Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

चालू अप्रत्यक्ष कर रचना अंतर्गत, प्रत्येक प्रकारच्या विविध कर योजना आहेत. चालू अप्रत्यक्ष कर मांडणी अंतर्गत करपात्र घटना खाली नमूद केलेल्या आहेत:

टॅक्स प्रकारकरपात्र इव्हेंट प्रकार
केंद्रीय उत्पादन शुल्कअबकारी कर लागू होणार्‍या वस्तू वेगळ्या काढणे
व्हॅटमालाच्या विक्रीवर
सेवा करकरपात्र सेवांची तरतूद

‘जीएसटी’ अंतर्गत करपात्र गोष्टी म्हणजे वस्तू आणि / किंवा सेवा यांचा पुरवठा होय. केंद्रीय अबकारी कर, सेवा कर आणि व्हॅट / सीएसटी, सर्व कर ‘जीएसटी’ अंतर्गत समाविष्ट आहेत, आणि याच्यात वस्तूचे उत्पादन, मालाची विक्री, सेवा तरतूद आणि इतर संकल्पना आता संबंधित नाहीत.

अशा प्रकारे, प्रत्येक व्यवसायात , हे समजणे महत्वाचे आहे की पुरवठ्याची समर्पकता, व्यवहाराची व्याप्ती परिभाषित करते, आणि ते ‘जीएसटी’ साठी पात्र असते.

जीएसटी अंतर्गत पुरवठ्याची समर्पकता

‘पुरवठा’ या संज्ञेमध्ये सर्व प्रकारच्या वस्तूंचा आणि सेवांच्या पुरवठ्याचा समावेश होतो, ज्यांचे वितरण करावयाचे आहे अथवा आधीच करण्यात आले आहे, याची ग्राहयता व्यापार चालवताना किंवा व्यापार पुढे नेताना धरली जाते.

मात्र, पुरवठ्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कायद्याचा उल्लेख केला आहे ज्याच्यात अगदी विचारात न करता काही बाबींचा पुरवठा म्हणून गृहीत धरणे आवश्यक आहे.

पुरवठ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गटात वर्गीकृत करून आपण हे समजून घेऊ.;

 • व्यापाराच्या वेळी किंवा व्यापारामध्ये आगेकूच करण्याचा उद्देश लक्षात घेऊन करण्यात आलेला पुरवठा
 • कुठलाही उद्देश न ठेऊन केलेला पुरवठा
 • विचारपूर्वक केलेला पुरवठा ज्यात व्यापार करताना किंवा व्यापारात आगेकूच करायचा उद्देश ठेवून / न ठेवून पुरवठा केला गेला

व्यापाराच्या वेळी किंवा व्यापारामध्ये आगेकूच करण्याचा उद्देश लक्षात घेऊन करण्यात आलेला पुरवठा

gst supply marathi

 

पुढील गोष्टी उद्देशपुर्वक पुरवठा करण्याच्या श्रेणीत गणन्यात येतात.:

sale of goods gstसामान्यपणे कोणत्याही वस्तू किंवा सेवांच्या विक्रीत, वस्तु पुरावताना मालाच्या शीर्षकाचे हस्तांतरण होत असते, आणि सेवा देताना वापरायच्या अधिकारचे हस्तांतरण होत असते|.
transfer of goods marathiशांखांमध्ये होणारी कुठल्याही प्रकारची देवाण घेवाण पुरवठा म्हणून गृहीत धरली जाते आणि ती करपात्र असते. तथापि, शाखांमधल्या देवाणघेवाणेवरती भरलेली जीएसटी पूर्णपणे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून उपलब्ध होते.
 Barter Exchange gst marathiपरतफेड पैश्याऐवजी वस्तूच्या माध्यमातून होते उदाहरणार्थ: एका विकरेत्याने खरिददाराला मालाचा पुरवठा केला, आणि खरीददार मालाच्या किमतीइतका दुसरा माल विकरेत्यास पुरवत असेल. थोडक्यात, जेव्हा एका उत्पादनाची दुसर्या उत्पादना सोबत अदलाबदल केली जाते.
 licensing in gst marthiवापरण्यासाठी परवाना देणे हा पण पुरवठ्याचा एक भाग बनतो. उदाहरणार्थ: ऑनलाइन सदस्यता
 rental gst supply marathiपूर्णपणे किंवा अंशत: मालमत्ता भाड्याने देणे, जीएसटी अंतर्गत पुरवठा आहे
 lease gst supply marathiभाडेतत्त्वावर इमारत किंवा मालमत्ता बाहेर देऊ करणे, जीएसटी अंतर्गत पुरवठा आहे
 disposal gst supply marathiव्यवसाय मालमत्ता विल्हेवाट लावणे, जीएसटीतील पुरवठ्याचा एक भाग बनतो

अशा अपवादात्मक परिस्थिती जिथे काही बाबींचा उल्लेख पुरवठ्यामध्ये करण्यात येतो आणि ते ‘जीएसटी’ आकारणीसाठी पात्र असतात, अधिक माहितीसाठी आमचे पुढील ब्लॉग्स तपासत राहा.

लवकरच येत आहे

 1. कुठलाही उद्देश न ठेऊन केलेला पुरवठा
 2. विचारपूर्वक केलेला पुरवठा ज्यात व्यापार करताना किंवा व्यापारात आगेकूच करायचा उद्देश ठेवून / न ठेवून पुरवठा केला गेला

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

57,933 total views, 20 views today