१ जुलै पासून चालूं होणाऱ्या जीएसटी नंतर आपल्याला आपले इन्व्हॉईस जीएसटी-इन्व्हॉईससाठी बनवलेल्या नियमांप्रमाणे तयार करावे लागणार आहे. जीएसटी इन्व्हॉईसचा महत्वाचा घटक म्हणजे पुरवठ्यावर घेतलेला कर.

पुरवठ्यावर किती कर आकारण्यात यायला हवा याची गणना करण्यासाठी, कोणत्या मालावर आणि सेवांवर जीएसटी आकारण्यात येऊ शकते हे निर्धारित करणे मह्त्वाचे आहे. तसेच जीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेची अचूक गणना करणे देखील महत्वाचे आहे. असे न केल्यास अनावश्यक व्याज भरावे लागू शकते व प्राप्तकर्ता पुरवठ्यासाठीचे मिळणारे इनपुट क्रेडिट्स देखील गमावू शकतो.

कर आकारण्यात येणाऱ्या पुरवठ्याच्या रक्कम कशी निर्धारित करता येते त्यासाठी एक मार्गदर्शिका म्हणून हा ब्लॉग आहे. ज्या रकमेवर जीएसटी आकारली जाऊ शकते त्या रकमेला ट्रान्झॅक्शन मूल्य असे म्हणतात.

वाचा: माल आणि सेवा पुरविणे म्हणजे नक्की काय?

जीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल

1.पुरविलेले माल किंवा सेवेची किंमत निर्धारित करा
2. त्यात पॅकिंग शुल्क, कमिशन यासारखे अतिरिक्त शुल्क मिळवा
3.जीएसटी व्यतिरिक्त पुरवठ्यावर लागू होणारे कर त्यात मिळवा
4.त्यातून इन्व्हॉईसमध्ये दिलेली सवलतीची रक्कम वजा करा.

उदाहरण: कर्नाटकातील रोहन प्रा.लि. कर्नाटक मधील डीलर, डिसोझा अँड सन्स यांना १०० वॉशिंग मशीन्स पुरवतात. एका वॉशिंग मशीनची किंमत रु. ३०,००० आहे. रोहन प्रा. लि. २,००० वॉशिंग मशिन्सच्या पॅकेजिंगसाठी रू. २,००० आणि वाहतुकीसाठी रु. ८,००० घेतात. डिसोझा आणि सन्सला एकूण रु.१०,००० ची सूट दिली जाते. वॉशिंग मशिनवर आकारण्यात येणारा जीएसटीचा दर १८% आहे
या व्यवहारासाठी, जीएसटी आकारल्याजाणाऱ्या रकमेची गणना कशी केली जाते ते पाहूया.

तपशीलसंख्यादरकिंमत
वॉशिंग मशीन10030,00030,00,000
मिळावा: पॅकिंग शुल्क2,000
मिळावा: वाहतुक शुल्क8000
वजा करा: सवलत(-)10,000
करपात्र किंमत30,00,000
सीजीएसटी @14%4,20,000
एसजीएसटी @ 14%4,20,000
इन्व्हॉईसची एकूण किंमत38,40,000

या व्यवहारासाठी, इन्व्हॉईस खाली दिलेल्या प्रमाणे असेल:
tax-invoice-calculation

जीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेत

मिळवल्याजाणारे शुल्क
  • अतिरिक्त शुल्क
  • आपण (पुरवठादार) देय असणारी कोणतीही रक्कम, जी प्राप्तकर्त्याद्वारे भरण्यात येते, जसे की वाहतूक शुल्क
  • विलंबित पेमेंटसाठी प्राप्तकर्त्यावर आकारल्याजाणाऱ्या रकमा – जसे व्याज आणि उशीरा पेमेंट केल्याचा दंड

या प्रकरणांमध्ये, मूळ इन्व्हॉईसशी सांधले गेलेले डेबिट नोट तयार केले गेले पाहिजे आणि मग जीएसटी आकारला गेला पाहिजे

उदाहरण: वरील दिलेल्या उदाहरणातील पुरवठ्यासाठी, ठरलेला ३० दिवसाच्या कालावधीत डिसोझा अँड सन्स पैसे भरण्यात अयशस्वी ठरतात म्हणून रोहन प्रा. लि. कडून डिसोझा अँड सन्सना रु.६०,०००चा दंड आकारण्यात येतो.
येथे, रोहन प्राइवेट लिमिटेडने दिलेल्या चलनाविरुध्द डेबिट नोट तयार केली पाहिजे, ज्यात जीएसटी दर 28% लावला जाईल(वॉशिंग मशिनसाठी जीएसटी दर 28% आहे). डेबिट नोटचे तपशील खाली दिल्या प्रमाणे असतील:

तपशीलरक्कम
विलंबित पेमेंटसाठी आकारलेला दंड60,000
सीजीएसटी @ 14%8400
एसजीएसटी @ 14%8400
एकूण डेबिट नोट76,800

डेबिट नोट खाली दिल्या प्रमाणे असेल:

debit-note-values

जीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेतुन वजा केले जाणारे शुल्क

• पुरवठ्या नंतर दिलेली सवलत – पुरवठ्यानंतर सवलत दिली गेली असल्यास, याची खात्री करणे महत्वाचे आहे कि पुरवठा होण्यापूर्वी या सवलतीसाठी दोन्ही बाजूचे व्यापारी सहमत आहेत आणि हि सवलत एका विशिष्ट चलनाबरोबर जोडता आली पाहिजे. मग सवलतीच्या रकमेसाठी आणि आकारल्या गेलेल्या जीएसटीसाठी क्रेडिट नोट बनवली गेली पाहिजे.

उदाहरण: रोहन प्रा. लि. आणि डीसूझा अॅण्ड सन्स यांच्या करारानुसार, जर डिसोझा अँड सन्स यांनी ऑनलाईन बँकिंगद्वारे पुरवठ्यासाठी पेमेंट केले तर रोहन प्रा. लि. त्यांना चलनावर रु.२,००० रूपयाची सूट देतील. म्हणून, श्री. डिसोझा ऑनलाइन बँकिंगद्वारे पेमेंट करतात. दिलेल्या २००० रुपयांच्या सवलतीसाठी श्री. रोहन यांनी मूळ चलनाविरुद्ध खाली दिल्या प्रमाणे रु.२००० रुपयांच्या क्रेडिट नोट तयार केली पाहिजे:

तपशीलरक्कम
सूट2000
सीजीएसटी @ 14%280
एसजीएसटी @ 14%280
एकूण क्रेडिट नोट2560

क्रेडिट नोट खाली दिल्या प्रमाणे असेल:

<revised-invoice-updated

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

231,625 total views, 265 views today