या ब्लॉगमध्ये, आपण फॉर्म जीएसटीआर-३बी आणि जीएसटीआर-३बी फाइलिंगची प्रक्रिया सोपी करण्यासाठी टॅलीच्या जीएसटी-रेडी सॉफ्टवेअरद्वारे दिले गेलेल्या उपायांबद्दल चर्चा करूयात.

हाताळले गेलेले विषय

फॉर्म जीएसटीआर-३बी चा परिचय
जीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी हाताळायची सोय आहे काय?
मी जीएसटी-रेडी टॅली सॉफ्टवेअर अपग्रेडे केले नाहीतर काय होईल? मी तरीही फॉर्म जीएसटीआर-३बी फाईल करू शकतो का?
टॅली.इआरपी ९ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी कसा हाताळावा ?()

फॉर्म जीएसटीआर-३बी चा परिचय

आत्तापर्यंत, आपल्याला माहिती आहे की सरकारने जीएसटीआर-१ आणि जीएसटीआर-२ च्या टाईमलाईन्स शिथिल केल्या आहेत. म्हणजेच जुलै आणि ऑक्टोबर २०१७ साठीचा पहिला जीएसटी-१ , संभाव्यतया, सप्टेंबर २०१७ मध्ये अपलोड केला जाऊ शकतो आणि उर्वरित इतर उपक्रम आणि औपचारिकता त्यानंतर बघितल्या जातील.
तथापि, याचा अर्थ असा नाही की तोपर्यंत जीएसटीचे संकलन आणि पेमेंट करणे आवश्यक नाही. जीएसटीच्या नियमित नोंदणीकृत करदात्यांनी डिसेंबर 2017 पर्यंत अंतर्गत आणि बाह्य पुरवठ्यांची माहिती जीएसटीआर-३बी द्वारे दाखल केली पाहिजे आणि त्यानुसार जीएसटी भरला पाहिजे.

वाचा:  जीएसटीआर-३बी कसा भरवा ते समजून घ्या.

जीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी हाताळण्याची सोय आहे काय?

Tally.ERP 9 Release 6 जीएसटीआर-३बी सह तयार आहे आणि आपण डाउनलोडकरू शकता किंवा टॅली.इआरपी ९ च्या माहिती पॅनेलमधील आवृत्ती आणि अपडेट्स विभागावर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

आमच्या ग्राहकांसाठी आम्ही जीएसटीआर-३बी प्रिंट करण्याची सोय पुरविण्याचे नियोजन केले आहे, ज्याने एक वर्ड डॉक्युमेंट तयार होईल. हे डॉक्युमेंट तयार करणे ग्राहकास सोपे जाणार आहे कारण ह्या डॉक्युमेंटसाठी लागणारी माहिती जीएसटीएन पोर्टलसाठी लागणाऱ्या माहिती सारखीच आहे. यामुळे ग्राहकास जीएसटीआर-३बी फाइल करण्यास आत्मविश्वास येईल आणि तसेच आपणही २० ऑगस्ट पर्यंत आपला जीएसटीआर-३बी फाइल करू शकता.

जर जीएसटीएन ने जीएसटीआर-३बी भरण्यासाठी आणि फाइल करण्यासाठी ऑफलाईन सेवा आणि एक्सेल टेम्प्लेट पुरविले तर आम्हीही पुरवू.

महत्वाचे आहे कि आपण या महिने साठी फाइल केलेला जीएसटीआर-३बी फॉर्म या महिने साठी जीएसटीएनद्वारे तयार करण्यात आलेल्या जीएसटीआर-३ शी जुळला पाहिजे.

डेटा स्रोत एकच असल्याने, टॅली.इआरपी ९ चा वापर केल्यास जीएसटीआर-३ आणि जीएसटीआर-३बी ची जुळवाजुळव करणे सोपे जाणार आहे. नाहीतर एकदा जीएसटीआर-३ तयार झाला आणि त्यात काही चूक असेल तर त्याप्रमाणे करदेयकाला कर भरावा लागू शकतो. किंवा जर रिफंड असेल तर आयटीसीच्या स्वरूपात ती रक्कम उपलब्ध होईल.

जीएसटीआर-३बी व टॅली.इआरपी ९ रिलीज ६ च्या अधिक माहितीसाठी TallyHelpला भेट द्या.

मी जीएसटी-रेडी टॅली सॉफ्टवेअर अपग्रेडे केले नाहीतर काय होईल? मी तरीही फॉर्म जीएसटीआर-३बी फाइल करू शकतो का?

आम्ही शिफारस करतो कि आपण जीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ चे नवीनतम रिलीज उपलब्ध होताच घ्या. याने जीएसटीआर-३बी फाइल करण्यासाठी लागणारी सगळी माहिती एकाच दस्तऐवज मध्ये असेल, याची खात्री होईल. तथापि, आपणास जीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ चे नवीनतम रिलीज घेता न येण्यास अनेक करणे असू शकतात. पण काळजीचे कारण नाही, जीएसटीआर-३बी फाइल करण्यासाठी लागणारा डेटा टॅली.इआरपी ९ मध्ये आहे.

जर आपण टॅली.इआरपी ९ चे जुने रिलीज वापरत आहेत आणि जीएसटीआर-३बी फाइल करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी लागणारी सर्व माहिती जीएसटीआर-१ आणि जीएसटीआर-२ मध्ये उपलब्ध असेल.

• फक्त जीएसटीआर-१ / जीएसटीआर-२ रिपोर्ट उघडा आणि V :डीफॉल्ट व्हिव वर क्लिक करा.
• वर्गीकरणानुसार माहिती मिळविण्यासाठी F1 : डीटेल्ड वर क्लिक करा.

आपल्याला अधिक राज्यवार किंवा चलन-वार माहितीची आवश्यकता असल्यास, संबंधित वर्गीकरणांवर प्रविष्ट करा दाबा.

सर्व माहिती, जरी विविध तक्त्यांत पसरली असली तरी ती आपल्या GST- तयार सॉफ्टवेअर टॅलि.एआरपी 9 मधून उपलब्ध आहे.

यावर अधिक माहिती लवकरच help.tallysolutions.com वर उपलब्ध केली जाईल.

टॅली.इआरपी ९ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी कसा हाताळावा

निष्कर्ष

जीएसटीच्या या प्रवासासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. आणि आपल्या सर्व गरजांसाठी टॅली.इआरपी ९ आपल्याला फायदेशीर ठरेल याची खात्री करू. सरकारद्वारे सुचवल्याप्रमाणे नवीनतम सुधारणांविषयी आम्ही आपल्याला कळवू.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

282,080 total views, 180 views today

Avatar

Author: Shailesh Bhatt