‘ जीएसटी ‘ च्या, चालु कर प्रणाली अंतर्गत उत्पादन, करपात्र सेवांची तरतूद, आणि मालची विक्री यांवरील कर ‘ पुरवठा ‘ या संकल्पनेत बदलण्यात येणार आहे. जीएसटी अंतर्गत येणार्या करपात्र कृती म्हणजे वस्तू किंवा सेवा यांचा पुरवठा होय. पुरवठ्यावर आकारला जाणारा योग्य कर निश्चित करता यावा म्हणून, पुरवठा ठिकाण समजून घेणे फार महत्वाचे आहे. आदर्श जीएसटी कायदा पुरवठा ठिकाण निश्चित करण्यासाठी निकष घालुन देतो. या निकषांच्या आधारे, तुम्ही राज्यांतर्गत (राज्या मधील) किंवा आंतरराज्यीय (राज्याबाहेरील) वस्तू किंवा सेवा यांचा होणारा पुरवठा हाताळू शकता.

खालील दोन मुख्य घटक पुरवठ्यावर आकारण्यात येणारा कर निश्चित करतात:
पुरठादाराचे स्थळ – पुरठादाराची नोंदणीकृत व्यवसाईक जागा
पुरवठा ठिकाण – प्राप्तकर्त्याची नोंदणीकृत व्यवसाईक जागा

आपण एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया.

ब्रॅड कार प्रायव्हेट लिमिटेड याची नोंदणीकृत व्यवसायाची जागा जयपूर, राजस्थान येथे आहे. ते रवींद्र ऑटोमोबाईल्स यांना कार पुरवितात, ज्याची नोंदणीकृत व्यवसायाची जागा उदयपूर, राजस्थान येथे आहे.

GST Intra state supply

 

येथे, ब्रॅड कार प्रायव्हेट लिमिटेडचे स्थान राजस्थामध्ये आहे, आणि पुरवठा ठिकाण देखील राजस्थान मध्येच आहे. म्हणुन हा राज्यांतर्गत, म्हणजेच एकाच राज्या मध्ये होणारा पुरवठा आहे. राज्यांतर्गत होणार्या एखाद्या पुरवठ्यासाठी, आकारले जाणारे कर शुल्क म्हणजेच CGST आणि SGST होय.

आता आणखी एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया.

ब्रॅड कार प्रायव्हेट लिमिटेड याची नोंदणीकृत व्यवसायाची जागा राजस्थान येथे आहे. ते राम ऑटोमोबाईल्स यांना कार पुरवितात, ज्याची नोंदणीकृत व्यवसायाची जागा लखनऊ, उत्तर प्रदेश येथे आहे.

GST Inter state supply

या उदाहरणात, ब्रॅड कार प्रायव्हेट लिमिटेडचे स्थान राजस्थामध्ये आहे, आणि पुरवठा ठिकाण उत्तर प्रदेश येथे आहे. म्हणुन हा आंतरराज्यीय, म्हणजेच राज्याबाहेर होणारा पुरवठा आहे. एखाद्या आंतरराज्यीय पुरवठ्यासाठी, आकारले जाणारे कर शुल्क म्हणजेच IGST होय.

खालील पुरवठा देखील आंतरराज्यीय पुरवठा म्हणून ओळखला जातो:
• वस्तू किंवा सेवा यांची आयात
• वस्तू किंवा सेवा यांची निर्यात
• सेझ युनिटला किंवा सेझ युनिटद्वारे होणारा वस्तू किंवा सेवा यांचा पुरवठा, जरीही पुरवठा एकाच राज्यामध्ये होत असेल.

पुढील भागात:

माल पुरवठा ठिकाण निश्चित करणे – मालाचे दळणवळण यांचा समावेश आहे.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

121,384 total views, 368 views today