जे व्यापारी कर भरण्यासाठी आधीच नोंदणीकृत आहेत त्यांनी जीएसटीसाठी प्रोव्हिजिनल नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि जर जीएसटीसाठी नोंदणी केली असेल तर प्रोव्हिजिनल नोंदणी रद्द केली पाहिजे.

पण जर आपण नवीन व्यापारी आहात किंवा काही कारणाने जीएसटीसाठी नोंदणी केलेली नाही आणि आता थ्रेशोल्ड मर्यादामूळे नोंदणी केलेली असणे जरुरीचे झाल्याने, आपण जीएसटीसाठी नवीन नोंदणी करू शकता.

वाचा:  आपण नोंदणीकृत विक्रेता आहात? जीएसटीमध्ये कसे संक्रमण करावे ते शिका

नवीन जीएसटी नोंदणी मिळविण्यासाठी काय करावे लागेल-

स्टेप १: आपल्या राज्यातील थ्रेशोल्ड मर्यादा काय आहे ते माहिती करून घ्या.

जीएसटीच्या नोंदणीसाठी खाली दिलेल्या थ्रेशोल्ड मर्यादा आहेत:

 • विशेष वर्गातील राज्यांसाठी (अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड) – रू. १० लाख.
 • उर्वरित भारतभर – रु. २० लाख.

टीप: जम्मू-काश्मीरने सुरुवातीला जरी जीएसटी स्वीकारली नसली तरी ५ जुलै रोजी जीएसटी रिझोल्यूशन स्वीकारले गेले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील थ्रेशोल्ड मर्यादा मुख्यतः १० लाख रुपये राहील.

स्टेप २ : नवीन जीएसटी नोंदणी मिळवा

आपल्याला सामान्य डिलरशिप हवी असो किंवा कॉम्पोजिट स्कीम , हवी असो, खाली दिलेल्या सूचना आपल्याला नवीन जीएसटी नोंदणी मिळवण्यासाठी उपयोगी पडतील:

 • सामान्यजीएसटी पोर्टल उघडा.
 • आपल्याला पॅन, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी देऊन फॉर्म जीएसटी आरईजी-१ चा भाग अ भरणे आणि सादर करणे आवश्यक आहे. पॅन क्रमांक जीएसटी पोर्टलवर पडताळला जाईल, तसेच वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सह मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडीची पडताळणी केली जाईल.
 • हे केल्यावर, आपल्याला आपल्या मोबाईलवर आणि ई-मेलवर अर्ज संदर्भ क्रमांक प्राप्त होईल.
 • आता आपल्याला मिळालेला अर्ज संदर्भ क्रमांक देऊन फॉर्म जीएसटी आरईजी-१ चा भाग ब भरणे आवश्यक आहे. फॉर्म सबमिट करण्या आधी खाली असलेल्या भागात जे दस्तऐवज विचारले असतील ते फॉर्म बरोबर जोडणे आवश्यक आहे.
 • अतिरिक्त माहितीची आवश्यकता असल्यास, फॉर्म जीएसटी आरईजी-३ पोर्टलवरून पुरवला जाईल. फॉर्म जीएसटी आरईजी-३ मिळाल्यानंतर आपल्याला ७ दिवसात विचारलेली माहिती फॉर्म जीएसटी आरईजी-४ मध्ये भरून देणे आवश्यक आहे.
 • जर आपण फॉर्म जीएसटी आरईजी-१ किंवा फॉर्म जीएसटी आरईजी-४ मध्ये विचारलेली सगळी माहिती अचूक दिली असेल तर फॉर्म जीएसटी आरईजी-१ किंवा फॉर्म जीएसटी आरईजी-४ सबमिट केल्याच्या ७ दिवसात आपल्याला फॉर्म जीएसटी आरईजी-६ च्या स्वरूपात नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. पण जर दिलेली माहिती चुकीची किंवा स्वीकारण्यायोग्य नसेल तर आपल्याला फॉर्म जीएसटी आरईजी-५ देऊन आपले अर्ज नाकारण्यात आले आहे असे सांगण्यात येईल.
नवीन जीएसटी नोंदणीसाठी लागणाऱ्या दस्तऐवजांची चेकलिस्ट

आपल्याकडे खाली दिलेले सर्व दस्तऐवज आहेत याची खबरदारी घ्या.

 • पॅन
 • संपर्क : ईमेल आयडी, संपर्क क्रमांक
 • फोटो: मालक, व्यवस्थापक, समिती इ.
 • भागीदारी करार, नोंदणी प्रमाणपत्र किंवा घटनेचे अन्य पुरावे.
 • जागेसाठी लागणारे पुरावे:
  • स्वतःच्या जागेसाठी – कर पावती किंवा म्युनिसिपल खाते प्रत किंवा विजेच्या बिलची प्रत यासारख्या मालकीच्या इमारतीच्या मालकीची कोणतेही दस्तऐवज.
  • भाड्याने घेतलेल्या जागेसाठी – भाडे कराराची प्रत, भाड्याने घेतलेल्या जागेची कर पावती किंवा म्युनिसिपल खाते प्रत किंवा विजेच्या बिलची प्रत..
 • बँक संबंधित पुरावे: बँक स्टेटमेंट किंवा पास बुकच्या पहिल्या पानाची स्कॅन्ड प्रत.
 • अधिकृतता फॉर्म: प्रत्येक स्वाक्षरीकरणासाठी अधिकृत प्रमाणपत्रात किंवा व्यवस्थापकीय समितीच्या रिझोल्यूशनची प्रत विचारलेल्या स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे.
विशिष्ट करपात्र व्यक्तींची नवीन नोंदणीसाठी लागणारे फॉर्म
फॉर्म नं.फॉर्मचा प्रकार
फॉर्म जीएसटी आरईजी-७टॅक्स डिडक्टर किंवा टॅक्स कलेक्टर ऍट सोरस् म्हणून नोंदणी करण्यासाठीचा फॉर्म.
फॉर्म जीएसटी आरईजी -९ अनिवासी करपात्र व्यक्ती म्हणून नोंदणी करण्यासाठीचा फॉर्म.
फॉर्म जीएसटी आरईजी -९अ कर आकारण्यात न येणाऱ्या ऑनलाईन प्राप्तकर्त्याला डेटाबेस आणि माहिती पुरवणारी व्यक्ती म्हणून नोंदणी करण्यासाठीचा फॉर्म.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

108,257 total views, 5 views today