जीएसटी दर जाहीर झाल्यापासून प्रवासी गाड्या खरेदीदारांनाअसा प्रश्न पडला आहे की, त्यांनी जीएसटीच्या काळामध्ये एखादी वस्तू विकत घेतली तर ते त्यांच्यासाठी फायद्याचे आहे कि तोट्याचे. या ब्लॉगमध्ये आम्ही याचे स्पष्टीकरण देणार आहोत कि, जीएसटी परिषदेने ऑटोमोबाईल क्षेत्रातील जीएसटी दर कसे निश्चित केले.

जुन्या व्यवस्थेत कर कसे होते
जुन्या यंत्रणेत ऑटोमोबाईल्ससाठी एक्साइज ड्युटी – १२.५% ते २७% (इंजिनची क्षमता आणि कारच्या आकारावर आधारित आहे) भरावी लागत होती. एक्साईज वर अतिरिक्त ड्युटी उदा. एनसीसीडी १%; ऑटोमोबाईल उपकर ०.१२५% इन्फ्रास्ट्रक्चर उपकर – १% ते ४% पर्यंत (कार प्रकारावर आधारित आहे) देखील भरावी लागत होती, आणि अखेरीस सरासरी १४.५ % व्हॅट व्हॅल्यू – जो प्रत्येक राज्यात वेगळा आहे.

ऑटोमोबाईलसाठी जीएसटी दर

दिगुड

मोटर वाहने
जीएसटी, अंतर्गत, मोटार वाहनांवर सध्या लागू असलेले सर्व कर एकत्रित केले जातील आणि २८% कर आकारण्यात येईल. अतिरिक्त सेस (१% ते १५%) वेगळा आकारण्यात येईल. जीएसटी कम्पेन्सेशन सेस खाली दिलेल्या नियमांनुसार ठरविला आहे.

वाहनाचा प्रकार लांबीइंजिनक्षमतासेस रेट
छोटी कार४ मी. पेक्षा कमी१२०० सीसी पेक्षा कमी१%
छोटीकार४ मी. पेक्षा कमी१२०१ सीसी – १५०० सीसी३%
मिड-सेगमेंट कार४ मी. पेक्षा जास्त१५०० सीसी पेक्षा कमी१५%
मोठी कार४ मी. पेक्षा जास्त१५०० सीसी पेक्षा जास्त१५%
हैड्रोजन व्हेइकल (फ्युएल सेल टेकनॉलॉजिवर आधारित)४ मी. पेक्षा जास्त१५%
मोटरसायकल३५० सीसी पेक्षा जास्त३%
मोटर व्हेइकल(क्षमता १०ते १३ लोक)१५%

पाहताक्षणी कर जास्त भरावा लागणार असे वाटते पण जुन्या यंत्रणेशी तुलना जीएसटी यंत्रणेशी केल्यावर असे दिसून येते.

सध्याची यंत्रणा जीएसटी
कारचा प्रकार एक्ससाईजड्युटी एनसीसीडीइन्फ्रासेसऑटोमोबाईल सेसव्हॅटएकूणकर(अंदाजे)जीएसटीअतिरिक्त सेसएकूण कर(अंदाजे)
छोटी कार12.5 %1 %1 %0.125 %14.5 %31 %28 %1% – 3%29 % –

    32 %

लक्झरीकार27 %1 %4 %0.125 %14.5 %51 %28 %15 %43 %

सध्याच्या कर यंत्रणेत लहान कारच्या खरेदीवर सुमारे ३१% कर आकारण्यात येतो तर लक्झरी कारच्या खरेदीवर ५१% कर आकारण्यात येतो. छोट्या व मिड-सेगमेंट गाड्या सर्वात जास्तीच्या टॅक्स स्लॅब मध्ये जरी मोडत नसल्या तरी खरेदीदारांना सारखाच कर भरावा लागणार आहे. लक्झरी कार खरेदीदारांना मात्र ८% कर-सूट मिळणार आहे. येत्या दिवसांत जर रोडवर अनेक ऑडी आणि मर्सेडिज गाड्या दिसू लागल्या तर काही नवल नाही.

विद्युत वाहने
एक गोष्ट लक्ष्यात घेणे जरुरी आहे कि आता विद्युत वाहनांवर १२% जीएसटी लागू होणार आहे, म्हणजेच आधी पेक्षा ६% कमी कर भरावा लागणार आहे. शिवाय एक्ससाईज ड्युटी ६% कमी लागणार आहे आणि व्हॅट५% लागणार आहे. जीएसटीच्या काळात विद्युत वाहने स्वस्त होणार आहेत. सरकार पर्यावरण अनुकूल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे असे दिसून येत आहे.

दि बॅड

हायब्रीड वाहने
हायब्रीड वाहने इलेक्ट्रिक पॉवर बरोबर पारंपारिकइंधनावर(पेट्रोल) चालतात, हे लक्षात घेता, हायब्रीड वाहनांसाठी १५% सेस लागणार हि आश्चर्यकारक बाब आहे. मिड-सेगमेंट हायब्रीड वाहने (१५०० सीसी पेक्षा कमी) तसेच हाय-सेगमेंट हायब्रिड(१५०० सीसी पेक्षाजास्त) वाहनांवर आता ४३% कर आकारण्यात येणार आहे. हायब्रिड वाहन उत्पादक, तसेच ग्राहकांसाठी हि धक्क्याची बातमी आहे.

दि अग्ली

ऑटो पार्ट्स
ऑटोमोबाईल विभागाच्या अगदी उलट म्हणजे गाड्यांच्या स्पेअर पार्ट्सचा व्यापार करणाऱ्यांसाठीखूप वाईट बातमी आहे. स्पेअर पार्ट्सवर आधी १२.५% एक्ससाईज आणि ५% व्हॅट,म्हणजेच १८.५% आकारण्यात यायचा पण आता स्पेअर पार्ट्सवर २८% कर आकारण्यात येणार आहे. स्पेअर पार्ट्सच्या व्यापाऱ्यांना यामुळे मोठा फटका बसू शकतो.

निष्कर्ष

कॅस्केडिंग कर जरी काढून टाकले असले तर उच्च कर दरांमुळे ऑटोमोबाईल विभागातल्या अनेक उद्योगांना फटका असणार आहे. विद्युत वाहने आणि लक्झरी वाहनांसाठी जीएसटी फायद्याची ठरणार आहे तर हायब्रीड वाहने आणि स्पेअर पार्ट्सच्या व्यापाऱ्यांसाठी जीएसटी जास्त फायदेशीर ठरणार नाही. थोडक्यात संपूर्ण ऑटोमोबाईल विभागासाठी जीएसटी थोडी आंबट-गोडच ठरली आहे.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

142,579 total views, 144 views today

Pramit Pratim Ghosh

Author: Pramit Pratim Ghosh

Pramit, who has been with Tally since May 2012, is an integral part of the digital content team. As a member of Tally’s GST centre of excellence, he has written blogs on GST law, impact and opinions - for customer, tax practitioner and student audiences, as well as on generic themes such as - automation, accounting, inventory, business efficiency - for business owners.