मागील ब्लॉग मधे आपण जी एस टी द्वारे पुरवठा करण्यात आलेल्या वस्तुवरील कराविषयी चर्चा केलेली आहे.

  • राज्यामधे पुरवठा करण्यात केंद्रीय जी एस टी आणि राज्य जी एस टी हे कर लागतात
  • राज्याबाहेर पुरवठा करण्यात आर जी एस टी चा वापर होतो

जी एस टी चा आणखी एक भाग म्हणजे यु टी जी एस टी, यात केंद्रशासित वस्तू आणि सेवा कर ह्यांचा समावेश असतो

आता आपण ह्याबद्दल जाणून घेऊ तसेच हा कोणत्या परिस्थितीत लागू केला जातो ते बघू.

यु टी जी एस टी (केंद्रशासित जी एस टी)

केंद्रशासित प्रदेश हे केन्द्राद्वारे संभाळण्यात येतात इतर राज्यांसारखे त्यांना त्यांचे वेगळे शासन नसते, सध्या भारतात ७ केन्द्र शासित प्रदेश आहेत:

  1. चॅंडिगर
  2. लक्षद्वीप
  3. दमन दीव
  4. दादरा आणि नगर हवेली
  5. अंदमान निकोबार बेटे
  6. दिल्ली
  7. पुदुचेरि

हयामधे दिल्ली आणि पुडुच्चेरी मधे त्यांची स्वतःची सरकार आणि मुख्यमंत्री असतात पण त्यांना अर्ध राज्यांचा दर्जा असतो.

जी एस टी मधे एस जी एस टी चा कायदा भारतातल्या सर्व राज्यान्वर लागू होतो, राज्याची व्याख्या भारताच्या संविधानानुसार अशी करण्यात आलेली आहे की स्वतःची वेगळी सीमा तसेच विधानसभा असते त्याला राज्य असे म्हणतात, एस जी एस टी कायदा, केन्द्र शशित प्रदेश जसे दिल्ली आणि पुडुचेरी ह्यावर सुद्धा लागू होतो. ह्याचा अर्थ ह्या दोघांमधे सी जी एस टी+एस जी एस टी लागू होईल आणि ह्या प्रदेशातून दुसर्या राज्यात वस्तू पाठवण्याकरिता आई जी एस टी लागू होईल, केंद्रशासित प्रदेशांमधे विधानसभा नसल्यामुळे एस जी एस टी चा कायदा तिथे लागू होत नसल्यामुळे जी एस टी कॉन्सिल ने यु ती जी एस टी चा कायदा केन्द्रशासित प्रदेशांमधे जी एस टी राबवण्याकरिता बनवलेला आहे,

UTGST is applicable in the union territories of Chandigarh, Lakshadweep, Daman and Diu, Dadra and Nagar Haveli and Andaman and Nicobar Islands. Click To Tweet

कर आकारणी

केंद्रशासित प्रदेशांमधे होणार पुरवठा

केन्द्र शासित प्रदेशातल्या प्रदेशात हा पुरवठा केला जातो सी जी एस टी+यु जी एस टी हे कर लागतात.

उदा– चंडीगड मधल्या एका फर्निचर सेंटर ने ५० सॉफे १०,००००० रुपयात रमेश फर्निचर(दिल्ली) येथे विकले, हा पुरवठा केंद्रशासित प्रदेशच्या आत झाल्या मुळे जर जी एस टी रेट १२% असेल तर टॅक्स खालील प्रमाणे राहील:

खर्च रूपये
सोफा सेट  १०,००,०००
सीजीएसटी @ ६%        ६०,०००
युजीएसटी @ ६%        ६०,०००
एकूण   ११,२०,०००

म्हणूनच इथे फरक असा आहे की केंद्रशासित प्रदेशांत पुरवठा करतांना एसटीजीएसटीऐवजी यूटीजीएसटी लागू होईल.

केंद्रशासित प्रदेशांत पुरवठा केल्यावर, सीजीएसटी आणि यूटीजीएसटी लागू होईल. Click To Tweet
केंद्रशासित प्रदेशांबाहेर पुरवठा

केंद्र शासित प्रदेशांमधून दुसर्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी पुरवठा केल्यावर आयजीएसटी लागू होईल

उदा– चंडीगड मधल्या एका फर्निचर सेंटर ने ५० सॉफे १०,००००० रुपयात रमेश फर्निचर(दिल्ली) येथे विकले, हा पुरवठा केंद्रशासित प्रदेशच्या बाहेर झाल्या मुळे जर जी एस टी रेट १२% असेल तर टॅक्स खालील प्रमाणे राहील:

खर्च रूपये
सोफा सेट  १०,००,०००
आई जी एस टी १२%    १,२०,०००
एकूण  ११,२०,०००

म्हणून, एखाद्या राज्याबाहेर पुरवठा कर लावण्याप्रमाणेच, आयजीएसटी युनिअन बाहेरच्या पुरवठ्यांवर लागू होईल.

आयजीएसटी केंद्र शासित प्रदेशाबाहेर पुरवठ्यावर लागू होईल.Click To Tweet
वापराचा प्रकार

यु जी एस टी क्रेडिट हे एस जी एस टी क्रेडिट , सारखे कर परतावा मिळवून देऊ शकतात i.e.:

इनपुट टॅक्स क्रेडिट भरणा करण्याची जवाबदारी
यु टी जी एस टीयु टी जी एस टी आणि आई जी एस टी

यु टी जी एस टी क्रेडिट सी जी एस टी ची जवाबदारी संपवण्यासाठी वापरले जाउ शकत नाही.

उदा– ऑगस्ट १७ संपे पर्यंत फर्निचर सेंटर( चंडीगड) यांनी आपले इनपुट क्रेडिट आणि टॅक्स लायबिलीटी खालील प्रमाणे दाखवली आहे:

इनपुट क्रेडिटटॅक्स लायबिलिटी
सी जी एस टी१,००,०००सी जी एस टी   ८०,०००
यु टी जी एस टी१,००,०००यु टी जी एस टी   ८०,०००
आई जी एस टी२,००,०००आई जी एस टी२,५०,०००

येथे फर्निचर सेंटर ने आपली यु ती जी एस ती क्रेडिट १,००,००० ह्या प्रमाणे वापरली आहे:

आकडे रुपये
यु टी जी एस टी क्रेडिट  १,००,०००
(-) यु टी जी एस टी च्या जबाबदारीतून कपात केलेले(-)८०,०००
उर्वरित  २००००
(-) आई जी एस टी च्या जबाबदारीतून कपात केलेले(-) २००००
उर्वरित  नील

यु टी जी एस टी केंद्रशासित प्रदेशांमधे विधान सभेशिवाय कार्यान्वित होते ज्याला केंद्राने ६ एप्रिल २०१७ रोजी पास केले आहे.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

168,693 total views, 221 views today