1. जेव्हा सामानाच्या/मालाच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाहतूक/हालचाल होत नसेल तेव्हा ग्राहकाला जिथून सामानाचे वितरण केले ते ठिकाण म्हणजे पुरवठ्याचे ठिकाण असते.

उदा: रेक्स कार्स, ज्यांच्या व्यवसायाचे नोंदणीकृत ठिकाण हे चेन्नई, तामिळनाडू आहे, त्यांनी कर्नाटकातील मैसूर येथे नवीन शोरूम सुरु केले आहे. कामाच्या ठिकाणी आधीच बसवलेला जनरेटर त्यांनी मैसूर, कर्नाटक येथील रोहन जनरेटर्सकडून विकत घेतला.

पुरवठादाराचे ठिकाण: मैसूर, कर्नाटक

पुरवठ्याचे ठिकाण: जनरेटरचा पुरवठा करताना कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाही. त्यामुळे, पुरवठ्याचे ठिकाण, मैसूर, कर्नाटक हेच आहे.

हा आंतरराज्यीय पुरवठ्याचा प्रकार आहे. त्यामुळे CGST आणि SGST हे कर लागू आहेत.

जेव्हा सामानाच्या/मालाच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाहतूक/हालचाल होत नसेल तेव्हा ग्राहकाला जिथून सामानाचे वितरण केले ते ठिकाण म्हणजे पुरवठ्याचे ठिकाण असतेClick To Tweet

GST for transactions involving no movement of goods

2. जेव्हा सामान/माल कामाच्या ठिकाणी एकत्र केला जातो किंवा बसवला जातो तेव्हा ते ठिकाण म्हणजे पुरवठ्याचे ठिकाण असते.
जेव्हा सामान/माल कामाच्या ठिकाणी एकत्र केला जातो किंवा बसवला जातो तेव्हा ते ठिकाण म्हणजे पुरवठ्याचे ठिकाण असतेClick To Tweet

उदा.: रेक्स कार्स, ज्यांच्या व्यवसायाचे नोंदणीकृत ठिकाण हे चेन्नई, तामिळनाडू आहे, त्यांनी तेलंगणातील हैद्राबाद येथे नवीन शाखा सुरु केली आहे. चेन्नई, तामिळनाडू येथेच नोंदणीकृत असलेल्या रॉन लिफ्ट्सकडून त्यांनी शाखेच्या ठिकाणी बसवण्यासाठी एक लिफ्ट विकत घेतली आहे.

पुरवठादाराचे ठिकाण: चेन्नई, तामिळनाडू

पुरवठ्याचे ठिकाण: सदर लिफ्ट, हैद्राबाद, तेलंगण येथील रेक्स कार्सच्या आवारात बसवायची आहे. त्यामुळे, पुरवठ्याचे ठिकाण, हैद्राबाद, तेलंगण आहे.

हा आंतरराज्यीय पुरवठा आहे. त्यामुळे IGST कर लागू होतो.

Determining GST for goods assembled or installled

3. जेव्हा सामान/माल वाहतुकीच्या एखाद्या साधनावर लादलेला असतो तेव्हा ज्या ठिकाणी सामान वाहनावर लादले जाते ते ठिकाण पुरवठ्याचे ठिकाण असते.
जेव्हा सामान/माल वाहतुकीच्या एखाद्या साधनावर लादलेला असतो तेव्हा ज्या ठिकाणी सामान वाहनावर लादले जाते ते ठिकाण पुरवठ्याचे ठिकाण असते.Click To Tweet

उदा.: कोलकाता ते हैद्राबाद ह्या विमानप्रवासात एका माणसाने विमानातील शॉपिंग कॅटलॉगमधून एक पॉवर बँक विकत घेतली. त्या विमान कंपनीच्या व्यवसायाचे नोंदणीकृत ठिकाण कोलकाता आहे आणि ती पॉवर बँकही कोलकाता येथेच विमानात चढवण्यात आली.

पुरवठादाराचे ठिकाण: कोलकाता, पश्चिम बंगाल

पुरवठ्याचे ठिकाण: कोलकाता, पश्चिम बंगाल

हा आंतरराज्यीय पुरवठ्याचा प्रकार आहे. त्यामुळे CGST आणि SGST.

GST for goods supplied on board a mode of conveyance

पुढील-इन-लाइन:
बिल-टू-जहाज-टू-व्यवहाराच्या बाबतीत पुरवठ्याचे ठिकाण

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

132,298 total views, 359 views today