आज आपण बाजारात पाहिले तर असे दिसेल कि बहुंश वेळा दोन किवा अधिक वस्तू अथवा वस्तू आणि सेवा यांचे मिश्रण, संमिश्र विकले जातात. हे पुढी कारणास्तव असू शकते:

 • व्यवहारिक डावपेच – ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी
 • वस्तू अथवा सेवेचा स्वभाव अथवा प्रकार, ज्याला एकत्र विकणे गरजेचे आहे.

सेवा कर अंतर्गत ह्या व्यवस्थेला “एकत्रित सेवा” म्हणतात – ह्याला सेवा अथवा सेवांचे इतर सेवेसोबत सेवा प्रस्तुतीकरण म्हणले जाते.

जीएसटी सुधारित मॉडेल मसुदा अंतर्गतपुरवठेजे दोन अथवा जास्त पुरवठे अथवा सेवा आणि वस्तूंचे संमिश्रण हे पुढील भिन्न वैशिष्ट्यांतर्गत वर्गीकृत केले आहेत:

 • मिश्र पुरवठा
 • संमिश्र पुरवठा

मिश्र पुरवठा

दोन किव्हा अधिक वस्तू अथवा सेवांचे, अथवा कोणतेही वस्तू आणि सेवेचे मिश्रण जे करदात्याने एकाच मुल्यासाठी पुरवले आहेत त्यास मिश्र पुरवठा म्हणतात.

मिश्र पुरवठ्यामध्ये वस्तूंचे आणि/किव्हा सेवेचे मिश्रण हे नैसर्गिक गरजासाठी एकत्रित नसतात, आणि जे वैयक्तिकरित्या सामान्य व्यावसाय क्रमात पुरवले जातात.

मिश्र पुरवठा निश्चित करणे

हे एक उदाहरनाणे समजून घेवूया

एक संच, ज्यात एक टाय, एक घड्याळ, एक पाकीट, आणि पेन असे रू. ४५०० चे संच आहे.

GST Mixed Supply

उदाहरणानुसार

 • टाय, घड्याळ, पाकीट आणि पेन हे सर्व एक संच म्हणून एकत्र केले आहेत.
 • टाय चा पुरवठा हे नैसर्गिकपणे इतर पदार्थांचे (घड्याळ, पेन, पाकीट) चे पुरवठा करतेच असे नाही.
 • संच केवळ एकाच किमतीस पुरवला आहे.

म्हणून ह्या संचचा पुरवठा एक मिश्र पुरवठा आहे.

मिश्र पुरवठ्यावर कर दायित्व:

ह्या मिश्र पुरवठ्यावर कर आकारणीसाठी, त्या वस्तूचे अथवा सेवेचे मूल्य लक्ष्यात घेतले जाते जे ज्यास्त लक्ष आकर्षून घेते.

वरील उदाहरण पुन्हा पाहूया.

उत्पादनकराचा दर *
टाइ12%
घड्याळ18%
वॉलेट12%
पेन5%

* दर्शवलेल्या किमती

ह्या उदाहरणात मिश्र पुरवठ्यामध्ये घड्याळाची किंमत जास्त लक्ष आकर्षून घेते, म्हणून मिश्र पुरवठ्यावर १८% कर आकारले जाईल.

संमिश्र पुरवठा

वस्तु आणि सेवांचे संमिश्रण एक करपात्र व्यक्तीकडून प्राप्तकर्त्यास केले जाते, आणि:

 • ह्यात दोन किव्हा अधिक वस्तूंचे अथवा सेवांचे अथवा,
 • सेवा आणि वस्तूंचे मिश्रण, जे नैसर्गिकपणे व्यवसायात पुरवले जातात.

म्हणजेच वस्तू किव्हा सेवा ह्या नैसर्गिक गर्जनुसार पुरवले जातात. संमिश्र पुरवठ्यातील वस्तू अथवा सेवे हे वस्तूंच्या “मुख्य पुरवठ्यावर” अवलंबून असतात्त.

मुख्य पुरवठा म्हणजे काय?

वस्तू अथवा सेवेमधील प्रमुख पात्र जे संमिश्र पुरवठ्याचे एक भाग आहे ह्याला “ मुख्य पुरवठा” आणी इतर जे अवलंबित पुरवठे आहेत त्यांना “द्वितीय पुरवठा” म्हटले जाते.

संमिश्र पुरवठा ठरवणे

एका उदाहरणाने समजून घेवूया

 1. मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल न्याहारीसह ४ दिवस /३ रात्र चे संकुल पुरवते.

  GST Composite supply

हे एक संमिश्र प्रकारचे पुरवठा आहे कारण वसती आणि न्याहारी हे नैसर्गिकरीत्या पुरवले जाणारे व्यावसाय आहेत. म्हणून इथे वस्ती हे मुख्य पुरवठा आणि न्याहारी हे द्वितीय पुरवठा आहे.

2. मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल न्याहारीसह ४ दिवस /३ रात्रचे संकुल एक दिवस मुंबई दर्शनासह पुरवते. इथे मुंबई दर्शन हे नैसार्कीकपणे वसतीव न्याहारी सोबत पुरवले जाणारे अंतर्भूत पुरवठा नाही. म्हणून हे संमिश्र पुरवठा नसून मिश्र पुरवठा आहे.

3. . लॅपटॉप सह बॅग पुरवठा हे संमिश्र पुरवठा आहे कारण नैसर्गिकपणे संगणक नेण्यास बॅग आवश्यक आहे. पण जर ग्राहकास मल्टिपर्पस बॅग हवी असल्यास हे संमिश्र पुरवठा होवू शकत नाही, कारण ते संगणक सोबत पुरवलेली वस्तू नाही.

संमिश्र पुरवठा कर दायित्व

कर दायित्व गणन करण्यासाठी,वस्तू आणि सेवांच्या मुख्य पुरवठा वर आधारीत करांचे दर हे संमिश्र पुरवठ्यावर परिणाम करतात. हे एक उदाहरणाने समजून घेवूया.

मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल न्याहारीसह ४ दिवस /३ रात्र चे संकुल पुरवते. इथे वस्तीवर १८% आणि हॉटेलच्या सेवांवर १२% कर आकारले जाते. उदाहरणानुसार वस्ती हे मुख्य पुरवठा आहे आणि इथे पूर्ण पुरवठा के १८% कर दराने आकारले जाते. मिश्र पुरवठा आणि संमिश्र पुरवठा संकल्पना संदर्भात हे व्यवसायांसाठी पाहणे महत्वाचे आहे कि केल्या गेलेल्या पुरवठा आणि प्रकारचे मुल्यांकन करणे.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

49,721 total views, 14 views today