26 नोव्हेंबर 2016 रोजी प्रकाशित सुधारित ‘जीएसटी’ मॉडेलच्या कायद्यानुसार मसूद्यात ‘जीएसटी’च्या दिशेने स्थानांतर करण्याच्या तरतुदींमध्ये ठळक बदल करण्यात आले आहेत. ही पोस्ट सुधारित मसूद्यातील बदलानुसार अद्ययावतीत केली गेली आहे.

 

‘जीएसटी’ कडे स्थानांतरीत झाल्या नंतर, सामान्यपणे खालीलपैकी कोणत्याही श्रेणींमध्ये मोडणारा व्यवसायसुद्धा समाविष्ट असेल:

 1. ज्या व्यवसायांना वर्तमान कायदा अंतर्गत नोंदणी करण्याचे दायित्व नाही, त्यांना ‘जीएसटी’ अंतर्गत नोंदणी करण्याचे दायित्व आहे.
 2. उत्पादन आणि विक्रीत सूट देण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांच्या कामात सक्रिय व्यवसाय.
 3. पहिल्या टप्प्यातील विक्रेता, दुसर्या टप्प्यातील विक्रेता अथवा नोंदणीकृत आयात करणारा व्यक्ती.

1. ज्या व्यवसायांना वर्तमान कायदा अंतर्गत नोंदणी करण्याचे दायित्व नाही, त्यांना ‘जीएसटी’ अंतर्गत नोंदणी करण्याचे दायित्व आहे:

केंद्रीय अबकारी कर कायदा आणि नियमांनुसार, उत्पादन करणार्या युनिटला जर त्यांची एकंदर मंजुरी किंमत १.५ कोटीच्या वरती जात असेल तर त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे, तसेच आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हे आवश्यक आहे. तसेच, व्हॅट अंतर्गत, एका आर्थिक वर्षात आपल्या वार्षिक उलाढाल मर्यादा पार होत असतील तर त्याची नोंदणी करणे हे आपले दाइीत्व आहे. ही मर्यादा राज्यानुसार वेगवेगळी आहे.

आज, आपण आपल्या विहित मर्यादा ओलांडल्या नाही म्हणून आपल्याकडे नोंदणी करण्याची जबाबदारी नसेल. तथापि, आपली वार्षिक उलाढाल १० लाखांहून जास्त असेल तर विशेष वर्गीय राज्यांच्या सूचीनुसार (अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड) आणि देशातील इतर राज्यांमध्ये २० लाखांहून अधिक वार्षिक उलाढाल असल्यावर आपण ‘जीएसटी’ अंतर्गत नोंदणी पात्र असाल,

2. उत्पादन आणि विक्रीत सूट देण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांच्या कामात सक्रिय व्यवसाय.

सध्या उत्पादन आणि विक्रीत सूट देण्यात आलेल्या वस्तू आणि काही सेवांमध्ये सूट देण्याच्या तरतुदी असतील, जर आपला अशा कामात व्यवसाय सक्रिय आहे, तर हे आज करमुक्त आहे पण जी.एस.टी. मध्ये स्थानांतर झाल्यानंतर त्यावर कर आकारला जाईल.

3. पहिल्या टप्प्यातील विक्रेता, दुसर्या टप्प्यातील विक्रेता अथवा नोंदणीकृत आयात करणारा व्यक्ती.

एक विक्रेता म्हणून, आपण उत्पाद शुल्क योग्य मालाचा व्यापार करत असाल तर आपण केंद्रीय अबकारी अंतर्गत नोंदणीसाठी पात्र आहेत. आज, आपला अबकारी कर क्रेडिट म्हणून उपलब्ध राहणार नाही, पहिल्या किंवा दुसर्या टप्प्यातील विक्रेता म्हणून अबकारी कर, उत्पादन किंमतीमध्ये जोडला जातो. जर तो एक निर्मात्याकडे विकला जात असेल तर, वाहून नेलेला अबकारी कर, विकत घेत असलेला निर्माता त्याला सीईएनवीएटी क्रेडिट म्हणून घोषित करेल.
त्याचप्रमाणे, आपण माल आयात करत असाल तर आयात करणारा व्यापारी म्हणून केंद्रीय अबकारी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे आणि लागू आयात शुल्क भरणे जरुरी आहे.
वर उल्लेख केलेल्या परिस्थिती अंतर्गत, एक सामान्य प्रश्न प्रत्येक व्यवसायिकाच्या मनात येईल “मी ‘जीएसटी’ लागू करण्या अगोदर शेवटच्या एक दिवस आधी आयोजित स्टॉक इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो का?”

होय, बंद होत असलेल्या स्टॉक्स मधील कच्चा माल, उत्पादीत केला जात असलेली वस्तू, तयार वस्तू यांवरील इनपुट टॅक्स क्रेडिट (सीईएनवीएटी, इनपुट व्हॅट, नोंदणी कर आणि सेवा कर) आपल्याला दिले जाईल. मात्र, आपल्याला बंद होत असलेल्या स्टॉक मध्ये आयोजित इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यास पात्र होण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

आपल्या बंद होत असलेल्या स्टॉक मध्ये आयोजित इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी पात्रता अटी

आपल्या बंद होत असलेल्या स्टॉक मध्ये आयोजित इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी,

  • बंद होणारा स्टॉक कच्चा माल, उत्पादीत केला जात असलेली वस्तू, तयार वस्तूच्या स्वरूपात समजला आहे, आणि करपात्र पुरवठ्यासाठी ते वापरले जाईल किंवा असा हेतू गृहीत धरून त्याचा वापर करणे आवश्यक आहे.
   Illustration
  • असा क्रेडिटचा लाभ पुढे प्राप्तकर्त्याकडे कमी भावात पाठवला जाईल. चालू कराच्या कालावधीत सेवा/कर, इनपुट टॅक्स क्रेडिट परवानगी नसल्यामुळे उत्पादन खर्च म्हणून जोडला आहे. ‘जीएसटी’ कडे संक्रमण केल्यावर, आयटीसीला अनुमती दिली जाईल, आणि नैसर्गिकरित्या वस्तुची मूळ किंमत यामुळे कमी राहील, आणि त्यानंतर ग्राहकांना वस्तू विकत घेताना अंतिम किंमत कमी मोजावी लागेल. Price Cut Image
  • जीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट साठी आपण पात्र आहात. जीएसटी मध्ये, आपण फक्त एक नियमित करदाता असाल तर आपण इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी पात्र असाल. ‘जीएसटी’ अंतर्गत जर एक करपात्र व्यक्ती रचना आकारणीची निवड करत असेल तर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट हक्क सांगण्याची परवानगी नाही.Illustration for Unregistered Manufacturer_2
  • बंद होत असलेल्या स्टॉक संबंधी मालाची (उत्पादन होत असलेली वस्तू आणि तयार वस्तू ) आपल्याकडे पावती आहे किंवा इतर कोणतीही विहित सेवा/कर दस्तऐवज आहे.Illustration for Unregistered Manufacturer_4
  • पावत्या किंवा इतर कोणत्याही विहित सेवा/कर दस्तऐवज, कागदपत्रे ई. वरील तारीख जीएसटी प्रसारित करण्याच्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आतील आहे. Illustration for Unregistered Manufacturer_3
  • सेवा देणारा पुरवठादार कायद्याअंतर्गत कोणत्याही हस्तक्षेपासाठी पात्र नाही.

 

आपण खाली दिलेल्या एका उदाहरणाने हे समजून घेऊ.

रवींद्र ऑटोमोबाईल्स कार आणि कारचे सुटे भाग यांचा नोंदणीकृत उत्पादन विक्रेता आहे. 1 मार्च 2017 रोजी, रवींद्र ऑटोमोबाईल्सने सुटे भाग विकत घेतले आणि व्यवहाराचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

तारीखस्टॉक मधली वस्तूसंख्यारेट /प्रती संख्याएकूण मूल्यवॅट १४.५%उत्पादन शुल्क १२.५%
०१-०३-२०१७स्पेर्स५० नग१५००/ प्रती नग७५,०००१०,८७५९,३७५

 

दिनांक 31 मार्च, 2017 पर्यंत, रवींद्र ऑटोमोबाईल्सच्या स्पेअर्सच्या बंद होत असलेल्या स्टॉकची संख्या ३० आहे.

     • चालू कर रचने नुसार, रवींद्र ऑटोमोबाईल्स क्रेडिट १०.८७५ रुपये इतकी इनपुट व्हॅट म्हणून लाभ घेऊ शकतात, आणि उत्पादन व्हॅट विरोधात ही रक्कम सेट करू शकतात. मात्र, त्यांना अबकारी इनपुट कर क्रेडिट परवानगी नाही. त्यामुळे, उत्पादन खर्चात हे समाविष्ट केले आहे. आता, ‘जीएसटी’ कडे स्थानानंतर केल्या वर, रवींद्र ऑटोमोबाईल्सला अबकारी कर वरील बंद होत असलेल्या स्टॉकवर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी परवानगी आहे.

वरील उदाहरण लक्षात घेऊन आणि बंद होत असलेल्या स्टॉक वरील अबकारी कर मोजण्यात येईल, ज्याची इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून गणना केली जाईल.

३१-३-२०१७ रोजी स्टॉक बंद होत आहे.संख्या ३०
प्रति युनिट शुल्क (एकूण उत्पादन शुल्क ९.३७५ / प्रमाण ५० संख्या)१८७.५ / युनिट
बंद होत असलेल्या शेअरची शिल्लक शुल्क (प्रति युनिट १८७.५ शुल्क * बंद शेअर ३० संख्या)५,६२५

 

आता, रवींद्र ऑटोमोबाईल्स ला बंद होत असलेल्या स्टॉकवर ५.६२५ रुपये अबकारी कर लाभ घेऊ शकतात हे माहिती आहे, पण ते लाभ घेण्यासाठी पात्र आहेत की नाही हे त्यांना माहीत आहे का?

पात्र ठरण्यासाठी, रवींद्र ऑटोमोबाईल्स खालील शर्ती पूर्ण करणे गरजेचे आहे:

 1. गृहीत धरलेला बंद होणारा स्टॉक करपात्र साठी वापरले किंवा याशी संबंधित हेतूसाठी वापरले जात असेल.
  होय, करपात्र पुरवठ्याकरिता बंद होणार्या स्टॉकचे 30 नग वापरले जातील.
 2. अशा क्रेडिटचा लाभ पुढील टप्प्यात,प्राप्तकर्त्याकडे कमी दरात पाठवला पाहिजे, हे होणे आवश्यक आहे.
  इनपुट टॅक्स क्रेडिट उपलब्ध असल्याने, रवींद्र ऑटोमोबाईल्स यापुढे उत्पादन खर्च जोडणार नाही. याचाच परिणाम म्हणून मूळ किंमत कमी होईल, आणि त्यानंतर अंतिम सुद्धा किंमत कमी होईल.
 3. ते जीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी पात्र आहेत.
 4. बंद होत असलेल्या स्टॉक संबंधी मालाची (उत्पादन होत असलेली वस्तू आणि तयार वस्तू ) आपल्याकडे पावती आहे किंवा इतर कोणतीही विहित सेवा/कर दस्तऐवज त्यांच्याकडे असायला हवी.
  रवींद्र ऑटोमोबाईल्सकडे पुरवठादार (निर्माता) नी दिलेले नियम ११चे चलन आहे ज्यावर बंद होत असलेल्या स्टॉकच्या ३० नगांच्या बाबतीत उल्लेख आहे.
 5. पावत्या किंवा इतर कोणत्याही विहित सेवा/कर दस्तऐवज, कागदपत्रे ई. वरील तारीख जीएसटी प्रसारित करण्याच्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आतील आहे.
  जीएसटी १-४-२०१७ रोजी लागू झाले हे गृहीत धरून, बंद होणार्या स्टॉकच्या ३० नगांचा दिनांक १-३-२०१७ रोजी खरीदल्याचा पुरावा आहे, जो १२ महिन्यांच्या आतला आहे,

रवींद्र ऑटोमोबाईल्सने वरील सर्व अटी पूर्ण केल्या आहेत आणि ५,६२५ रुपयेचा अबकारी कर ते सीजीएसटी इनपुट कर क्रेडिट गणून त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.

 

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

283,713 total views, 86 views today