Language

  • English
  • Hindi
  • Marathi
  • Kannada
  • Telugu
  • Tamil
  • Gujarati

प्रत्येक नोंदणीकृत करपात्र व्यक्तीस महिन्याच्या दहाव्या दिवसापर्यंत GSTR-१ फॉर्म मध्ये बाह्य पुरवठ्याचा तपशील (‘जीएसटी’ परत-1) सादर करावा लागतो. अकराव्या दिवशी, आवक पुरवठ्याचा तपशील स्वयं-चलित GSTR-2 अ फॉर्म द्वारा प्राप्तकर्त्यास उपलब्ध केला जातो. 11 व्या दिवसापासून 15 व्या दिवसापर्यंत प्राप्तकर्त्यास फॉर्म GSTR-2 अ मध्ये कोणत्याही दुरुस्त्या (वाढीव अटी, सुधारणा आणि मजकूर हटविण्याचे काम) करण्याची मुभा असते त्यानंतर GSTR-२ च्या रूपात हा फॉर्म त्याच महिन्याच्या १५ तारखेपर्यंत सादर करण्यासाठी परवानगी असते. GSTR-2 फॉर्म मध्ये केलेल्या दुरुस्त्या (वाढीव अटी, सुधारणा आणि हटविलेले मजकूर) पुरवठादारास फॉर्म GSTR-1A मध्ये उपलब्ध केल्या जातील. पुरवठादार केलेल्या दुरुस्त्यांचा स्वीकार करू शकतो अथवा नापसंती दर्शवू शकतो. फॉर्म GSTR-1 मध्ये पुरवठादारास मान्य असलेल्या सुधारणा ग्राह्य धरून त्यानुसार दुरुस्ती केली जाईल.

विसाव्या दिवशी, स्वयं-चलित GSTR-3 रिटर्न, दिलेल्या रक्कमीसोबत सादर करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. GSTR 3 चा मासिक रिटर्न्स फॉर्म सादर करायची तारीख संपल्यानंतर, पुरवठादाराद्वारा निर्मित बाह्य पुरवठा आणि आवक पुरवठा यातील तपशील जुळवाला जाईल, आणि नंतर इनपुट टॅक्स क्रेडिटचा अंतिम स्वीकृती फॉर्म ‘जीएसटी’ एमआयएस-1 द्वारा कळविला जाईल.

तसेच, इनपुट टॅक्स क्रेडिटवर कुठलेही अतिशयोक्तीचे दावे किंवा नक्कल केले असल्याचे दावे आढळले व ते खात्यावरील तपशीलांसोबत जुळत नसतील तर फॉर्म ‘जीएसटी’ एमआयएस-1 मध्ये ते कळवले जाईल. कुठल्याही अतिरिक्त विसंगती ज्यांचे निराकरण करण्यात आले नसेल त्यांना व्याजासह उत्पादन कर दायित्व म्हणून जोडले जाईल. तथापि, विहित मुदतीत, त्याचे निराकरण केले जात असेल तर, प्राप्तकर्ता ह्या बाह्य करावरील दायित्व कमी करण्यासाठी पात्र असेल.

आपण पुढील उदाहरणाने जीएसटी रिटर्न्स फाईल करण्याची प्रक्रिया समजून घेऊ.

How to file your GST Returns_Marathi

 

 

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

263,965 total views, 19 views today