आपल्या आधीच्या ब्लॉग पोस्टमध्ये वस्तूंच्या पुरवठ्याची वेळ पुढील शुल्कासाठी काय आहे? यांत आपण वस्तूंच्या पुरवठाच्या वेळे विषयीची चर्चा केली. या ब्लॉगमध्ये, आपण सेवेच्या पुर्ततेची वेळ पुढील शुल्कासाठी काय आहे या विषयावर चर्चा करणार आहोत.

सद्ध्याच्या शासना अंतर्गत

सद्ध्याच्या अप्रत्यक्ष कर शासना अंतर्गत, करपात्र सेवा प्रस्तुतीकरणावर, सेवा कर लागू होतो. पॉइण्ट ऑफ टॅक्सेशन अनुसार सेवा कर केंद्रा सरकारला कधी भरायचा हे ठरवले जाते.

पीओटीच्या नुसार, सेवा करवरील पुढील शुल्काचा देय खालील प्रमाणे निश्चित केला जाईल:

खालीलपैकी सर्वात आधीचे
चलन जारी करण्याची तारीख सेवा पूर्ण झाल्यापासून 30 दिवसांच्या आत जर चलन जारी केले असल्यास
सेवा पूर्ण होण्याची तारीखसेवा पूर्ण झाल्यापासून 30 दिवसांच्या आत चलन जारी केले नसल्यास
देय पावती प्राप्त झाल्याची तारीखअशी जवळची तारीख ज्यात देय दिनांक खाते पुस्तकात नोंदलेला आहे किंवा ज्या तारखेला बॅंक खात्यात देय जमा केलेला आहे.

आपण उदाहरणाने समजून घेऊ.

सेवा पूर्ण होण्याची तारीखचलनाची तारीख देय पावती प्राप्त झाल्याची तारीख पीओटीस्पष्टीकरण
१५ ऑक्टोबर, २०१६२० ऑक्टोबर, २०१६१० नोव्हेंबर, २०१६२० ऑक्टोबर, २०१६सेवा पूर्ण होण्याच्या ३० दिवसांच्या आत चलन जारी केले आहे, आणि चलनाची तारीख देय मिळण्याच्या तारखेच्या पूर्वीची आहे.
१ डिसेंबर, २०१६५ डिसेंबर, २०१६२५ नोव्हेंबर, २०१६२५ नोव्हेंबर, २०१६सेवा पूर्ण होण्याच्या ३० दिवसांच्या आत चलन जारी केले आहे, आणि देयक पावती प्राप्त होण्याच्या तारखेची तारीख चलन तारखेच्या पूर्वीची आहे.
१ नोव्हेंबर, 2016५ डिसेंबर, 2016१० डिसेंबर, 2016१ नोव्हेंबर, 2016सेवा पूर्ण होण्याच्या ३० दिवसांच्या आत चलन दिले जात नाही.
म्हणून, सर्वात लवकर असे; सेवेची पूर्तता किंवा देय मिळाल्यानंतरची तारीख ही पीओटी असेल.
तर, या प्रकरणात, सेवा पुर्ततेची तारीख १ नोव्हेंबर, २०१६ आहे.

जीएसटी अंतर्गत

जीएसटीमध्ये, ज्या वेळी कर भरणे आवश्यक आहे त्या वेळेचे निर्धारण ‘पुरवठा कालावधी’ अंतर्गत केले आहे. सेवांसाठी पुरवठ्याचा कालावधी निश्चित करणे म्हणजे वस्तूंच्या पुरवठ्याचा कालावधी ठरवण्यासारखे आहे. माल आणि सेवांमधील अंतर भरून काढण्यासाठी, आणि सोपे तत्त्वे निश्चित करण्यासाठी, जरी सेवा या नैसर्गिकरित्या अमूर्त असल्या जश्या की वस्तू नसतात, तरीही वस्तू व सेवांच्या पुरवठ्याचा कालावधी निर्धारित करण्यासाठीच्या तरतुदी समान असतात.

चला आपण जीएसटी अंतर्गत पुढील शुल्क आधारासाठी पुरवठा करण्याची वेळ समजून घेउयात.

जीएसटीची जबाबदारी (सीजीएसटी आणि एसजीएसटी किंवा आयजीएसटी, लागू असल्याप्रमाणे) खाली दाखवल्याप्रमाणे उद्भवेल:

खालीलपैकी सर्वात आधीचे

चलन जारी करण्याची तारीख

ज्या दिवशी विक्रेता चलन जारी करतो.

चलन जारी करण्याची अंतिम तारीख

सेवांचा पुरवठा केल्याच्या तारखेपासून विक्रेत्याकडून ३० दिवसांच्या अंतिम तारखे पर्यंत चलन जारी करणे आवश्यक आहे.
बँकिंग कंपनीच्या बाबतीत, सेवांचा पुरवठा केल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत चलन जारी करणे आवश्यक आहे.

देय पावती

 

ज्या तारखेस देय प्राप्त होते ती तारीख. देय खात्याच्या पुस्तकात नोंदले जाते त्याच्या नजदिकची तारीख किंवा देय बँक खात्यात जमा केले जाते ती तारीख.

चला आपण उदाहरणाने समजून घेऊ

चलनाची तारीख देय पावती प्राप्त झाल्याची तारीख /th>

पुरवठ्याची वेळ स्पष्टीकरण
२० ऑक्टोबर, २०१७१० नोव्हेंबर, २०१७२० ऑक्टोबर, २०१७या प्रकरणात, चलनाची तारीख देय पावती मिळाल्याच्या तारखेच्या पूर्वीची आहे. म्हणून, पुरवठ्याची वेळ ही २० ऑक्टोबर, २०१७ असेल.
५ डिसेंबर, २०१७२५ नोव्हेंबर, २०१७२५ नोव्हेंबर, २०१७या प्रकरणात, देय पावतीची तारीख (आगाऊ पावती) चलन तारखेच्या पूर्वीची आहे. म्हणूनच, पुरवठ्याची वेळ ही २५ नोव्हेंबर, २०१७ असेल
५ डिसेंबर, २०१७पुस्तकांमधील प्रवेशाची तारीख: २० नोव्हेंबर, २०१७

बँकेस जमा केल्याच्या तारखेची नोंद: ५नोव्हेंबर, २०१७

२० नोव्हेंबर २०१७पुरवठ्याचा कालावधी हा सर्वात जवळची चलनाची तारीख किंवा देय पावतीची तारीख असेल. देय पावती मिळाल्याची तारीख सर्वात जवळची असेल यांच्या:

  • अशी तारीख जेव्हा देय खाते पुस्तकात नोंदला जातो
    किंवा
  • ज्या तारखेला बँक खात्यात पैसे जमा केले जातात ती तारीख.

या प्रकरणात, ज्या खात्यावर देय मिळाल्याची तारीख खात्याच्या पुस्तकात लिहिली जाते ही ज्या तारखेस देय बँकेच्या खात्यात जमा केले जाते या तारखेच्या अगोदरची असते.

५ डिसेंबर, २०१७पुस्तकांमधील प्रवेशाची तारीख : १५नोव्हेंबर, २०१७

बँकेस देय जमा केल्याच्या तारखेची नोंद१० नोव्हेंबर, २०१७

१० नोव्हेंबर, २०१७पुरवठ्याचा कालावधी हा चलन तारखे किंवा देय पावतीची सर्वात जुनी तारीख असेल. देय मिळाल्याची तारीख खालीलपैकी सर्वात जुनी असेल यापैकी:

  • ज्या तारखेस देय पुस्तकांच्या खात्यांमध्ये नोंदले जाते किंवा
  • ज्या तारखेला बँक खात्यात पैसे जमा केले जातात ती तारीख.

या प्रकरणात, ज्या तारखेला देय बॅंकेच्या खात्यात जमा झाले आहे ती तारीख ही ज्या तारखेला देय खाते पुस्तकात नोंद्ले आहे या पूर्वीची आहे.

चलन उपलब्ध नसलेल्या प्रकरणांमध्ये पुरवठ्याचा कालावधी
सेवा पूर्ण होण्याची तारीखदेय पावतीसेवा पुरवण्याचा कालावधी स्पष्टीकरण
१० नोव्हेंबर, २०१७५ डिसेंबर, २०१७३० नोव्हेंबर, २०१७पुरवठ्याचा कालावधी चलन भरण्यासाठी आणि देय पावती जारी करण्यासाठी शेवटच्या दिवसातील सर्वात जुने असेल. चलन जारी करण्याची शेवटची तारीख सेवा पुरवण्याच्या तारखेपासून ३० दिवस असेल. म्हणूनच, पुरवठ्याचा कालावधी ३० नोव्हेंबर, २०१७ असेल. याचे कारण असे की देय प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांची सेवा पूर्ण होण्याची तारीख असते.

पुढे येत आहे
वस्तूंवरील पुरवठ्याची वेळ मागील शुल्क यंत्रणाद्वारे

आम्हाला तुमची मदत हविए
कृपया आपला या सत्राचा अभिप्राय खाली कॉमेंट वापरुन कळवावा. शिवाय तुम्हाला कोणत्या जीएसटी(वस्तू एवं सेवा कर) शी संबंधित अशा विषयांवर शिकायला जास्त आवडेल हे कळवावे, आम्हास ते आमचा मजकूर योजनेमध्ये समाविष्ट करण्यास आनंदच होईल.

हे मदतीचे वाटले? खालील बटनाचा वापर करून इतरंबरोबर शेअर करा.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

78,623 total views, 4 views today

Yarab A

Author: Yarab A

Yarab is associated with Tally since 2012. In his 7+ years of experience, he has built his expertise in the field of Accounting, Inventory, Compliance and software product for the diverse industry segment. Being a member of ‘Centre of Excellence’ team, he has conducted several knowledge sharing sessions on GST and has written 200+ blogs and articles on GST, UAE VAT, Saudi VAT, Bahrain VAT, iTax in Kenya and Business efficiency.