Language

  • English
  • Hindi
  • Marathi
  • Kannada
  • Telugu
  • Tamil
  • Gujarati

वर्तमान अप्रत्यक्ष कर प्रणाली पाहिल्यास, इनपुट क्रेडिटची साखळी, एका विशिष्ट टप्प्यावर, तुटते. आपण असे समजूया की , केंद्रीय विक्री कर (सीएसटी) जो आंतरराज्यीय व्यापारास लागू होतोय, तो भरण्यालायक नसतो, यामुळे इनपुट क्रेडिट भरण्याची साखळी खंडित होते. तसेच, निर्माता विक्री व अबकारी कर, विक्रेत्यास आकरतो तेव्हा इनपुट क्रेडिटची साखळी पुन्हा खंडित होते.  यामुळे उत्पादन खर्चात लागत कर जोडला जातो.

2005 मध्ये, ‘व्हॅट’ हा ‘कासकेडिंग परिणाम’ म्हणजेच करावर कर लावण्याच्या पद्धतीवर मात करण्याच्या उद्देश समोर ठेवून सुरू करण्यात आला. व्हॅट जर याचा परिणाम दूर करण्यासाठी आकारला जात होता, तर ‘कासकेडिंग परिणाम’ हा ‘जीएसटी’ मध्ये वेगळा का गृहीत धरला आहे?

होय, व्हॅटद्वारे ‘कासकेडिंग करा’चा राज्याच्या अप्रत्यक्ष करावर होणारा परिणाम उकलण्यात यश मिळाले पण इतर अप्रत्यक्ष करांवर कासकेडिंगचा प्रभाव अजूनही तसाच राहिला. जीएसटी, कर क्रेडिटची राज्याच्या सीमा पार तसेच निर्मात्यापासून किरकोळ विक्रेत्या पर्यंत एक सलग शृंखला ठेवते, आणि त्यामुळे करावर कर लागण्यास प्रतिबंध होतो.

आपण विद्यमान व ‘जीएसटी’ योजने अंतर्गत एकूण कर दर 22 टक्के इतका मानूया आणि उत्पादीत वस्तू म्हणून एक कार गृहीत धरू, आणि याचे परीक्षण करू – करावर कर लागण्यात कसा प्रतिबंध झाला आहे हे समजताना,

5,280 रुपयाची बचत कशी झाली हे आपले लक्ष वेधित आहे! नाही का? आपण याचे परीक्षण करूया.

आपण लक्षपूर्वक निरीक्षण केल्यास, उदाहरणात, विक्रेत्याने निर्मात्यास दिलेला कर (सीजीएसटी + एसजीएसटी) खर्चात समाविष्ट नाही. याचे कारण ‘जीएसटी’ विक्रेत्यास सीजीएसटी + एसजीएसटी करांच्या दायित्वास विलंब लावण्याची परवानगी देते. हे जीएसटीचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे कर क्रेडिटची राज्याच्या सीमा पार तसेच निर्मात्यापासून किरकोळ विक्रेत्या पर्यंत एक सलग शृंखला ठेवते, आणि त्यामुळे करावर कर लागण्यास प्रतिबंध होतो.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

57,191 total views, 27 views today