आपण आमच्या आधीच्या ब्लॉग. मधे आपण सेवा पुरवठ्याची जागा निर्धारित करण्याच्या सामान्य नियमांबद्दल चर्चा केली. विशिष्ट सेवांच्या बाबतीत पुरवठ्याचे स्थान कसे निश्चित करायचे हे आपण आता समजून घेऊ.

सेवेचा प्रकारप्राप्तकर्त्याचे प्रकारपुरवठ्याची जागाउदा
रेस्टॉरंट आणि तसेच केटरिंग सेवालागू नाहीजिथे सेवा दिली जाईल ते ठिकाणमनीष केटरर्स जे मुंबई, महाराष्ट्र हे मुकेश ऑटोमोबाईल, मुंबई ला त्यांच्या कार्यालयीन वार्षिक सभेकरिता केटरिंग पुरवतात.मुंबईतील मनिष केटरर्स हे, मुकेश ऑटोमोबाइल्स यांना मुंबईतील त्यांच्या वार्षिक विक्री कार्यक्रमासाठी केटरिंग सेवा पुरवतात.
पुरवठादाराचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
पुरवठा करण्याची जागा – केटरिंग सर्व मुंबई मधेच दिल्या गेली असल्याने सीजीएसटी + एसजीएसटी हे कर लागू होतील
कॉस्मेटिक आणि प्लॅस्टिक शस्त्रक्रियासह वैयक्तिक सौंदर्य, फिटनेस, सौंदर्य उपचार आणि आरोग्य सेवालागू नाहीबेंगळुरू, कर्नाटकमध्ये नोंदणीकृत एक चार्टर्ड अकाऊंटंट, केरळमधील देव आयुर्वेद केंद्रात आयुर्वेदाचा उपचार घेतो.
पुरवठादाराचे ठिकाण – केरळ
पुरवठ्याचे स्थान: केरळमध्ये आयुर्वेदाचा उपचार केला जातो
हा एक राज्यांतर्गत पुरवठा आहे आणि कर लागू आहेत सीजीएसटी + एसजीएसटी.
प्रशिक्षण आणि कामगिरी मूल्यांकनाशी संबंधीत सेवानोंदणीकृत व्यक्तीप्राप्तकर्त्याचे स्थानबंगलोर, कर्नाटकमधील अमोग्य इंस्टीट्युट ऑफ फॅशन डिझायनिंग हे चेन्नई, तामिळनाडूमध्ये नोंदणीकृत असलेल्या मोहन अप्परेलला फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण प्रदान करते.
ट्रेनिंग अमोग्या इन्स्टिट्यूट च्या परिसरात घेण्यात आली
पूर्वठादाराचे ठिकाण – बैंगलोर, कर्नाटक
पुरवठ्याचे ठिकाण- मोहन अप्परेल ह्यांचे ठिकाण चेन्नई, तामिळनाडू आहे.
हा राज्याबाहेरील पुरवठा असल्यामुळे इतर आयजीएसटी लागू होईल.
नोंदणीकृत नसलेली व्यक्तीजिथे सेवा दिली जाईल ते ठिकाणबंगलोर, कर्नाटकमधील अमोग्य इंस्टीट्युट ऑफ फॅशन डिझायनिंग, विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात फॅशन डिझायनिंगमध्ये पदवीचे शिक्षण देते.
पुरवठादाराचे ठिकाण – बैंगलोर, कर्नाटक
पुरवठ्याचे ठिकाण – बैंगलोर , कर्नाटकयेथेच ट्रेनिंग घेण्यात आली असल्यामुळे येथे सीजीएसटी + एसजीएसटी लागेल.
एक सांस्कृतिक, कलात्मक, क्रीडा, वैज्ञानिक, शैक्षणिक किंवा मनोरंजन इव्हेंट किंवा करमणूक पार्कमध्ये प्रवेशाद्वारे प्रदान करण्यात आलेली सेवालागू नाहीज्या ठिकाणी इव्हेंट होईल ती जागाहैदराबाद, आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने अंदमान-निकोबार द्वीपसमूहांच्या पर्यटन विभागाकडून अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील आयलॅंड टुरिझम फेस्टिव्हलची तिकिटे खरेदी केली.
पुरवठादाराचे ठिकाण – अंदमान निकोबार बेट
पुरवठ्याचे ठिकाण – आयलॅंड टुरिझम फेस्टिव्हल हे अंदमान निकोबार बेटावर आयोजित करण्यात आले.
त्यामुळे हा केंद्र शासित राज्याच्या हद्दीतील व्यवहार झाला आणि इथे सीजीएसटी + यूटीजीएसटी हे कर लागतील.
एक सांस्कृतिक, कलात्मक, क्रीडा, वैज्ञानिक, शैक्षणिक किंवा मनोरंजन इव्हेंट किंवा करमणूक पार्कमध्ये प्रवेशाद्वारे प्रदान करण्यात आलेली सेवानोंदणीकृत व्यक्तीप्राप्तकर्त्याचे ठिकाणमुंबईमध्ये नोंदणीकृत असलेल्या मोनिका इवेंट ऑर्गनाइझर यांनी, दिल्लीमध्ये नोंदणीकृत असलेल्या कोमल ऑटोमोबाइलच्या मुंबईमधील वार्षिक विक्री कार्यक्रमासाठी इव्हेंट व्यवस्थापन सेवा पुरवतात.
पुरवठादारांचे स्थान: मुंबई
पुरवठ्याचे ठिकाण: कोमल ऑटोमोबाइल दिल्लीत आहे.हे आंतरराज्य पुरवठा असल्याने आयजीएसटी लागू होईल.
नोंदणीकृत नसलेली व्यक्तीजिथे सेवा दिली जाईल ते ठिकाणमुंबईतील मोनिका इव्हेंट ऑर्गनायझर, राजस्थानमधील एका ग्राहकाला मुंबईतील तिच्या लग्नाला रिसेप्शनसाठी इव्हेंट मॅनेजमेंट सेवा पुरवते.
पुरवठादारांचे स्थान: मुंबई
पुरवठ्याचे ठिकाणः मुंबईत लग्न आयोजित केले आहे.
हा एक राज्यांतर्गत पुरवठा आहे आणि सीजीएसटी + एसजीएसटी कर लागू होतील.

तुम्ही नोंद घेऊ शकता की पुरवठ्याचे ठिकाण ती जागा असेल, जिथे सेवा राबविली जाते आणि इव्हेंट ठेवले जाते, अशाप्रकारचे व्यवहार नेहमी राज्यांतर्गत म्हणून गणले जातात.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

72,379 total views, 174 views today