Language

  • English
  • Hindi
  • Marathi
  • Kannada
  • Telugu
  • Tamil
  • Gujarati

जीएसटीचा मूळ गाभा म्हणजे एककेंद्राभिमुखता. ही एककेंद्राभिमुखता जपली जाणार आहे राज्य आणि केंद्राच्या करांमध्ये. म्हणजेच, राज्य आणि केंद्राच्या करांना एकत्र केले जाणार आहे.

सध्या काय घडतंय, हे लक्षात घ्या. केंद्रीय जकात कर, सेवा कर आणि वॅटअंतर्गत पात्र असलेल्या उत्पादकाला प्रत्येक राज्याने नमूद केल्याप्रमाणे परतावा भरावा लागतो म्हणजेच रिटर्न्स फाइल करावे लागतात. त्यामुळे उत्पादकाला जकात कर, सेवा कर आणि वॅटसाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक स्वरुपावर रिटर्न्स, ऍनेक्शचर आणि रजिस्टर असं सगळं हाताळावं लागतं.

पण, जीएसटी आल्याने ही परिस्थिती बदलेल. तुम्ही व्यापारी आहात, उत्पादक आहात, रिसेलर आहात की सेवा पुरवठादार आहात… तुम्ही कोणीही असा, तुम्हाला फक्त जीएसटी रिटर्न्स फाइल करायचे आहेत.

अरे वा! हे तर छान वाटतंय. आता आपण पाहू जीएसटीमध्ये रिटर्न्स फॉर्म्सचे कोणकोणते प्रकार असतात.

जीएसटी अंतर्गत करदात्याला रिटर्न्स फाइल करण्यासाठी १९ फॉर्म्स किंवा अर्ज आहेत. हे सगळे अर्ज ई-फाइल स्वरुपाचेच आहेत. यातील प्रत्येक अर्ज कशासाठी लागतो आणि त्याचा कालावधी काय यासह अर्जातील माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

नियमित वितरक

अर्जाचा प्रकार वारंवारता अंतिम तारीख अर्जात भरावयाची माहिती
फॉर्म GSTR-1मासिकपुढील महिन्याची १० तारीखजावक पुरवठ्यातील करपात्र माल आणि/किंवा सेवांची माहिती द्या
फॉर्म GSTR-2Aमासिकपुढील महिन्याच्या ११ तारखेलावितरकाने दिलेल्या फॉर्म GSTR-1 च्या माहितीच्या आधारे समोरील पक्षकाराला आपोआप मिळालेली आवक पुरवठ्याची माहिती
फॉर्म GSTR-2मासिकपुढील महिन्याची १५ तारीखइनपुट टॅक्स क्रेडिटवर दावा करण्यासाठी करपात्र माल आणि/किंवा सेवांच्या आवक पुरवठ्याची माहिती. फॉर्म. GSTR-2A. मध्ये अतिरिक्त (दावा) किंवा बदल असल्यास फॉर्म GSTR-2 दाखल करावा.
फॉर्म GSTR-1Aमासिकपुढील महिन्याची १० तारीखअर्जदाराने फॉर्म मधील जावक पुरवठ्यातील कोणत्याही प्रकारे दिलेली अतिरिक्त माहिती, दुरुस्त केलेली वा रद्द केलेली माहिती
फॉर्म GSTR-3मासिकपुढील महिन्याची २० तारीखकराच्या रकमेच्या पेमेंटसह आवक आणि जावक पुरवठ्याच्या अंतिम माहितीच्या आधारे मासिक रिटर्न्स
फॉर्म GST MIS-1मासिकइनपुट टॅक्स क्रेडिटसंदर्भातील मंजुरी, विसंगती किंवा दुहेरीकरणासंदर्भातील संवाद
फॉर्म GSTR-3Aकलम २७ आणि कलम ३१ अंतर्गत रिटर्न्स भरण्यात अपयशी ठरलेल्या नोंदणीकृत करपात्र व्यक्तीला नोटीस
फॉर्म GSTR-9वार्षिकपुढील फिक्सलमधील ३१ डिसेंबरवार्षिक रिटर्न्स-स्थानिक, राज्यांतील आणि आयात/निर्यातीसह भरलेला जीएसटी आणि मिळालेला आयटीसी यांची माहिती द्या

 

संयुक्त करदाते

अर्जाचा प्रकार वारंवारता अंतिम तारीख अर्जात भरावयाची माहिती
फॉर्मGSTR-4Aत्रैमासिकपुरवठादाराने फॉर्म GSTR-1 च्या आधारे संयुक्त योजनअंतर्गत समोरील पक्षकाराला दिलेली आवक पुरवठ्याची माहिती .
फॉर्म GSTR-4त्रैमासिकपुढील महिन्याची १८ तारीखसर्व प्रकारच्या माल आणि सेवांच्या जावक पुरवठ्याची माहिती द्या. यात फॉर्म GSTR-4A मधील आपोआप प्रसिद्ध झालेल्या माहितीसह भरावयाचा कर आणि कराच्या भरण्याचा समावेश असेल.
फॉर्म GSTR-9Aवार्षिकपुढील फिस्कलची ३१ डिसेंबरटॅक्स पेमेंटच्या माहितीसह त्रैमासिक रिटर्न्सची संयुक्त माहिती द्या.

 

परदेशी अनिवासी करदाते

अर्जाचा प्रकार वारंवारता अंतिम तारीख अर्जात भरावयाची माहिती
फॉर्म GSTR-5मासिकपुढील महिन्याची २० तारीख किंवा ७ दिवसांच्या आतआयात, आवक पुरवठा, मिळालेला नोंदणी रद्द झाल्यानंतर आयटीसी, भरलेला टॅक्स आणि क्लोझिंग स्टॉकची माहिती द्या.

 

इनपुट सर्विस डिस्ट्रिब्युटर

अर्जाचा प्रकार वारंवारता अंतिम तारीख अर्जात भरावयाची माहिती
फॉर्म GSTR-6Aमासिकपुढील महिन्याची ११ तारीखपुरवठादाराने फॉर्म उएऊ-१च्या आधारे आयएसडी प्राप्तकर्त्याला उपलब्ध करून दिलेल्या आवक पुरवठ्याची माहिती
फॉर्म GSTR-6मासिकपुढील महिन्याची १३ तारीखइनपुट क्रेडिट डिस्ट्रिब्युटरची माहिती

 

टॅक्स डिडक्टर

अर्जाचा प्रकार वारंवारता अंतिम तारीख अर्जात भरावयाची माहिती
फॉर्म GSTR-7मासिकपुढील महिन्याची १० तारीखवळत्या केलेल्या टीडीएसची माहिती द्या.
फॉर्म GSTR-7Aमासिकटीडीएस सर्टिफिकेट डाऊनलोडसाठी उपलब्धटीडीएस सर्टिफिकेट- टीडीएस वळत्या केलेल्या मुळ रकमेची आणि योग्य शासकीय विभागांमध्ये टीडीएस वळता केल्याची माहिती

 

ई-कॉमर्स

अर्जाचा प्रकार वारंवारता अंतिम तारीख अर्जात भरावयाची माहिती
फॉर्म GSTR-8मासिकपुढील महिन्याची १० तारीखई-कॉमर्स ऑपरेटरने केलेला पुरवठा आणि पुरवठ्यावर जमा झालेला कर याची माहिती द्या.

 

एकुण उलाढाल 2 कोटीपेक्षा अधिक असल्यास

अर्जाचा प्रकार वारंवारता अंतिम तारीख अर्जात भरावयाची माहिती
फॉर्म GSTR-9Cवार्षिकवार्षिक, पुढील फिक्सलची ३१ डिसेंबररिकंसिलिएशन स्टेटमेंट- लेखा परीक्षण केलेले वार्षिक जमा-खर्च आणि योग्यरित्या प्रमाणित रिकंसिलिएशन स्टेटमेंट

 

अंतिम रिटर्न्स

नोंदणी सोडून दिलेल्या किंवा रद्द केलेल्या करपात्र व्यक्तीसाठी

अर्जाचा प्रकार वारंवारता अंतिम तारीख अर्जात भरावयाची माहिती
फॉर्मGSTR-10मासिकनोंदणी रद्द झाल्यापासून ३ महिन्यांच्या आतआवक आणि भांडवली माल, भरलेला कर आणि भरावयाचा कर यांची माहिती द्या.

 

शासकीय विभाग आणि संयुक्त राष्ट्रे संस्था

अर्जाचा प्रकार वारंवारता अंतिम तारीख अर्जात भरावयाची माहिती
फॉर्मGSTR-11मासिकपुढील महिन्याची २८ तारीखयूआयएन असलेल्या व्यक्तीने दिलेली आवक पुरवठ्याची माहिती.

 

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

142,465 total views, 16 views today