आपल्या मागील ब्लॉग मध्ये आपण जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याच्या अटी आणि आयटीसी घेता येण्यासाठी अनुकूल परिस्थिती शिकलो. या ब्लॉग मध्ये, आपण अशा परिस्थिती पाहु जिथे आपण इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेऊ शकत नाही याबद्दल खाली चर्चा केली गेली आहे..

1.आपण नोंदणी करण्यासाठी पात्र ठरलेल्या तारखेच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत अर्ज केला नाही

जर आपण नोंदणी करण्यासाठी पात्र ठरलेल्या तारखेच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत अर्ज केला नाही तर, आपण टॅक्स भरण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी आपल्या स्टॉक मध्ये असलेल्या मालावरती किंवा तयार होणार्या् मालावरती उपलब्ध आयटीसी मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता गमावतात.

2. इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी वेळ मर्यादा पार केल्यानंतर काय होईल?

आइटीसी खाली दिलेल्या योजनांनुसार (तारखांतून) लवकरात लवकर मिळविली पाहिजे:-
• बिल मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत
किंवा
• रिटर्न फाइल करण्यासाठी मिळालेली पुढील आर्थिक वर्षातील सप्टेंबर महिन्यातील तारीख
किंवा
• वार्षिक रिटर्न्स फाइल करण्याची तारीख (पुढील आर्थिक वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी देय तारीख असते.)

हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ.

उदा राजेश ऍपरेल प्रायव्हेट लिमिटेड हे एक पुरुषांच्या कपड्याचे व्यापारी आहेत. ते 15 जुलै 2017 रोजी निर्मात्याकडून 100000 रुपयांच्या कपड्याची खरेदी करतात, या खरिदेसाठी भरलेल्या जीएसटी ची रक्कम 18,000 (18%) आहे. त्यांनी त्यांचे वार्षिक रिटर्न्स 2017-18 साठी 31 जुलै 2018 या तारखेस फाइल केले आहे. आणि सप्टेंबर 2018 मधल्या रिटर्न्स साठी 20 ऑक्टोबर 2018 ही तारीख नोंदवली आहे.

येथे, आपल्याला तीन तारखा तपासून पाहण्याची आवश्यकता आहे –

बिलावरील तारखेच्या एक वर्ष आधी14 जुलै 2018
रिटर्न फाइल करण्यासाठी मिळालेली पुढील आर्थिक वर्षातील सप्टेंबर महिन्यातील तारीख20 ऑक्टोबर, 2018
वार्षिक रिटर्न्स फाइल करण्याची तारीख31 जुलै 2018

अशा प्रकारे, चलनावरील तारखेच्या एक वर्ष आधीची तारीख म्हणजेच 14 जुलै 2018 ही वरील दिलेल्या तीन तारखांपैकी सर्वात आधीची आहे, त्यामुळे चलनावरील आइटीसी 14 जुलै 2018 आधी घेणे अनिवार्य आहे.

3.वस्तू आणि / किंवा सेवा यांचा उपयोग इनपुट म्हणून कंपॉज़िट करदाता द्वारा होत असेल.

कम्पोझिशन करदाता इनपुट म्हणून वापरले वस्तू आणि / किंवा सेवाची आई टी सी चा लाभ घेऊ शकत नाही.

उदाहरण: लक्ष्मी किराणा स्टोअर्स ‘जीएसटी’ अंतर्गत कंपॉज़िट करदाता म्हणून नोंदणीकृत आहे. ते निर्मात्याकडून 20,000 किमतीचे किराणा आयटम खरेदी करतात आणि ‘जीएसटी’ 12% च्या भावाने 2,400 रुपये इतकी आकारली जाते. लक्ष्मी किराणा स्टोअर्स एक कंपॉज़िट करदाता म्हणून नोंदणीकृत आहे म्हणून, ते खरेदी वर 2,400 रुपयांच्या आयटीसीचा लाभ घेऊ शकत नाही. ही भरलेली जीएसटी त्यांच्या सामग्रीच्या खर्चाचा एक भाग बनेल.

4. वैयक्तिक वापरासाठी वापरली वस्तू आणि / किंवा सेवा

उदा. राजेश ऍपरेल प्रायव्हेट लिमिटेड ने निर्मात्याकडून 50,000 रु. किमतीचे कपडे खरीदले. त्यावर भरलेल्या जीएसटी 9,000 इतकी आहे. विकत घेतलेल्या कपड्यांपैकी 2,000 रुपयाचे परिधान राजेश अप्यारल लिमिटेड वैयक्तिक वापरासाठी काढून घेतात. उरलेले कपडे ग्राहकांना विकले जातात. इथे, मालावरील आइटीसी इतकी असेल – रु.8,640 (48,000 *18%).

5.सूट दिलेल्या वस्तुंचे उत्पादन करण्यासाठी वापरलेला कच्चा माल आणि सेवा

सूट दिलेल्या वस्तुंचे उत्पादन करण्यासाठी वापरलेला कच्चा माल, सेवा आणि वस्तू जिथे खरिददार खरेदी केल्यावर टॅक्स भरतो यांवर आइटीसी मिळू शकत नाही.

उदा. आपण एक सूट दिलेली वस्तू बनवतात. आपण 4 सप्टेंबर 2017 ला पुढील बाबींची कच्चा माल म्हणून खरेदी करतात. –

आवक सप्लाइस- 4.9.2017
कच्चा मालमूल्य (रु.)कच्च्यामालावर भरलेली जीएसटी (18% च्या हिशोबाने) (रु.)
कच्चा माल अ3,00,00054,000
कच्चा माल ब30,000 5,400
एकूण3,30,00059,400

येथे, या साधनांचा (कच्च्या मालाचा) वापर सूट दिलेल्या वस्तुंचे उत्पादन करण्यासाठी वापरले गेले आहे, म्हणून आपण रु.59,400च्या आयटीसीचा लाभ मिळवू शकत नाही.

6.प्राप्त केलेल्या सेवांकरिता भरणा बिल मिळालेल्या तारखेपासून 3 महिन्यांत केला नसल्यास

सेवा प्राप्त केलेल्या व्यक्तीने बिल मिळाल्यापासून ३ महिन्यांच्या आत आकारण्यात आलेली रक्कम आणि त्यासोबत जोडलेला टॅक्स यांची भरपाई केली नसल्यास मिळालेली आइटीसी सेवा प्राप्त केलेल्या ग्राहकाच्या उत्तरदायित्वात मिळवण्यात येईल, ज्या सोबत व्याज सुद्धा जोडला जाईल.

उदाहरणार्थ: एक चार्टर्ड अकाउंटंट कडून आपण ऑडिटिंग आणि सल्ला घेण्याच्या सेवा वापरल्या आहेत. तेव्हा सेवेचे मूल्य रू 50,000 आहे आणि आकारलेली जीएसटी रु.9,000 (18%) इतकी आहे. आपण आता बिल मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत रु.59,000 चा भरणा करू शकले नाहीत, तर तुम्ही घेतलेली रु.9,000 ची आयटीसी योग्य व्याजासह आपल्या दायित्वात जोडली जाईल.

7.असा माल जो (भेट वस्तू किंवा मोफत नमूना आहे असे समजून) चोरी गेला, नष्ट झाला, हरवीला, मिटवण्यात आला किंवा विल्हेवाट लावण्यात आली.

उदाहरण: आपण एक इलेक्ट्रॉनिक वस्तूचे विक्रेते आहोत. 1 नोव्हेंबर, 2017 ला, रू25,000 किमतीचे प्रत्येकी 20 संगणक आपण निर्मात्याकडून खरेदी करतात. त्यावर ‘जीएसटी’ रु.90,000 (@ 18%) इतकी लागणार आहे. आणि घेतलेल्या संगणकांपैकी एक संगणक पूर्णपणे खराब होतो आणि त्याचा पुन्हा वापर करणे शक्य नसेल.तर आपण त्या संगणकावर रु. 4500 किमतीची आयटीसी घेऊ शकत नाही.

8. मोटार वाहन आणि इतर वाहन

पुढील काही बाबी वगळता वाहनांवर आणि इतर वाहतूकीच्या साधनांवर आइटीसी मिळण्याची परवानगी नाही:

• पुन्हा पाठविली गेली असल्यास किंवा
• प्रवासी वाहतुक आणि मालाची देवाणघेवाण होत असल्यास किंवा
• ड्राइविंग, उड्डाण प्रशिक्षण अथवा ह्या वाहनांना कसे चालवावे हे मार्गदर्शन करण्यासाठी उपयोग होत असल्यास

उदा सूपर कार्स प्राइवेट लिमीटेड, एक कार उत्पादक, एका टेंपोची खरेदी करतात जिचा उपयोग उद्योगाच्या आवारात कर्मचारी वाहतुकीसाठी केला जाणार आहे. अशा वेळी सूपर कार्स प्राइवेट लिमीटेड, टेंपो ट्रॅवेलर वर आइटीसी मिळवू शकत नाही कारण याचा उपयोग वर उल्लेख केलेल्या बाबींकरता होत नाही.

आता आपण दुसरी परिस्थिती बघुया. मुकेश ट्रॅव्हल्स, एक टूर्स ऑपरेटर, एका टेंपोची खरेदी करतात जीचा उपयोग प्रवाश्यांच्या वाहतुकीसाठी त्यांच्या पर्यटनाकरिता होणार आहे. मुकेश ट्रॅव्हल्स, टेंपो ट्रॅवेलर वरती आइटीसी मिळवू शकतात कारण की याचा उपयोग प्रवाश्यांच्या वाहतुकीसाठी होत आहे, जो यात मुकेश ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.

9. अन्न आणि शीतपेये, बाहेरची कॅटरिंग, सौंदर्य उपचार, आरोग्य सेवा, उटणे आणि प्लास्टिक सर्जरी वर

आयटीसी, अन्न आणि शीतपेये, बाहेरची कॅटरिंग, सौंदर्य उपचार, आरोग्य सेवा, उटणे आणि प्लास्टिक सर्जरी ई. वर घेता जाऊ शकत नाही, पण जर का ते माल किंवा सेवा यांच्या वर्गात बाह्य पुरवठा करण्यासाठी वापरले गेले असतील तर आपण आइटीसी मिळवू शकतात.

उदाहरण 1: सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड एक केटरर्सची मदत(राकेश केटरर्स) कर्मचार्यांसाठी दिवाळी उत्सव साजरा करण्याकरिता घेतात. सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड या कॅटरिंग सेवेतून आयटीसीचा लाभ घेऊ शकत नाही कारण तो सूपर कार्सचा व्यवसाय नाही आहे.

उदाहरण 2: सुपर कार प्रायव्हेट लिमिटेडला कॅटरिंग सेवा प्रदान करण्यासाठी, राकेश केटरर्स शामीयाना ग्रूपची मदत घेतात. शामीयाना ग्रूप सुद्धा केटरर्स संबंधी व्यवसाय चालवतात. येथे राकेश केटरर्स शामीयाना सर्विसेस वर आयटीसी घेऊ शकतात कारण पूरविलेल्या सेवा राकेश केटरर्सद्वारा बाह्य पुरवठा करण्यासाठी वापरले गेल्या आहेत.

10. कुठल्याही सूचीत दिलेल्या सेवा वगळता इतर आवश्यक सेवा ज्या कर्मचार्यांसाठी उपलब्ध करणे अगदी गरजेचे असते. यात क्लब्स, आरोग्य, फिटनेस सेंटर, रेंट-ए-कॅब (टॅक्सी), जीवन विमा आणि इन्शुरेन्स सेवा यांचा समावेश होतो. यांची सभासद नोंदणी कुठलीही कंपनी आपल्या कर्मचार्यांसाठी करते.

उदाहरण: मुकेश ट्रॅव्हल्स, एक टूर ऑपरेटर, त्याच्या कर्माचर्यांच्या वापरासाठी प्रथम फिटनेस सेंटर कडून वार्षिक सभासद नोंदणी करून घेते. येथे, मुकेश ट्रॅव्हल्स सदस्यत्व शुल्क भरताना दिलेल्या जीएसटी वर आयटीसी चा लाभ घेऊ शकत नाही.

11. सुट्टीवर जाणार्‍या प्रवाश्यांना प्रवासात मिळणार्या सेवा, जशी रजा किंवा सवलतीत गावी जाण्याची सोय

उदाहरण: सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड एलटीए (रजा प्रवास भत्ता) अंतर्गत वरिष्ठ कर्माचर्यांना प्रवास खर्चाची परतफेड करते. सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड भरपाई (परतफेडेत) दिलेल्या प्रवाशी भाड्यात लागलेल्या जीएसटी वर आयटीसीचा लाभ घेऊ शकत नाही.

12.भांडवली वस्तूंवर लागणारा टॅक्सचा घटक, जर टॅक्सच्या घटकाचे अवमूल्यन झाले असल्यास

भांडवली वस्तूंवर लागणारा टॅक्सचा घटक ज्यावर इनकम टॅक्स रिटर्न्स च्या दरम्यान अवमूल्यन झाले असल्यास त्यावर आइटीसी उपलब्ध होणार नाही.

उदा. सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड रु.50,00,000 किमतीची यंत्रणा कार उत्पादनासाठी खरेदी करते. या खरेदीदरम्यान भरण्यात आलेली जीएसटी रु.9,00,000 आहे. सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड आयकर विभागाच्या समोर यंत्रणेवर रु.59,00,000 चे अवमूल्यन (घसारा कर) दाखवते, याच्यात जीएसटीची किंमत पण मिळवलेली आहे. अशा परिस्थीत सुपर कार प्रायव्हेट लिमिटेड रु.9,00,000 ची आइटीसी यंत्रणेवर मिळवू शकत नाही.

इनपुट टॅक्स क्रेडिट चा लाभ अपवादात्मक परिस्थितीत घेतलेला असतो.

जेव्हा एक नियमीत विक्रेता कंपॉज़िट योजनेवर आइटीसी मिळवतो.

जेव्हा एक नियमीत विक्रेता कंपॉज़िट योजनेवर आइटीसी मिळवतो, तेव्हा त्या व्यक्तीने स्टॉक मधील कच्चा माल, बनत असलेले उत्पादन, बनलेली उत्पादने आणि भांडवलीतला माल (जो विहित टक्क्याने कमी केला आहे) वर मिळवलेली आइटीसी कंपॉज़िट योजनेत सामील होण्याच्या एक दिवस आधी भरून टाकणे अनिवार्य आहे.

उदा. तुम्ही एक नियमीत विक्रेते म्हणून नोंदणीकृत आहात. आपण कंपॉज़िट योजनेत 1 सप्टेंबर 2017 रोजी सामील होतात, कारण की आपली वार्षिक उलाढाल रु .50 लाख पेक्षा जास्त नाही. 31 ऑगस्ट 2017 ला आपल्या स्टॉक मध्ये खालील घटकांचा समावेश होतो ज्याच्यावर आइटीसी आधीच घेतली गेली आहे.-

बंद होणारा स्टॉक- 31.8.2017
कच्चा मालमूल्य (रु.)कच्च्यामालावर भरलेली जीएसटी (18% च्या हिशोबाने) (रु.)
कच्चा माल अ1,50,00027,000
कच्चा माल ब20,000  3,600
एकूण1,70,00030,600

कंपॉज़िट योजनेत सामील होण्याआधी, आपल्याला रु.30,600 ची आइटीसी स्टॉक मधील इनपुट्स करता भरवी लागेल.

करपात्र वस्तू आणि / किंवा सेवा माफ होतात तेव्हा

कुठल्याही व्यक्तीने पुरवलेल्या करपात्र वस्तू आणि / किंवा सेवा माफ होतात तेव्हा आपण स्टॉक मधील कच्चा माल, बनत असलेले उत्पादन, बनलेली उत्पादने आणि भांडवलीतला माल (जो विहित टक्क्याने कमी केला आहे) वर मिळवलेली आइटीसी कंपॉज़िट योजनेत सामील होण्याच्या एक दिवस आधी भरून टाकणे अनिवार्य आहे.
उदाहरणार्थ: आपण एक कारखानदार आहात आणि 15 सप्टेंबर 2017 पासून आपण बनवत असलेले उत्पादन जीएसटी पासून मुक्त होत असेल. अशा वेळी आपल्या इनपुट स्टॉक मध्ये 14 सप्टेंबर 2017 रोजी पुढील दिल्याप्रमाणे वस्तू आहेत ज्यावर आपण आधीच जीएसटी घेतली आहे.-

Closing stock- 14.9.2017
कच्चा मालमूल्य (रु.)कच्च्यामालावर भरलेली जीएसटी (18% च्या हिशोबाने) (रु.)
कच्चा माल1,00,00018,000
अर्ध उत्पादीत मालावर इनपुट्स50,000 9,000
एकूण1,50,00027,000

स्टॉक मध्ये साधनांवर घेतलेली आयटीसी, उदा. रु.27,000 पैसे परत करणे गरजेचे आहे.

टीप: अद्याप जीएसटी दरांना अंतिम रूप मिळालेले नाही आहे आणि उदाहरण म्हणून दाखविण्यात आलेले दर फक्त समजण्याच्या हेतूने सादर केले आहेत.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

127,244 total views, 162 views today