Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

आम्ही मागील पोस्टमध्ये इनपूट टॅक्स क्रेडिट  (आयटीसी)ची ओळख करून दिली होती.

आता, जीएसटी प्रणालीत तुमच्या टॅक्स लायबिलिटीच्या बदल्यात तुमचे इनपूट क्रेडिट कसे सेट ऑफ करावे, हे समजून घेऊया.

जीएसटी ही द्विसंकल्पनात्मक प्रणाली आहे. तुमच्या प्रत्येक व्यवहारावर (एकाच राज्यातील) आणि स्टेट जीएसटी (एसजीएसटी) असा एकत्रित कर लागू होईल. राज्या-राज्यांमधील व्यवहारांवर इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) लावला जाईल. त्यामुळे, कायद्यात नमूद केल्याप्रमाणे यातील प्रत्येक बाबीवरील इनपूट क्रेडिट कसा सेट ऑफ करावा, हे जाणून घेणे प्रत्येक व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
क्रेडिट कोणत्या क्रमाने सेट ऑफ करावे, हे खालील तक्त्यात स्पष्ट करण्यात आले आहे :

इनपूट टॅक्स क्रेडिटसेट ऑफ अगेंस्ट लायबिलिटी
सीजीएसटी (सेंट्रल जीएसटी)सीजीएसटी आणि आयजीएसटी (त्या क्रमाने)
एसजीएसटी (स्टेट जीएसटी)एसजीएसटी आणि आयजीएसटी (त्या क्रमाने)
आयजीएसटी (इंटिग्रेटेड जीएसटी)आयजीएसटी (इंटिग्रेटेड जीएसटी)

 

ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी उदाहरण पाहू.

उदाहरण १ – सीजीएसटी आणि एसजीएसटी आयटीसी कसे वापरणार?

सुपर कार्स लि. ही कर्नाटकातील एक उत्पादक कंपनी आहे. सुपर कार्स लि.चे करासह व्यवहार खालीलप्रमाणे आहेत :

पक्षकाराचे नाव राज्यव्यवहाराचा प्रकारउत्पादनइनपूट क्रेडिट टॅक्स लायबिलिटी
सीजीएसटी एसजीएसटीसीजीएसटी एसजीएसटी
रत्ना स्टील्सकर्नाटकखरेदी (आवक पुरवठा)स्टील1,20,0001,20,000
रविंद्र ऑटोमोबाइल्सकर्नाटकविक्री (जावक पुरवठा)गाडी36,00036,000
रविंद्र ऑटोमोबाइल्सकर्नाटकविक्री (जावक पुरवठा)सुटे भाग — —90,00090,000

 

महिन्याच्या अखेरीस सुपर कार्स लि. त्यांच्या उपलब्ध इनपुट क्रेडिटच्या बदल्यात त्यांची टॅक्स लायबिलिटी ऍडजस्ट करतील.

या उदाहरणात सुपर कार्स लि.कडे १२,०००ची टॅक्स लायबिलिटी आहे. हे कसे घडते :

 1. सीजीएसटी आणि एसजीएसटीच्या रुपात सुपर कार्स लि.चे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे १,२०,०००..
 2. कायद्यात नमुद केल्याप्रमाणे, सुपर कार्स लि. सगळ्यात आधी १,२६,००० (३६,०००+९०,०००)ची जीसीएसटी लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी १,२०,००० च्या सीजीएसटी आयटीसीचा वापर करतील. यानंतर जीसीएसटी लायबिलिटी असेल ६,००० (१,२६,०००-१,२०,०००).
 3. त्यानंतर १,२६,००० (३६,०००+९०,०००)च्या एसजीएसटी लायबिलिटीच्या बदल्यात १,२०,००० चे एसजीएसटी इनपुट क्रेडिट सेट ऑफ केले जाईल. एसजीएसटी इनपुट क्रेडिट सेट ऑफ केल्यानंतर एसजीएसटी लायबिलिटी असेल ६००० (१,२६,०००-१,२०,०००).
 4. सीजीएसटी आणि एसजीएसटी असे दोन्ही उपलब्ध इनपुट क्रेडिट वापरल्यानंतर सुपर कार्स लि. ची टॅक्स लायबिलीटी असेल १२००० (सीजीएसटी कर ६००० एसजीएसटी कर ६०००)
 5. सीजीएसटी कर सेट ऑफ केल्यानंतर सीजीएसटीमध्ये कोणत्याही प्रकारे इनपुट क्रेडिट शिल्लक राहिल्यास ती रक्कम एसएजीएसटी सेट ऑफ करण्यासाठी वापरता येणार नाही. जीसीएसटीअंतर्गत आयटीसीचा बॅलन्स (जीसीएसटी लायबिलिटी सेट ऑफ केल्यानंतर) पुढील कर वेळापत्रकात वापरला जाईल.
 6. त्याचप्रमाणे, एसजीएसटी लायबिलिटी सेट ऑफ केल्यानंतर एसजीएसटी शिल्लकही पुढील कार्यकालासाठी वापरली जाईल.

उदाहरण २ – आयजीएसटी आयटीसी कसे वापरले जाईल?

सुपर कार्स लि.चे काही इतर व्यवहार पाहूया

पक्षकाराचे नावराज्यव्यवहाराचा प्रकारउत्पादनइनपूट क्रेडिट टॅक्स लायबिलिटी
सीजीएसटीएसजीएसटी आयजीएसटीसीजीएसटी एसजीएसटीआयजीएसटी
शाइन अल्युमिनिअम इंडस्ट्रीज लि.तामिळनाडूखरेदी (आवक पुरवठा)अल्युमिनिअम बार्स30,000 —
लक्ष्मी रबर इंडस्ट्रीज लि.तामिळनाडूखरेदी (आवक पुरवठा)टायर्स — —10,000 — — —
ए -1 स्पेअर्समहाराष्ट्रविक्री (जावक पुरवठा)सुटे भाग — —12,000
जॉनसन ऑटो पार्ट्‌सकर्नाटकविक्री (जावक पुरवठा)सुटे भाग    24,000    24,000

 

महिना अखेरीला सुपर कार्स लि. त्यांची टॅक्स लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी आयजीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा वापर करेल.

वर सांगितल्याप्रमाणे,

 1. सुपर कार्स लि.चे आयजीएसटी इनपूट टॅक्स क्रेडिट आहे ४०,००० आणि टॅक्स लायबिलिटी- आयजीएसटी १२,०००, सीजीएसटी २४,००० आणि एसजीएसटी २४,०००.
 2. कायद्यात नमूद केल्याप्रमाणे, आयजीएसटी टॅक्स लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी प्रथम आयजीएसटी इनपुट क्रेडिट वापरावे लागेल. उर्वरित आयटीसीचा वापर जीसीएसटी आणि त्यानंतर एसजीएसटी सेट ऑफ करण्यासाठी करता येईल.
 3. सुपर कार्स लि. १२,००० च्या आयजीएसटी लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी आधी आयजीएसटी आयटीसीचा वापर करेल.
 4. उर्वरित २८००० (४०,०००-१२,०००) चे आयजीएसटी आयटीसी क्रेडिट २४०००ची सीजीएसटी लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी वापरले जाईल.
 5. यानंतर, उर्वरित ४००० चे आयजीएसटी आयटीसी ४०००च्या मर्यादेपर्यंतची एसजीएसटी लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी वापरले जाईल.
 6. आता उपलब्ध इनपुट क्रेडिटचा वापर केल्यानंतर सुपर कार्स लि.ची एसजीएसटी लायबिलिटी २०,००० आहे.

उदाहरण ३ – सीजीएसटी आयटीचा वापर एसजीएसटी लायबिलिटीसाठी करता येणार नाही

सीजीएसटी आयटीसीचा वापर एसजीएसटी लायबिलिटीच्या बदल्यात करता येणार नाही, हे स्पष्ट करणारे सुपर कार्स लि.मधील आणखी एक उदाहरण पाहू.

सुपर कार्स लि.कडे सीजीएसटी इनपुट क्रेडिटची १५,००० ची मागील बाकी आहे.

इनपुट क्रेडिट बॅलन्सरक्कम
सीजीएसटी इनपुट क्रेडिट15,000

महिन्याभरात सुपर कार्स लि.चा जावक पुरवठा याप्रमाणे आहे :
InputCreditSetoff-3_Marathi

येथे स्पष्ट केल्याप्रमाणे,

 1. सुपर कार्स लि.ने चालू काळातील ११,००० ची सीजीएसटी लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी मागील काळातील १५,००० चे सीजीएसटी इनपुट क्रेडिट वापरले.
 2. यानंतर सुपर कार्स लि.चा सीजीएसटी इनपुट क्रेडिट आहे ४,०००.
 3. कायद्यात नमूद केल्याप्रमाणे, कोणत्याही काळातील अतिरिक्त सीजीएसटी इनपुट क्रेडिटचा वापर चालू काळातील एसजीएसटी लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी करता येणार नाही. त्याचप्रमाणे सीजीएसटी लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी एसजीएसटी इनपुट क्रेडिटचा वापर करता येणार नाही.
 4. त्यामुळे, जीसीएसटी क्रेडिटचा वापर करता आला नाही आणि सुपर कार्स लि.ची एसजीएसटी लायबिलिटी या महिन्यासाठी ११,००० आहे.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

263,988 total views, 36 views today