(English) Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

आपले पहिले आणि सर्वात महत्वाचे काम म्हणजे ‘जीएसटी’ कडे आपल्या नोंदणीकृत व्यवसायाला परावर्तित करणे. यात जीएसटी’ ची तत्वे इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी आगाऊ लेखी आणि अहवाल प्रक्रीया, खरेदी, व्यवसाय नियमनाचे (लॉजिस्टिकस) निर्णय यांचे पुनरावलोकन करणे आवश्यक असेल.

आज, उत्पादन, विक्री आणि सेवा इ. चा स्वतंत्र क्रियाकलाप चालतो आणि यांची कर प्रणाली सुद्धा स्वतंत्र पद्धतीने नियंत्रित केली जाते. उत्पादन क्रियाकलाप, केंद्रीय अबकारी शुल्क अंतर्गत समाविष्ट आहे. विक्री ही राज्य व्हॅट / सीएसटी अंतर्गत समाविष्ट आहे, आणि सेवा क्रियाकलाप, सेवा कर कायदा अंतर्गत समाविष्ट आहे.

हे नियम अजून सोपे आणि चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी, आम्ही खाली कर प्रकार प्रत्येक परिवर्तनाच्या तरतुदीनुसार वर्गीकृत केले आहे:

 • केंद्रीय अबकारी
 • व्हॅट
 • सेवा कर

आपले काही प्रश्न:

 • कोणत्याही जीएसटीची अंमलबजावणी करण्या आधी, शेवटच्या दिवशी शिल्लक इनपुट टॅक्स क्रेडिटचे काय होईल?
 • भांडवलीतील वस्तू ज्या अद्याप मिळाल्या नाहीत त्यांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट वर काय परिणाम होईल?

आम्ही ह्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे त्यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीला अनुसरून देत आहोत.

परिस्थिती 1: मिळालेले CENVAT आणि इनपुट व्हॅट क्रेडिट

केंद्रीय अबकारी कर

central excise

निर्माता

जीएसटी लागू होणाच्या तारखेआधी एक निर्माता शेवटच्या दिवशी उपलब्ध CENVAT क्रेडिट (शिल्लक) पुढे जोडू शकतो, याचा इनपुट क्रेडिट म्हणून वापर होऊ शकतो.

याचा अर्थ काय होतो?

आज, लघु उद्योगावर आधारित इंडस्ट्रीज (स्मॉल स्केल इंडस्ट्रीज (एस एस आय) – ज्यांची उलाढाल 4 कोटी पेक्षा जास्त नाही) ला सोडून या व्यतिरिक्त इतर इंडस्ट्रीज मधील निर्मात्यांनी फॉर्म ई आर-1 मध्ये त्यांचे मासिक रिटर्न्स आणि फॉर्म ई आर-3 मध्ये एस एस आय तिमाही रिटर्न्स दाखल केले पाहिजेत. CENVAT ची रक्कम फॉर्म ई आर -1 किंवा फॉर्म ई आर-3 मध्ये नमूद करावी जी शेवटच्या दिवशी (‘जीएसटी’ लागू होण्याच्या एक दिवस आधी) पुढे चालविली जाऊ शकते, ‘जीएसटी’ लागू होण्याआधी ही रक्कम CGST इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून पुढे नेण्यास अनुमती दिली जाईल.

एक उदाहरणाद्वारे आपण हे समजून घेऊ.

सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड, कर्नाटक मध्ये स्थित एक कार निर्माता कंपनी आहे. तिची जकात शुल्क व व्हॅट कर्नाटक सरकारांतर्गत नोंदणीकृत आहे. दिनांक 31 मार्च, 2017 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, सुपर कार प्रायव्हेट लिमिटेडचा फॉर्म ई आर-1 खालीलप्रमाणे आहे:

फॉर्म ई आर-1

२०१७ व्या वर्षी मार्च महिन्यात भांडवलीयुक्त मालाचे रिटर्न्स आणि CENVAT क्रेडिट ची उपलब्धता
क्रेडिटचा तपशील
CENVAT
AED_TTA
NCCD
ADE_LVD_CL_85
ADC_LVD_CT_75
EDU_CESS
SEC_EDU_CESS
SERVICE_TAX
EDU_CESSST
SEC_EDU_CESS_ST
अंतिम शिल्लक25,000.000.000.000.000.000.000.000.000.000.00

फॉर्म ई आर-1 मार्च 2017 नुसार, सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड ची शिल्लक CENVAT रक्कम 25,000 रुपये इतकी आहे.
सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड शिल्लक CENVAT क्रेडिट पुढे वाहून नेऊ शकेल काय?

होय, 25,000 रुपयांवर बंद झालेली CENVAT शिल्लक, सुपर कार लिमिटेड पुढे परावर्तित करण्यासाठी पूर्णपणे पात्र आहे. कारण, सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड खालील सर्व अटी स्पष्टपणे पूर्ण केल्या आहेत :

 • CENVAT चे शिल्लक 25,000 रुपये, रिटर्न्स मध्ये दिसायला हवेत, आणि
 • ‘जीएसटी’ मध्ये याचाच उल्लेख इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून करण्यास परवानगी असेल.

आता, सुपर कार प्रा लिमिटेड करिता, CENVAT हे एक CGST क्रेडिट असेल. विहित क्रमानुसार उत्तरदायित्वे पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

अबकारी विक्रेता

एक विक्रेता म्हणून, अबकारीयुक्त मालाचा व्यापार करण्यासाठी केंद्रीय अबकारी करा अंतर्गत आपण नोंदणीसाठी पात्र आहेत. आज आपण अबकारी कर म्हणून दिलेले पैसे क्रेडिट मध्ये उपलब्ध होणार नाहीत. फ़र्स्ट स्टेज आणी सेकन्ड स्टेज विक्रेता म्हणून, भरलेला अबकारी कर उत्पादन किंमती मध्ये जोडला जातो. जर ती वस्तू एखाद्या निर्मात्याला विकली जात असेल तर,अबकारी कराचा उल्लेख खरीदणारा निर्माता CENVAT क्रेडिट असा करू शकतो.

‘जीएसटी’ लागू होण्याच्या वेळी, क्लोज़िंग स्टॊक साठी जो अबकारी कर आपल्याद्वारे भरला गेला आहे, त्याचा पुढे जाऊन CGST इनपुट कर क्रेडिट म्हणून वापर करण्याची अनुमती दिली जाईल.

व्हॅट

VAT

व्हॅट अंतर्गत नोंदणीकृत व्यवसाय आपआपल्या राज्यांत ठरवून दिली, मासिक किंवा तिमाही व्हॅट परतावा अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. व्हॅट रिटर्न्स फॉर्म मध्ये इनपुट VAT क्रेडिट हा SGST इनपुट टॅक्स क्रेडिट च्या रूपात पुढे नेण्यात येईल.

एक उदाहरणद्वारे आपण हे समजून घेऊ.

सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड, कर्नाटक मध्ये स्थित एक कार निर्माता कंपनी असून ती कर्नाटक व्हॅट अंतर्गत नोंदणीकृत आहे. दिनांक 31 मार्च, 2017 पर्यंत व्हॅट फॉर्म 100 (कर्नाटक राज्यासाठी मासिक रिटर्न्स फॉर्म) नुसार सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड चा तपशील खालीलप्रमाणे आहे:

फॉर्म व्हॅट 100 (138 वा नियम पहा)

रिटर्न

कर कालावधी (महिन्याला / तिमाहीला)

मार्च, 2017
क्रेडिट / अतिरिक्त पुढे नेलेला भरणा5,000.00

मार्च 2017 पर्यंतच्या व्हॅट फॉर्म 100 नुसार, सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड कडे 5,००० रुपयाचे इनपुट VAT क्रेडिट शिल्लक आहे.

सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड पुढे इनपुट VAT क्रेडिट वाहून नेऊ शकते का?

होय, 5000 रुपये इतके बंद होत असलेले इनपुट व्हॅट क्रेडिट पूर्णपणे सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड पुढे नेऊ शकते. याचे कारण सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड खालील सर्व अटी स्पष्टपणे पूर्ण करत आहे :

 • 5,000 रुपये इतका इनपुट व्हॅट, रिटर्न्स मध्ये प्रतिबिंबित होईल, आणि
 • ‘जीएसटी’ मध्ये याचाच उल्लेख इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून करण्यास परवानगी असेल.

आता, सुपर कार प्रा लिमिटेड करिता, इनपुट व्हॅट हे एक SGST क्रेडिट असेल. विहित क्रमानुसार उत्तरदायित्वे पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

सेवा कर

service tax

आज, जर सेवा प्रदात्याचे करपात्र सेवांतील खात्याचे मूल्य 10 लाखाहुन अधिक होत असेल तर, तो नोंदणी करण्यासाठी पात्र असतो. करपात्र सेवांवर आकारण्यात येणार सेवा कर खालील प्रमाणे आहे:

कर कराचा दर इनपुट क्रेडिट उपलब्ध आहे का? कशाबद्दल आकारला जात आहे?
सेवा कर

14%

होय

सेवा कर आणि अबकारी दायित्व
स्वच्छ भारत उपकर

0.5%

नाही

कृषी कल्याण उपकर

0.5%

होय

फक्त कृषी कल्याण उपकराच्या दायित्वा साठी

 

एक सेवा प्रदाता म्हणून, आपल्याला सहामाही ST-3 रिटर्न फॉर्म भरणे आवश्यक आहे. अखेरचा शिल्लक इनपुट क्रेडिट सेवा कर पुढे CGST इनपुट कर क्रेडिट म्हणून चालविला जाईल.

एक उदाहरणद्वारे आपण हे समजून घेऊ.

सुपर कार लिमिटेड कर्नाटकात कार उत्पादन करणारे युनिट आहे. त्यांच्या कर्नाटका मध्ये स्थित सेवा देणाऱ्या शाखा देखील आहेत. दिनांक 31 मार्च, 2017 रोजी, सुपर कार लिमिटेडचा ST 3 रिटर्न फॉर्म खाली दिला आहे:
service_tax

मार्च 2017 पर्यंतच्या फॉर्म ST-3 नुसार, सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड च्या CENVAT (सेवा कर इनपुट क्रेडिट) शिल्लक 30,000 रुपये आहे.
आता, सुपर कार प्रा लिमिटेड करिता, CENVAT हा एक CGST क्रेडिट असेल. विहित क्रमानुसार उत्तरदायित्वे पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

परिस्थिती 2: केपिट्ल गुड्स वर मिळण्याचा बाकी असलेला CENVAT क्रेडिट आणि इनपुट व्हॅट

सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड पुढे CENVAT क्रेडिट वाहून नेऊ शकते का?

होय, सुपर कार इंडस्ट्रीज CENVAT क्रेडिट रु. 30000चे शिल्लक प्रती वाहून घेण्यासाठी पूर्णपणे पात्र आहे, याचे कारण सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड खालील सर्व अटी स्पष्टपणे पूर्ण करत आहे :

 • 30,000 रुपये इतका CENVAT , रिटर्न्स मध्ये प्रतिबिंबित होईल, आणि
 • ‘जीएसटी’ मध्ये याचाच उल्लेख इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून करण्यास परवानगी असेल.

आता, सुपर कार प्रा लिमिटेड करिता, CENVAT हा एक CGST क्रेडिट असेल. विहित क्रमानुसार उत्तरदायित्वे पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

परिस्थिती 2: केपिट्ल गुड्स वर मिळण्याचा बाकी असलेला CENVAT क्रेडिट आणि इनपुट व्हॅट

सध्या, केंद्रीय अबकारी शुल्क व्यवस्थापना अंतर्गत, CENVAT क्रेडिट चालू वर्षी 50% इतक्या प्रमाणात घेतला पाहिजे, आणि उर्वरित त्यानंतरच्या वर्षी घेतला पाहिजे. तसेच, भांडवली साठी आवश्यक वस्तू खरेदी करताना मोजलेला व्हॅट, लगेच इनपुट व्हॅट म्हणून पूर्णपणे उपलब्ध होणार नाही. प्रत्येक राज्याच्या व्हॅट संबंधी कायद्यानुसार तसेच खरेदीलेल्या भांडवली वस्तूंच्या प्रकारानुसार, इनपुट व्हॅट:

 • विविध आर्थिक वर्षांत विस्तारलेल्या हप्त्यांच्या मदतीने मिळवला जाऊ शकतो ,
 • व्यावसायिक उत्पादन सुरु केल्यानंतर त्यावरील क्रेडिट म्हणून मिळवला जाऊ शकतो आणि इतर विकासाप्रमाणे मिळवता येऊ शकतो;

भांडवली वस्तू वर योग्य तो CENVAT क्रेडिट घेण्यासाठी असलेल्या प्रचलित प्रतिबंधामुळे, ‘जीएसटी’ मध्ये परिवर्तन झाल्यावर काही न मिळालेले CENVAT आणि इनपुट व्हॅट असू शकतात.

आपण एका उदाहरणाने हे चांगल्या पद्धतीने ने समजून घेऊ.

सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड 1 फेब्रुवारी 2017 रोजी काही यंत्रणा खरेदी करते, या व्यवहाराचा तपशील खाली दिलेला आहे:

तपशील रक्कम (रुपये)
यंत्रणा1,00,000
उत्पादन शुल्क @12.5%12,500
व्हॅट 14.5%16,313
एकूण1,28,813

चालू CENVAT तरतुदींनुसार, सुपर कार प्रायव्हेट लिमिटेडला चालू वर्षी CENVAT चा 50% पर्यंत लाभ घेण्यासाठी परवानगी आहे, आणि त्यानंतरच्या वर्षात बाकी लाभ ते घेऊ शकतात. कर्नाटक राज्याच्या व्हॅट तरतुदींनुसार, इनपुट VAT क्रेडिट केवळ व्यावसायिक उत्पादन सुरु केल्यानंतर घेता येईल. व्यापारी उत्पादन June’17 महिन्यात सुरू केले होते असे आपण गृहीत धरूया.

दिलेली परिस्थिती लक्षात घेता – सुपर कार प्रायव्हेट लिमिटेडला

 • 50% CENVAT मिळेल म्हणजेच चालू वर्षी (2016-17) मध्ये 6250 रुपये मिळतील.
 • 6.250 रुपये इतका उर्वरित CENVAT त्यानंतरच्या वर्षी (2017-18) मध्ये मिळेल.
 • व्यावसायिक उत्पादनासाठी सुरु केल्यानंतर इनपुट VAT क्रेडिट, 2017-18 मध्ये मिळवण्यास पात्र राहील.

जीएसटी मध्ये परिवर्तन झाल्यानंतर सुपर कार लि. ला मिळण्याचा बाकी असलेला 6250 रुपयाचा CENVAT आणि 16313 रुपयाचा इनपुट व्हॅट ह्या दोघी रक्कम पुढे परावर्तित करण्याची अनुमती असेल का?

होय, सुपर कार लिमिटेडला पुढील सर्व अटी पूर्ण केल्यावर, भांडवली वस्तू वर न मिळालेल्या CENVAT क्रेडिटची रक्कम पुढे नेण्यास परवानगी आहे:

 • सध्याच्या नियमा अंतर्गत, CENVAT आणि इनपुट व्हॅट यांची इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून उपयोग करण्यास परवानगी आहे.
 • जीएसटी’ मध्ये तो इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून वापरला जाऊ शकतो.

‘सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड वरील सर्व अटी पूर्ण करते, आणि ते CENVAT व इनपुट व्हॅट क्रेडिटची रक्कम मिळवण्यास पात्र आहेत.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

71,691 total views, 85 views today

Yarab A

Author: Yarab A

Yarab is associated with Tally since 2012. In his 7+ years of experience, he has built his expertise in the field of Accounting, Inventory, Compliance and software product for the diverse industry segment. Being a member of ‘Centre of Excellence’ team, he has conducted several knowledge sharing sessions on GST and has written 200+ blogs and articles on GST, UAE VAT, Saudi VAT, Bahrain VAT, iTax in Kenya and Business efficiency.