स्थावर संपत्ती ही हलू न शकनारी वस्तू असते, तिला तोडल्याशिवाय किंवा तिच्यात काही बदल केल्याशिवाय, तिला एका जागेहुन दुसर्या जागेत हलवता येणा शक्य नसते, उदाहरण- जमिनीचा तुकडा किंवा घर.

सध्याच्या कर प्रणाली मधे कर योग्य सेवा ज्या स्थावर संपत्ती करिता पुरवल्या जातात त्या सेवा करा करिता पात्र ठरतात.
राज्यामधे किंवा राज्याबाहेर जरी सेवा पुरवली जात असेल तरी सेवा कर देणे बंधनकारक असते.

जी एस टी च्या कर प्रणाली मधे सेवा राज्यातल्या राज्यात की राज्याच्या बाहेर पुरविली जात आहे हे निश्चित करणे आवश्यक असते, आणि ते सेवा पुरवण्याचे ठिकाण जाणून घेऊन निश्चित करता येऊ शकते.

स्थावर संपत्ती वर सेवा पुरवण्याच्या व्यवसायात कर निर्धारनाकरिता सेवा पुरवण्याचे ठिकाण निश्चित करण्याकरिता करिता काही नियम निर्धरित करण्यात आलेले आहे, आणि ह्या नवीन नियमांनी जुन्या सेवा पुरवण्याचे ठिकाण निश्चित करण्याच्या नियमांना छेद दिलेला आहे.

“सेवा पुरवण्याचे ठीक ते असेल ज्या ठिकाणी स्थावर संपत्ती स्थित आहे”

Place of supply of services provided in relation to an immovable property will be the location at which the immovable property is located or intended to be located.Click To Tweet

ह्या मधे खालील चार परिस्थिती असतात:

1. अश्या सेवा ज्या सरळ स्थावर संपत्तीवर येऊन पुरवल्या जातात.

ह्या मधे आर्कीटेक्चर, इनटेरियर डेकोरेटर, सर्वेक्षक, अभियंते हे व्यावसायिक येतात.

उदाहरण: राज हॉटेल जे शिमला, हिमाचल प्रदेश मधे रजिस्टर्ड आहे, ते देहरादून, उत्‍तराखंड येथे एका नवीन हॉटेल बांधत आहेत, त्याची आंतरिक सजावट रवि इनटेरियर द्वारे केली जात आहे जे देहरादून, उत्तराखंड येथे आंतरिक सजावटीच्या कामाकरिता नोंदणीकृत आहे,

सेवा पुरवणार्याचे ठिकाण- देहरादून, उत्तराखंड

सेवा पुरवण्याचे ठिकाण – जरी राज हौटेल हे शिमला, हिमाचल प्रदेश येथे रजिस्टर्ड असले तरी सेवा पुरवण्याचे ठिकाण हे देहरादून, उत्तराखंड हेच असेल.

इथे तुम्हाला राज्यामधे सेवा पुरवण्याविषयी असेलेले कर तसेच सी जी एस टी आणि एस जी एस टी विषयी माहिती मिळेल.

Place of Supply of Services_9

2.स्थावर संपत्तिमधे भाड्याने राहणे

ह्या सेवेमधे हौटेल, मौटेल, काही काळाकरिता घर भाड्याने देणे, कॅम्पिंग करिता जागा देणे तसेच हाउस बोट

उदाहरण – राज हौटेल जे शिमला, हिमाचल प्रदेश येथे रजिस्टर्ड आहे ते श्री तारिक जे जयपुर, राजस्थान मधले रजिस्टर्ड व्यावसायिक आहेत त्यांना अधिकृत व्यावसायिक सेमिनार करिता हौटेल भाड्याने देत आहेत.

पुरवठा करणार्‍याचे ठिकाण – शिमला, हिमाचल प्रदेश

पुरवठा करण्याचे ठिकाण – शिमला, हिमाचल प्रदेश

हा व्यवहार राज्यातल्या राज्यात देण्यात येणार्‍या सेवेमधे मोडतो आणि ह्यामधे सी जी एस टी तसेच एस जी एस टी हे सेवाकर लागू होतील.

Place of Supply of Services_10

3. ला एखाद्या समारंभाकरिता भाड्याने देणे.

ह्यामधे एखादे व्यावसायिक, सामाजिक, संस्कृतिक तसेच धार्मिक समारंभांचा समावेश होतो.

उदाहरण– मुकेश औटोमोबाईल प्रा. ली., हे गुरुग्राम, हरियाणा मधले रजिस्टर्ड व्यावसायिक आहेत, ते राज हौटेल मधले सभागृह व्यावसायिक सभेकरिता तीन दिवसाकरिता भाड्याने घेतात.

सेवा पुरवणार्याचे ठिकाण – शिमला, हिमाचल प्रदेश

सेवा पुरवण्याचे ठिकाण – शिमला, हिमाचल प्रदेश

हा व्यवहार राज्यातल्या राज्यात देण्यात येणार्‍या सेवेमधे मोडतो आणि ह्यामधे सी जी एस टी तसेच एस जी एस टी हे सेवाकर लागू होतील.

Place of Supply of Services_11

4. कोणतीही सेवा जी बर नमूद सेवेला पूरक ठरत असेल.

उदाहरण– मुकेश औटोमोबाईल प्रा ली, राज हौटेल शिमला, हिमाचल प्रदेश येथील सभागृह भाड्याने घेतातच पण त्यासोबतच त्यांच्या पाहूण्याकरिता जेवण आणि पेय सुद्धा बोलावतात.

पुरवठा करणार्‍याचे ठिकाण– शिमला, हिमाचल प्रदेश

पुरवठ्याचे ठिकाण– शिमला हिमाचल प्रदेश

हा व्यवहार राज्यातल्या राज्यात देण्यात येणार्‍या सेवेमधे मोडतो आणि ह्यामधे सी जी एस टी तसेच एस जी एस टी हे सेवाकर लागू होतील.

Place of Supply of Services_12

वर नमूद केल्याप्रमाणे सध्याच्या कर प्रणाली मधे सेवा कर हा स्थावर संपत्ती जिथे असेल तिथेच लागतो, पण हे कर केंद्रीय कर असल्यामुळे सेवा जिथून पुरवल्या जात आहेत तिथेच क्रेडिट इनपुट मिळतात ज्यामुळे जिथे सेवा पुरवण्यात येत आहेत त्या राज्याचा तोटा होण्याची संभावना असते.

ह्या बद्दल आपण एक उदाहरण बघुया, सध्याच्या कर प्रणालीचा विचार केला तर मुकेश औटोमोबाईल प्रा ली, हरियाणा हे हिमाचल प्रदेश येथे बुक केलेल्या हॉटेल चे इनपुट क्रेडिट घेऊ शकतात, पण जी एस टी कर प्रणाली मधे कर सेवा पुरवत असलेल्या ठिकाणी लागतो त्यामुळे इथे फक्त सी जी एस टी आणि एस जी एस टी हे कर लागतील.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सी जी एस टी आणि एस जी एस टी हे इतर राज्यावर असलेल्या कराचे निर्वहन करण्याकरिता वापरले जाउ शकत नाही. अश्या परिस्थिती मधे जेव्हा एक रजिस्टर्ड माणूस एका स्थावर संपत्ती ला देण्याची सेवा एका राज्यातुन दुसर्या राज्यात घेऊन जातो तेव्हा इनपुट क्रेडिट सोबत घेऊन जाउ शकत नाही, त्यामुळे जी एस टी कर प्रणाली मधे मुकेश औटोमोबाईल प्रा ली, जे हरयाणा मधे रजिस्टर्ड आहेत आपले सी जी एस टी आणि एस जी टी चे क्रेडिट इनपुट हिमाचल प्रदेश मधे घेऊन जाउ शकत नाहीत.

ह्यानंतर – कार्यक्रमाकरिता सेवा पुरवठ्याच्या जागेचे निर्धारण

आम्हाला तुमची मदत पाहिजे
कृपया तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्स मधे नोंदवा आणि तुम्हाला जी एस टी च्या कोणत्या मुद्द्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला सांगा, जेणेकरून पुढल्या वेळी तुमच्याकरिता ते घेऊन येता येईल.

आवडले? आपल्या मित्रांसोबत पण शेयर करा.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

110,434 total views, 292 views today