादारासाठी दुसरी प्रत, आणि ती ‘निर्यातदारास दुसरी प्रत’ म्हणून चिन्हांकित केली जाते.

copies of tax invoice for supply of service

निर्यात कर चलनाध्ये कोणते तपशील असणे आवश्यक आहे?

निर्यात चलनामध्ये कर चलनासाठी आवश्यक आसणार्या तपशील व्यतिरिक्त, खालील तपशील असणे सुद्धा आवश्यक आहे:

निर्यात चलन
” IGST भरल्यानांतर निर्यात अभिप्रेत पुरवठा ” किंवा ” IGST न देता बॉण्ड अंतर्गत निर्यात अभिप्रेत पुरवठा ” असे लिहीले असणे आवश्यक आहे.
प्राप्तकर्त्याचे नाव आणि पत्ता
वितरण पत्ता
ARE -1 क्रमांक आणि दिनांक (निर्याती वस्तू पाठण्यासाठी अर्ज)

पुरवठा बिल

पुरवठा बिल खालील प्रकरणात नोंदणीकृत पुरवठादाराकडुन जारी केले जायला हवे:

 • सवलत दिली गेलेल्या वस्तू किंवा सेवा यांचा पुरवठा केल्यास
 • कॉम्पोजिट योजना अंतर्गत कर भरणार पुरवठादार

पुरवठा बिलासाठी आवश्यक तपशील नियमांवर आधारित, पुरवठा बिलाचा एक नमुना खाली दर्शविला गेला आहे.

sample of bill of supply

पुरवठा केल्या गेलेल्या वस्तू किंवा सेवा यांचे मूल्य 100 रुपये पेक्षा कमी असेल, तेव्हा जोपर्यंत स्वीकारकर्ता पुरवठा बिलसाठी आग्रह करत नाही, पुरवठा बिल जारी करण्याची आवश्यकता नसते. तथापि, असा सर्व पुरवठा ज्यासाठी पुरवठा बिल जारी केले गेले नसेल त्यांसाठी एका व्यवसाईक दिवसाअंती एकत्रित पुरवठा बिल तयार केले जायला हवे.

जारी केल्या गेलेल्या चलनाच्या मूल्यात कशाप्रकारे बदल करावे?

चलनामध्ये नमुद केलेले करपात्र मूल्य किंवा शुल्क यात बदल करण्यासाठी, पुरवठादाराकडुन डेबिट पत्रक किंवा पूरक चलन किंवा क्रेडिट पत्रक जारी केले जायला हवे.

डेबिट पत्रक / पूरक चलन- मूळ चलनामधिल करपात्र मूल्य किंवा ‘जीएसटी’ शुल्क यांत वाढ करावयाची असल्यास पुरवठादाराकडुन हे जारी केले जाते.

क्रेडिट पत्रक- मूळ चलनामधिल करपात्र मूल्य किंवा ‘जीएसटी’ शुल्क यांत घट करावयाची असल्यास पुरवठादाराकडुन हे जारी केले जाते. क्रेडिट पत्रक 30 सप्टेंबर पूर्वी किंवा 30 सप्टेंबर रोजी पुरवठा केला गेलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत किंवा संबंधित वार्षिक परतावा दाखल करण्याची तारीख, यांपैकी जे आधी येईल, त्यानुसार जारी करणे आवश्यक असते.
आपण एका उदाहरण द्वारे क्रेडिट पत्रक जारी करण्याची वेळ मर्यादा समजून घेऊया.
उदाहरण

सुपर कार लिमिटेड या कंपनीने रवींद्र ऑटोमोबाईल्स या विक्रेत्यास 1 नोव्हेंबर ’17 रोजी 6,00,000 रुपये किंमतीचे सुटे भाग विकले. 2 नोव्हेंबर ’17 रोजी रवींद्र ऑटोमोबाईल्स यांकडुन 1,00,000 रुपये किंमतीचे सुटे भाग नुकसान झाले असल्याने परत करण्यात आले. आता सुपर कार लिमिटेड या कंपनीला परतीच्या मालासाठी क्रेडिट पत्रक जारी करावयाचे आहे

सुपर कार लिमिटेडने क्रेडिट पत्रक जारी करावयाची अंतिम तारीख खालील 2 परिस्थिती वरुन पडताळुन पाहुया-

परिस्थिती 1- ते आर्थिक वर्ष 17-18 साठी वार्षिक परतावा 1 डिसेंबर ’18 रोजी दाखल करणार आहेत

परिस्थिती 2- ते आर्थिक वर्ष 17-18 साठी वार्षिक परतावा 31 मे ’18 रोजी दाखल करणार आहेत.

परिस्थिती मूळ पुरवठा दिनांक वार्षिक परतावा दाखल करण्याची तारीख क्रेडिट पत्रक जारी करण्याची अंतिम तारीख ठरविण्यासाठी अट क्रेडिट पत्रक जारी करण्याची शेवटची तारीख
परिस्थिती 11 नोव्हेंबर 20171 डिसेंबर ’18आर्थिक वर्षाच्या अखेरीस नंतर येणाऱ्या 30 सप्टेंबर किंवा संबंधित वार्षिक परतावा दाखल करण्याची तारीख, यांपैकी जे आधी येईल, त्यानुसार जारी करणे आवश्यक आहे.30 सप्टेंबर ’18
परिस्थिती 2 31 मे ’1831 मे ’18

 

डेबिट पत्रक, पूरक चलन आणि क्रेडिट पत्रक यांमध्ये कोणते तपशील अंतर्भूत करायला हवेत?

डेबिट पत्रक, पूरक चलन आणि क्रेडिट पत्रक यांमध्ये खलील तपशील समाविष्ट करायला हवा :

डेबिट पत्रक / पूरक चलन / क्रेडिट पत्रक
दस्तऐवजचे स्वरूप ठळकपणे, जसे ‘सुधारित बिल’ किंवा ‘पूरक चलन’ म्हणून नमुद करणे आवश्यक आहे
पुरवठादाराचे नाव, पत्ता आणि GSTIN
सलग अनुक्रमांक, फक्त मुळाक्षरे आणि / किंवा आकडे या स्वरुपात, आणि वित्तीय वर्षासाठी वेगळे असायला हवेत
दस्तऐवज जारी केल्याचा दिनांक
प्राप्तकर्ता नोंदणीकृत असेल तर – प्राप्तकर्त्याचे नाव, पत्ता आणि GSTIN / खास ID क्रमांक
प्राप्तकर्ता नोंदणीकृत नसेल तर – प्राप्तकर्त्याचे नाव, पत्ता आणि वितरणाचा पत्ता, राज्याचे नाव आणि कोड यांसह
मूळ कर चलन किंवा पुरवठा बिलाचा अनुक्रमांक आणि दिनांक
वस्तू किंवा सेवेचे करपात्र मूल्य, प्राप्तकर्त्यासाठी असलेला कर दर आणि डेबिट किंवा क्रेडिट केलेला कर
पुरवठादार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींची स्वाक्षरी किंवा डिजिटल स्वाक्षरी

 
लवकरच येत आहे:

खाती पुस्तके कायम राखण्याचा कालावधी

कर भरणा

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

367,884 total views, 64 views today